अहमदाबाद: दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात वापरण्यात आलेल्या पिचवरून भारतावर टीका करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन( )ने गुरुवारी स्वत:च्या संघाला घरचा आहेर दिला. भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला फक्त २०५ धावा करता आल्या. त्यानंतर वॉनने इंग्लंड संघाला सोशल मीडियावरून झापले. वाचा- भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चौथ्या कसोटीसाठीचे पिच हे फलंदाजीसाठी अनुकूल होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान ४०० धावा करणे अपेक्षित होते. पण इंग्लंडला फक्त २०५ धावा करता आल्या. यावरून वॉरने इंग्लंडच्या खेळाडूंना फटकारले. तो म्हणाला इंग्लंडची फलंदाजी केल्या काही कसोटी सामन्यात प्रचंड खराब झाली आहे. या पिचवर पहिल्या डावात धावा करता आल्या असत्या, कारण धावा करण्यासाठी हे योग्य मैदान आहे आणि येथे चेंडू वळत नाही तर बॅटवर येतोय. प्रचंड खराब फलंदाजी. वाचा- इंग्लंडने ३० धावात तीन फलंदाज गमावले होते. त्यात कर्णधार जो रूटचा देखील समावेश होता. पहिल्या डावात बेन स्टोक्सने अर्धशतकी खेळी केली. वाचा- विशेष म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खराब पिचवरून वॉनने भारतीय संघावर आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली होती. इतक नव्हे तर चौथी कसोटी सुरू होण्याआधी त्याने एक व्हिडिओ देखील शेअर केला होता ज्यात त्याने खोदलेले पिच दाखवले होते. वाचा- पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव २०५ वर संपला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद २४ धावा केल्या होत्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट घेत पुन्हा एकदा कमाल केली. तर आर अश्विनने ३ विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने २ तर सुंदरने एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qp1rbH
No comments:
Post a Comment