
मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाची तयारी सर्व खेळाडू करत आहेत. अशातच एका भारतीय संघातील एका जलद गोलंदाजाने निवृत्ती संदर्भात वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसात भारतीय संघात नव्या युवा खेळाडूंनी पदार्पणात शानदार कामगिरी केली आहे. या युवा खेळाडूंची कामगिरी पाहून भारतीय गोलंदाजाने निवृत्तीची चर्चा केली. भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नेट गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. जर सध्याच्या खेळाडूंनी निवृत्ती घेतली तर बदल हा सहज होईल. वाचा- मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव हे भारतीय संघातील सर्वोत्तम जलद गोलंदाज आहेत. या चौघांनी परदेशातील विजयात महत्त्वाची भूमीका बजावली आहे. भारतीय संघाने गाबा कसोटीत विजय मिळून ऑस्ट्रेलियात सलग दुसरी कसोटी मालिका जिंकली तेव्हा यातील एकही जलद गोलंदाज भारतीय संघात नव्हता. युवा गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्याच मालिकेत आघाडीचा गोलंदाज म्हणून भूमिका पार पाडली. अनेक अनुभवी गोलंदाज जखमी असताना शार्दुल ठाकूर, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी मिळालेल्या संधीचा भरपूर फायदा घेतला. वाचा- पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना शमी म्हणाला, जेव्हा आमच्या निवृत्तीची वेळ येईल तेव्हा युवा गोलंदाज आमची जागा घेण्यास तयार असतील. ते जितके अधिक खेळतील तितके उत्तम असेल. मला वाटते की जेव्हा आम्ही निवृत्ती घेऊ तेव्हा बदल हा सहजपणे होईल. जर एका मोठ्या खेळाडूने निवृत्ती घेतली तर संघात कोणती अडचण होणार नाही. राखीव खेळाडू तयार आहेत. अनुभव नेहमी गरजेचा असतो आणि युवा खेळाडू तो ते मिळवतील. नेट गोलंदाज बायो बबलच्या वातावरणात गेल्याने त्यांना भरपूर फायदा मिळेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कार्तिक त्यागी वगळला तर सर्व गोलंदाजांनी अवघड परिस्थीतीत मिळालेल्या संधीचा फायदा घेतला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39Ajm9I
No comments:
Post a Comment