एंटीगा: वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात एक वाद झाला. श्रीलंकेचा फलंदाज ऑब्स्ट्रकटिंग द फिल्ड अर्थात फिल्डिंगमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल आउट देण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच क्रिकेट चाहते देखील त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. वाचा- वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या डावातील २२वे षटक कायरन पोलार्ड टाकत होता. धनुष्काने डिफेंन्सिव्ह शॉट खेळला, चेंडू त्याच्या पाया जवळच होता. दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या पथम निसाकाने धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि तो पळू लागला. तेव्हा धनुष्काने धाव घेण्यास नकार दिला. वाचा- क्रीझपासून तीन-चार पावले पुढे आलेला धनुष्का पुन्हा मागे जात होता. तेव्हा त्याच्या पायाला चेंडू लागला आणि तो मागे आला. या दरम्यान पोलार्ड त्याला रन आउट करण्यासाठी चेंडूकडे धावत आला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये धनुष्का चेंडूपासून दूर होण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला तसे करता आले नाही. त्याने जाणीवपूर्वी चेंडूला पाय लावला किंवा फिल्डिंगमध्ये अडथळा आणला असे दिसत नाही. वाचा- या घटनेवर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना तक्रार केल्यावर मैदानावरील दोघा अंपायर्सनी तिसऱ्या अंपायरची मदत मागितली. तिसऱ्या अंपायरने फिल्डिंगमध्ये अडथळा आणल्याबद्दल त्याला बाद दिले. धनुष्काने ६१ चेंडूत ५५ धावा केल्या. वाचा- धनुष्काला धावबाद देण्याच्या घटनेवर सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. जवळ जवळ सर्व चाहत्यांच्या मते धनुष्काने जाणीवपूर्वक तसे केले नाही. या सामन्यात श्रीलंकेचा संघ ४९ षटकात २३२ धावांवर ऑल आउट झाला. त्यानंतर वेस्ट इंडिजने ४७ षटकात दोन विकेटच्या बदल्यात विजय मिळवला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PS8GMC
No comments:
Post a Comment