अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसा अखेर भारताने १ बाद २४ धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डावा २०५ धावांवर संपुष्ठात आला. भारत अद्याप १८१ धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीसाठी भारतीय संघात जसप्रीत बुमराह ऐवजी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला. वाचा- वाचा- अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय काही त्यांच्या फायद्याचा ठरला नाही. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. या दोघांना अक्षर पटेलने बाद केले. त्यानंतर सिरजाने कर्णधार रूटला बाद करून पाहूण्या संघाची अवस्था ३ बाद ३० अशी केली. त्यानंतर मैदानावर असलेल्या बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो यांनी चौथ्या विकेटसाठी ४८ धावांची भागिदारी केली. ही जोडी सिराजने फोडली. त्याने बेयरस्टोला २८ धावांवर बाद केले. त्यानंतर स्टोक्सने ओली पोपसह ४३ धावा जोडल्या. स्टोक्सने अर्धशतक पूर्ण केले आणि त्याला सुंदरने माघारी पाठवले. वाचा- इंग्लंडचा निम्मा संघ १२१ धावांवर बाद झाला होता. अखेरच्या पाच फलंदाजांपैकी लॉरेंन्स वगळता अन्य कोणाला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्याने ४६ धावा केल्या. इंग्लंडा पहिला डाव २०५ धावा संपुष्ठात आला. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. अश्विनने ३, सिराजने २ तर सुंदरने एक विकेट घेतली. वाचा- भारताच्या डावाची सुरूवात शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी केली. जेम्स एडरसनने पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर गिलला शून्यावर बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजार यांनी विकेट न गमावता दिवसाचा खेळ संपवला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3e9ia08
No comments:
Post a Comment