नवी दिल्ली : मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीची जोडी पुन्हा एकदा मैदानावर दिसणार आहे. भारताचा मास्टर ब्लास्टर (sachin tendulkar) आणि यांची फलंदाजी पाहता येणार आहे. ( )च्या पहिल्या लढतीत हे दोन्ही क्रिकेटपटू भारताकडून डावाची सुरूवात करणार आहेत. वाचा- पाच मार्च ते २१ मार्चपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण सहा संघ खेळणार आहेत. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. आता आजपासून याची सुरूवात होत आहे. रायपूरच्या शदही वीरनारायण स्टेडियमवर सामने होतील. भारताची पहिली लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. वाचा- राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या स्पर्धेत भारतासह बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या देशांचे संघ सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. भारताकडून सचिन आणि सेहवाग यांच्या बरोबर युसूफ पठाण, विनय कुमार, नमन ओझा, युवराज सिंग आणि इरफान पठाण हे खेळाडू दिसतील. वाचा- अन्य संघातील खेळाडूंमध्ये ब्रायन लारा, जॉन्टी रोड्स, केव्हिन पीटरसन, मोहम्मद नजीमुद्दीन आदी खेळाडू आहेत. आजच्या लढतीनंतर भारताची मॅच ९ आणि १३ तारखेला आहे. १७ आणि १९ तारखेला सेमीफायनल तर २१ तारखेला फायनल मॅच होणार आहे. असा आहे भारतीय संघ- सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहेवाग, युवराज सिंग, जहीर खान, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, मनप्रीत गोनी, नमन ओझा, प्रज्ञान ओझा, युसूफ पठाण
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30h7LXO
No comments:
Post a Comment