अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने ८९ धावांची आघाडी मिळवण्यात यश मिळवले. ५ बाद १२१ अशी अवस्था असताना ऋषभ पंतच्या शानदार शतकामुळे भारताला आघाडी मिळवता आली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ७ बाद २९४ धावा केल्या होत्या. ६० वर तर अक्षर पटेल ११ धावांवर खेळत आहेत. वाचा- दुसऱ्या दिवसाची सुरूवात भारताने कालच्या १ बाद २४ धावसंख्येवरून पुढे केली. पण पहिल्या सत्रात इंग्लंडने ३ विकेट घेत सामन्यात कमबॅक केले. यात चेतेश्वर पुजारा १७, विराट कोहली शून्य आणि अजिंक्य रहाणे २७ यांचा समावेश होता. पहिल्या सत्रानंतर भारताने ४ बाद ८० धावा केल्या होत्या. वाचा- रोहित शर्मा आणि या जोडीने भारताला शतक करून दिले. ही जोडी मोठी भागिदारी करेल असे वाटत असताना रोहित शर्मा बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचे अर्धशतक एका धावाने हुकले. त्यानंतर अश्विन १३ धावांवर बाद झाला आणि टीम इंडिया आणखी अचडणीत सापडली. भारताच्या १४६ वर सात विकेट पडल्या होत्या. या परिस्थितीतून पंत आणि सुंदर या जोडीने संघाला बाहेर काढले. पंत-सुंदर जोडीने संघाला आघाडी मिळून दिले आणि त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजाचा समाचार देखील घेतला. पंतने प्रथम अर्धशतक केले आणि त्यानंतर षटकार मारून शतक झळकावले. शतक झाल्यानंतर तो बाद लगेच बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १०१ धावा केल्या. यात २ षटकार आणि १३ चौकारांचा समावेश होता. पंतने सुंदरसह सातव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. वाचा- दुसऱ्या दिवशाचा खेळ संपला तेव्हा सुंदर ६० धावांवर नाबाद होता. तर अक्षर पटेल ११ धावांवर खेळत होता. इंग्लंडकडून जेम्स एडरसनने ३, बेन स्टोक्सने २, जॅक लीचने २ विकेट घेतल्या. आघाडी आणि मधळ्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्यानंतर भारताच्या तळातील फलंदाजांनी संघाला आघाडी मिळून दिली. आता तिसऱ्या दिवशी अखेरचे तीन फलंदाज आणखी किती आखाडी मिळवून देतात हे पाहावे लागेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MRLn4o
No comments:
Post a Comment