एंटिगा: 1st t20i क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाने घेणे ही गोष्ट खास अशी असते. क्रिकेटच्या इतिहासात फार असे कमी गोलंदाज आहेत ज्यांनी ही कामगिरी करून दाखवली आहे. कसोटी आणि वनडेच्या तुलनेत फलंदाज अधिक आक्रमक असलेल्या क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणे आणखी कठीण होय. वाचा- श्रीलंकेचा संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघातील पहिल्या टी-२० सामन्यात दोन मोठे विक्रम झाले. यातील एका विक्रमाची चर्चा सर्वजण करत आहेत. तो म्हणजे वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड याने एका ओव्हरमध्ये मारलेले सहा षटकार होय. वाचा- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युवराज सिंग आणि हार्शल गिब्स यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा फिरकीपटू यांच्या ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. या सामन्यात वेस्ट इंडिजने ४१ चेंडू आणि ४ विकेट राखून विजय मिळवला. सर्व जण पोलार्डच्या सहा षटकारांचे कौतुक करत आहेत. पण याच सामन्यात झालेला आणखी एक विक्रम म्हणजे ज्या गोलंदाजाला सहा षटकार मारले गेले त्याने काही मिनिट आधी हॅटट्रिक घेतली होती. वाचा- पोलार्डने एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारल्यामुळे धनंजयच्या हॅटट्रिकचे कौतुकच झाले नाही. आयसीसीने देखील पोलार्डच्या सहा षटकारांचा व्हिडिओ शेअर केला. पण धनंजयच्या हॅटट्रिकचा व्हिडिओ मात्र कोणीच शेअर केला नाही. वाचा- पोलार्डने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकेला २० षटकात १३१ धावा करता आल्या. धनंजयने सामन्यातील चौथ्या ओव्हरमध्ये इविन लुईस, ख्रिस गेल आणि निकोलस पूरन यांची विकेट घेत हॅटट्रिक घेतली. यामुळे शून्य बाद ५१ वरून वेस्ट इंडिजची अवस्था ३ बाद ५२ अशी झाली. पण त्यानंतर सहाव्या ओव्हरमध्ये पोलार्डने धनंजयला ६ षटकार मारले. धनंजयने चार ओव्हरमध्ये ६२ धावा दिल्या. धनंजयच्या हॅटट्रिकचा व्हिडिओ
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sTPTPj
No comments:
Post a Comment