अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज विरुद्ध ( vs Royal Challengers Banglore) यांच्यात लढत होणार आहे. दिल्लीने गेल्या चार सामन्यात तर बेंगळुरूने गेल्या तीन सामन्यात पराभव स्विकारला आहे. या दोन्ही संघांनी १३ सामन्यात प्रत्येकी ७ विजयासह १४ गुण मिळवले आहेत. बेंळुरूचे नेट रनरेट -०.१४५ तर दिल्लीचे -०.१५९ इतके आहे. पराभवाची मालिका खंडीत करून दोन्ही संघांचा प्रयत्न गुणतक्त्यात अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याचा असेल. वाचा- दिल्ली आणि बेंगळुरू यांच्यातील लढत साखळी फेरीतील असली तरी उंपात्य फेरीचे स्वरुप आले आहे. आयपीएलमधील प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची समीकरणे इतक्या वेगाने बदलली आणि तळातील संघांनी अखेरच्या काही सामन्यात धमाकेदार कामगिरी केल्याने या दोन्ही संघांना गेल्या काही सामन्यात सलग पराभवाला सामोरे जावे लागले. वाचा- या सामन्यात ज्या संघाचा पराभव होईल. तो देखील प्ले ऑफमध्ये पोहोचेल. पण त्याचे स्थान अन्य संघांच्या कामगिरीवर ठरले. दिल्लीने पहिल्या सत्रात धमाकेदार कामगिरी केली. पण त्यानंतर त्यांची कामगिरी खराब होत गेली. फलंदाजी तर खराब होत गेलीच पण गोलंदाजाची धार देखील कमी झाली. सलामीची जोडी ही दिल्लीसाठी मोठी डोकेदुखी आहे. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे यांना शिखर धवन सोबत सलामीला पाठवले पण त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसले नाही. धवनने देखील सलग दोन शतकी खेळी केल्यानंतर धावा केल्या नाहीत. गेल्या तीन सामन्यात ०, ०, ६ अशी त्याची धावसंख्या आहे. मधळ्या फळीत देखील ऋषभ पंत बेभरवश्याचा ठरत आहे. त्याने आतापर्यंत फक्त २७४ धावा केल्या आहेत. वाचा- बेंगळुरूची अवस्था देखील काही वेगळी नाही. शनिवारी सनरायजर्स हैदराबादने त्यांचा पराभव केला. सलग तीन पराभवानंतर हा संघ विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सवर अवलंबून आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. गेल्या दोन सामन्यात हे फलंदाज धावा करू शकले नाहीत. एरॉन फिंचच्या जागी जोश फिलिपने सलामीला चांगली सुरूवात केली पण तो मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. वाचा- युएईमधील वातावरण बदलले युएईमध्ये वातावरण थंड होत चालले आहे. ज्यामुळे दुसऱ्या डावात दव पडत आहे. यामुळे सर्व संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहेत, कारण नंतर फलंदाजी करणे सोपे जात आहे. संभााव्य संघ दिल्ली कॅपिटल्स- श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टोयनिस, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, ऋषभ पंत आणि एनरिच नॉर्जे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोहम्मद सिराज, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, इसुरू उडाना, गुरकिरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34QaVoN
No comments:
Post a Comment