अहमदाबाद: इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात भारताचा विकेटकिपर ()ने दमदार शतक झळकावले. पंतच्या या शतकामुळे भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध आघाडी घेता आली. गेल्या काही महिन्यात पंतने त्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा केली आहे आणि यासाठी त्याचे कौतुक देखील केले जात आहे. वाचा- काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रोहित शर्माने पंतला त्याच्या शतकाबद्दल विचारले. तसेच तो विकेटकिपिंग करताना सारखा काही ना काही बडबडत असतो त्याच्याबद्दल विचारणा केली. त्यावर पंतने जे उत्तर दिले त्याने सर्वांची मने जिंकली. रोहित शर्माने पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांची एक छोटी मुलाखत घेतली. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला. जेव्हा रोहितने पंतला विचारले, तु विकेटच्या मागे सारखा काही ना काही बडबडत असतो, असे लोक म्हणतात. विकेटच्या मागे का इतका दंगा करतोस? वाचा- यावर पंत म्हणाला, मी क्रिकेटचा आनंद घेत असतो. यामुळे संघाचा आत्मविश्वास देखील वाढतो. माझा प्रयत्न असतो की कशाही पद्धतीने संघाला मदत झाली पाहिजे. डोक्यात फक्त तेच सुरू असते. वाचा- ... वाचा- चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिल्या डावात १४६ धावांवर पाच विकेट गमावल्या होत्या. तेव्हा पंतने सुंदरसह शतकी भागिदारी केली. या दोघांनी ११३ धावा केल्या. त्यानंतर पंतने कसोटीमधील तिसरे शतक पूर्ण केले. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०५ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ro24DA
No comments:
Post a Comment