Ads

Wednesday, March 31, 2021

IPL: चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनीला मोठा सेटबॅक, या खेळाडूने घेतली माघार

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाची तयारी करणाऱ्या ( )ला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा सुरू होण्यास फक्त ९ दिवस शिल्लक असताना महेंद्र सिंह धोनी ( )च्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाकडून खेळणाऱ्या एका खेळाडूने स्पर्धेतून नाव मागे घेतले आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चेन्नईची कामगिरी अतीशय खराब झाली होती. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचता आले नव्हे. ही खराब कामगिरी विसरून चेन्नईने या वर्षी जोरदार सराव सुरू केला होता. पण आयपीएलच्या नऊ दिवस आधी त्यांना धक्का बसला आहे. चेन्नईकडून खेळणार ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हेजलवुड( )ने आयपीएलमधून नाव मागे घेतले आहे. चेन्नईची पहिली लढत १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. ही लढत मुंबईत होणार आहे. गुरुवारी हेजलवुडने स्पर्धेतून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. या कारणामुळे घेतली माघार जोशने आयपीएलमधून माघार घेण्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे. त्याला यावर्षी होणाऱ्या एशेज आणि टी-२० वर्ल्डकपसाठी स्वत:ला फिट ठेवायचे आहे. ऑस्ट्रेलियाच्या या जलद गोलंदाजाला बायो बबलच्या नियमांपासून स्वतंत्र कुटुंबासोबत काही वेळ घालवायचा आहे. हेजलेवुडने क्रिकेट.कॉम.एयू शी बोलताना सांगितले की, मी बायो बबल आणि क्वारंटाइनमध्ये १० महिने झाले राहतोय. आता क्रिकेटमधून थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियात घरी पुढील दोन महिने राहणार आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्ज संघाने हेजलवुडला खरेदी केले होते. युएईमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने तीन सामने खेळले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3wjRQGW

IPL 2021 : विराट कोहलीबाबत आरसीबीच्या संघाचा मोठा खुलासा, यावर्षी दिसणार हा बदल...

मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघाला आतापर्यंत एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे कोहलीबाबत यावर्षी एक मोठा बदल करण्यात येणार आहे. आरसीबीच्या संघाने यावेळी याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. आरसीबीला जर आयीपीएलचे जेतेपद पटकावायचे असेल तर त्यासाठी संघात काही बदल करण गरजेचे आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या फलंदाजीच्या स्थानामध्ये आता बदल करण्यात येणार आहे. विराट कोहली यावेळी आरसीबीसाठी सलामीवीराची जबाबदारी पार पाडणार आहे. कोहली यावेळी युवा फलंदाज देवदत्त पडीक्कलबरोबर सलामीला येणार असल्याचे आरसीबीच्या संघाचे डायरेक्टर माइक हेसन यांनी स्पष्ट केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये कोहली रोहित शर्माबरोबर सलामीला आला होता. त्यावेळी कोहलीने धडाकेबाज फलदाजी केली होती. त्यामुळे आरसीबीनेही यावेळी त्याला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कोहली २०१६ साली सलामीवीर म्हणून आरसीबीसाठी खेळला होता. यावेळी सलामीला येताना कोहलीने धावांची उधळण केली होती. कोहलीने या मोसमात तब्बल ९७३ धावा केल्या होत्या, यामध्ये सात अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर या वर्षी आरसीबीचा संघ आयपीएलच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता. पण अंतिम फेरीत आरसीबीला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता. याबाबत माइक हेसन म्हणाले की, " माझ्यासाठी खेळाडूचा फॉर्म सर्वात महत्वाचा आहे. कारण एखादा खेळाडू चांगला फॉर्ममध्ये असला की त्याच्यामध्ये चांगला आत्मविश्वास पाहायला मिळतो. काही जणांनी चांगली कामगिरी केली की त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो, तर काहींचे तसे नसते. आरसीबीसाठी कोहली हा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळेच आरसीबीसाठी तो सलामीला येऊन फलंदाजी करेल. कोहलीला सलामीला येऊन कसे खेळायचे, ही गोष्ट चांगलीच माहिती आहे." त्यामुळे आता तब्बल पाच वर्षांनी कोहली पुन्हा एकदा आरसीबीकडून सलामीला येणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सलामीला येऊन विराटची कामगिरी नेमकी कशी होते आणि तो किती धावा करतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर आरसीबी यावेळी तरी आयपीएलचे जेतेपद जिंकणार का, याचीही उत्सुकता चाहत्यांना असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sGh6VV

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा संघ नव्या जर्सीत चेन्नईमध्ये दाखल, रोहित शर्माचा व्हिडीओ झाला व्हायरल

मुंबई : आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदं पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नईमध्ये दाखल झाला आहे. यावेळी मुंबई इंडियन्सचे खेळाडू नवीन जर्सीमध्ये पाहायला मिळाले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईचा संघ चेन्नईमध्ये नेमका काय करतोय, हा प्रश्न आता सर्वांनाच पडला असेल. पण यावर्षी मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील. यावर्षी करोना व्हायरसमुळे आयपीएलमधील सामने आठ शहरांमध्ये होणार नाहीत. यावेळी ठराविक शहरांमध्येच आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वाधिक सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्सची कामगिरी नेमकी कशी होते, याची उत्सुकता नक्कीच सर्वांना असेल. यावर्षी आता मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे यावर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईची कामगिरी नेमकी कशी होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई १३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई २० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई २९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली ४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली १० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू १६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता २३ मे- विरुद्ध DC- कोलकाता


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fs4CNF

IPL 2021 : लिलावात मिळाला नव्हता या खेळाडूला कोणीही वाली, पण आता लागली आयपीएलची बंपर लॉटरी

मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या ललाट लेखात जे लिहिले आहे, ते घडतेच. अशीच एक गोष्ट इंग्लंडच्या क्रिकेटपटूच्या बाबतीतही पाहायला मिळाली आहे. कारण आयपीएलच्या लिलावात या खेळाडूला कोणीही संघात स्थान दिले नव्हते. त्याच्यावर कोणीही बोली लावण्यास उत्सुक नव्हते. पण या खेळाडूच्या नशिबात आयपीएल खेळणे होते. त्यामुळे या खेळाडूला आता लॉटरी लागली असून आयपीएलमधील एका संघाने त्याला स्थान दिले आहे. हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श हा आता आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनामुळे आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागणार आहे. यासाठी मार्श तयार नसून त्याने आता यावर्षी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हैदराबादच्या संघाला धक्का बसेल असे वाटत होते. पण हैदराबादच्या संघाने आता मार्शच्या बदली इंग्लंचडच्या धडाकेबाज सलामीवीराला संघात स्थान दिले आहे. हैदराबादच्या संघाने आता जेसन रॉयची मिचेल मार्शच्या बदली संघात निवड केली आहे. भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे मालिकेत जेसन रॉयने धडाकेबाज फलंदाजी केली होती. पण त्याला आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही संघाने स्थान दिलेले नव्हते. त्यामुळे आता मार्शच्या जागी हैदराबादच्या संघात जेसनचा समावेश करण्यात आला आहे. करोनामुळे आता आयपीएल खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला बायो-बबलमध्ये यावे लागणार आहे. पण त्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या क्वारंटाइनच्या काळात खेळाडूंच्या करोना चाचण्याही घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांमध्ये निगेटीव्ह आल्यावरच खेळाडूला आयीएलमध्ये खेळता येणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rFqFTJ

IPL 2021 : भारताची धुलाई करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूला लागू शकते आयपीएलची लॉटरी, कशी ते पाहा...

मुंबई : भारतीय गोलंदाजीची जोरदार धुलाई करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूला आता आयपीएलची लॉटरी लागू शकते. कारण सध्याच्या घडीला सनरायझर्स हैदराबादच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता हैदराबादचा संघ इंग्लंडच्या या फलंदाजाला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. हैदराबादचा खेळाडू मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू आता आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनामुळे आयपीएल खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागणार आहे. यासाठी मार्श तयार नसून त्याने आता यावर्षी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर संघात येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारताविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे मालिकेत जेसन रॉयने धडाकेबाज फलंदाजी केली होती. पण त्याला आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्याही संघाने स्थान दिलेले नाही. त्यामुळे आता मार्शच्या जागी हैदराबादच्या संघात जेसनचा समावेश होऊ शकतो, असे सध्याच्या घडीला तरी समजत आहे. पण ही प्रक्रीया हैदराबादला काही दिवसांमध्येच करावी लागणार आहे. कारण ही प्रक्रीया जेवढी लवकर होईल, तेवढ्या लवकर रॉय हा संघात दाखल होऊ शकतो. करोनामुळे आता आयपीएल खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडूला बायो-बबलमध्ये यावे लागणार आहे. पण त्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला सात दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या क्वारंटाइनच्या काळात खेळाडूंच्या करोना चाचण्याही घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांमध्ये निगेटीव्ह आल्यावरच खेळाडूला आयीएलमध्ये खेळता येणार याहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u7F5gW

IPL 2021 : कर्णधार झाल्यावर रिषभ पंत रजनीकांतकडून घेतोय ट्रेनिंग, व्हिडीओ झाला व्हायरल...

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सला आता रिषभ पंतच्या रुपात नवीन कर्णधार मिळाला आहे. पण कर्णधारपद स्विकारल्यावर आता पंत हा रजनीकांत यांच्याकडून ट्रेनिंग घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. पंत आणि रजनीकांत यांचा व्हिडीओ सध्याच्या घडीला व्हायरल झाला आहे. पंतने आपला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पंत हा व्यायाम करत असताना दिसत आहे. या व्हिडीओखाली पंतने लिहिले आहे की, " तुम्हाला स्वत:ला फिट ठेवायचे असेल तर प्रत्येक दिवशी व्यायाम करावा लागतो. आयपीएलच्या नव्या हंगामासाठी आता मी सज्ज झालो आहे. स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोच रजनीकांत यांच्याबरोबर मी काही व्यायामप्रकार केले आहेत. या सेशनचा नक्कीच मला फायदा होईल. दिल्ली कॅपिटल्सची जर्सी घालून मैदानात उतरण्यासाठी मी आतूर झालो आहे." श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तो आता आयपीएल खेळू शकणार नाही. दिल्लीच्या संघाने कर्णधारपदी आता यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतची निवड केली आहे. आतापर्यंत पंतने दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भुषवले नव्हते. पण आता श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळणार नसल्यामुळे त्याच्या जागी पंत हा दिल्लीचे कर्णधारपद सांभाळणार आहे. दिल्लीच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य, पृथ्वी. स्टीव्हन स्मिथ, आर. अश्विन आणि पंत यांच्यांमध्ये स्पर्धा असल्याचे पाहायला मिळाले होते. पण दिल्लीच्या संघाने यावेळी पंतच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. पंत हा दिल्लीचा असून त्याचा फायदा संघाला होईल, असे वाटत आहे. त्यामुळेच पंतकडे यावेळी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने गेल्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यांना जेतेपद पटकावता आले नव्हते. अंतिम फेरीत दिल्लीला मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ कितपत मजल मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे आता पंतची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे कर्णधारपद मिळाल्यावर पंतच्या बॅटमधून किती धावा निघतात, हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39v3g0X

Breking News... रवी शास्त्री यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट, फोटो झाले व्हायरल

मुंबई : सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील वातावरण चिंताजनक आहे आणि त्यामुळेच बरेच राजकारणी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेताना पाहायला मिळतात. पण आज भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली आहे. यावेळी रवी शास्त्री यांचा फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने रविवारी इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना जिंकला आणि मालिका २-१ अशी खिशात टाकली. त्यानंतर आता भारतीय संघातील खेळाडू मुंबईत दाखल झाले असून ते आयपीएलच्या तयारीला लागलेले आहेत. पण रवी शास्त्री यांनी मात्र आज महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोणत्याही क्रीडापटू किंवा खेळाशी संबंधित असलेल्या व्यक्तीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले नव्हते. पण रवी शास्त्री यांनी त्यांची भेट घेतली. पण या भेटीमध्ये नेमकं घडलं तरी काय, हे जाणून घ्यायची इच्छा सर्वांनाच आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचे सध्यातरी समजत आहे. पण या भेटीमध्ये नेमका काय संवाद झाला, हे अजून समजू शकलेले नाही. न्यूज९ या मीडियाने रवी शास्त्री आणि भगत सिंह कोश्यारी यांचा फोटो ट्विट केला आहे. यावर्षी आयपीएल ९ एप्रिलला सुरु होणार आहे. पण आयपीएलमध्ये रवी शास्त्री यांचे काहीच काम नाही. कारण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असल्यामुळे ते कोणत्याही संघाला मार्गदर्शन करु शकत नाही. त्याचबरोबर ते समालोचनही करु शकत नाही. त्यामुळे सध्या जवळपास दीड महिने तरी त्यांना विश्रांती असणार आहे. पण त्यानंतर मात्र भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे या विश्रांतीमध्ये रवी शास्त्री यांना संघाची रणनिती आखण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. कारण यावर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघ महत्वाच्या इंग्लंडच्या दौऱ्यावरही जाणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sF8YVE

IPL 2021 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का, महत्वाचा खेळाडू काही सामन्यांसाठी संघाबाहेर

मुंबई : आयपीएल अजून सुरु झालेली नाही. पण त्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला धक्का बसला आहे. कारण मुंबईच्या संघातील एक महत्वाचा खेळाडू काही सामन्यांसाठी संघाबाहेर राहणार असल्याचे आता दिसत आहे. मुंबई इंडियन्सला क्विंटन डीकॉकने चांगली सुरुवात करून दिली आहे आणि संघाचा तो महत्वाचा खेळाडू आहे. सलामीबरोबरच डीकॉक हा यष्टीरक्षणाचीही जबाबदारी सांभाळतो. पण यावर्षीच्या आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये आपल्याला डीकॉक दिसणार नाही. त्यामुळे डीकॉकच्या जागी इशान किशन हा रोहित शर्माबरोबर सलामीला येऊ शकतो. कारण भारतीय संघाकडून खेळताना इशानने सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. डीकॉकपुढे नेमकी काय आहे समस्या, पाहा... सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या दोन्ही देशांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील तीन सामने २, ४ आणि ७ एप्रिलला होणार आहे. डीकॉक हा दक्षिण आफ्रिकेच्या वनडे संघात आहे. त्यामुळे ७ एप्रिलनंतरच तो आयपीएलसाठी भारतामध्ये रवाना होऊ शकतो. सध्याच्या घडीला करोनामुळे काही नियम बनवण्यात आले आहेत. जर डीकॉकला आयपीएल खेळायचे असेल तर त्याला सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यामुळे डीकॉक मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यांसाठी संघाबाहेर असेल. दक्षिण आफ्रिकेचे नावाजलेले खेळाडू क्विंटन डीकॉक, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्तजे, लुंगी एनगिडी आणि डेव्हिड मिलर हे आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २ एप्रिलपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये हे सर्व खेळाडू खेळणार आहे. ही मालिका संपल्यावरही या खेळाडूंना थेट आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. कारण ही मालिका संपल्यावर ते भारतामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांना क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये या खेळाडूंची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये जर ते निगेटीव्ह सापडले तरच त्यांना आयपीएलमध्ये खेळता येणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39umcNq

IPL 2021 : जोफ्रा आर्चरच्या चुकीमुळे राजस्थान रॉयल्सला बसला मोठा फटका, पाहा नेमकं घडलं तरी काय...

मुंबई : जोफ्रा आर्चर हा राजस्थान रॉजस्थान रॉयल्सचा हुकमी एक्का होता. पण आर्चरच्या एका चुकीमुळे आता राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. आर्चरकडून नेमकी कोणती चुक झाली, जी आता संघाला महागात पडणार आहे, पाहा... इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या हाताला काचेमुळे झालेली जखम भारताविरुद्धच्या मालिकेत त्याला त्रासदायक ठरली होती. त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात ती काच घुसल्याचे निदान झाले होते. त्यावर नंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. इंग्लंड संघाचे संचालक अॅशले गाइल्स यांनी आर्चरसंदर्भात सविस्तर माहिती देताना हे स्पष्ट केले. सोमवारी आर्चरच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. घरातील फिश टँक धूत असताना तो फुटला आणि त्याची काच आर्चरच्या बोटात शिरल्याचे लक्षात आले आहे. गाइल्स यांनी बीसीसीच्या एका कार्यक्रमात सांगितले की, आर्चरवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांना त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात काचेचा तुकडा सापडला. नंतर ती जखम भरली पण तो तुकडा अजूनही त्याच्या बोटात असल्याचे दिसते आहे. घरी माशांचा टँक धूत असताना तो खाली पडला आणि फुटला. त्यादरम्यान ही जखम त्याला झाली. भारत दौऱ्याआधी ही घटना घडली होती. मात्र तरीही त्याने कसोटी आणि टी-२० मालिकेत इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केले. वनडे मालिकेआधी त्याच्या या बोटाची व्यवस्थित तपासणी केली जावी असे संघव्यवस्थापनाचे मत पडले. त्याशिवाय, त्याच्या हाताच्या कोपरालाही दीर्घकाळ जी दुखापत जाणवत होती, त्याचीही पाहणी केली जाणार होती. आर्चरने कसोटी मालिकेत ४ बळी घेतले आणि टी-२० मालिकेत त्याने ७ फलंदाजांना बाद केले. टी-२० मालिका झाल्यानंतर मात्र तो मायदेशी परतला. आर्चरच्या कोपराला झालेल्या दुखापतीबाबत गाइल्स म्हणाले की, टी-२० मालिकेदरम्यान ही दुखापत त्याला त्रासदायक ठरू लागली होती. वेदनाशामक गोळ्या घेतल्याशिवाय त्याला खेळता येणेच शक्य नव्हते. आता त्याच्या या दोन्ही समस्या लवकरच सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतरच तो पुन्हा मैदानात उतरू शकेल. लवकरच तो पुन्हा खेळू लागेल अशी आशा आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31wtewv

Tuesday, March 30, 2021

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील भांडण कोणी मिटवलं, पाहा ही व्यक्ती आहे तरी कोण...

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याचे वृत्त बऱ्याचदा प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. त्याचबरोबर गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलनंतर जेव्हा रोहितीची निवड ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी करण्यात आली नव्हती तेव्हा त्याचे विराटबरोबर काही तरी बिनसले असल्याची चर्चा होती. पण आता विराट आणि रोहित यांच्यामधील भांडण मिटले आहे. एका खास व्यक्तीने रोहित आणि विराट यांच्यामधील भांडण मिटवल्याचे आता समोरही आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, विराट आणि रोहित एकमेकांबरोबरचे मतभेद दूर करण्यासाठी एका टेबलवर बसले होते. विराट आणि रोहित यांच्यामधील मतभेद मिटवण्याचे श्रेय यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जाते. कारण यासाठी रवी शास्त्री यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. यावेळी या दोघांनीही आपले मुद्दे मांडले. बायो-बबलमुळे खेळाडूंच्या मानसीकतेवर परीणाम होत असल्याचे बोलले जात असले, तरी शास्त्री यांनी मात्र विराट आणि रोहित यांच्यातील मतभेद दूर केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला त्यांच्या सूत्रांनी सांगितले की, " गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय संघातील वातावरण चांगले नव्हते. खेळाडूंमधील संबंध चांगले नव्हते. संघातील खेळाडूंमध्ये असलेल्या कटुपणाचा फायदा अन्य लोकं उचलतात आणि संघाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे संघातील खेळाडूंनी कसे एकत्रपणे राहावे आणि कसा एकमेकांच्या मताचा आदर करावा, हे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विराट आणि रोहित यांच्यातील मतभेद दूर झाल्याचे पाहायला मिळाले." आतापर्यंत बऱ्याचवेळी विराट आणि रोहित यांची मत भिन्न असल्याचे पाहायला मिळते. २०१९ साली झालेल्या विश्वचषकानंतरही रोहित नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर आयपीएलनंतर तर या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात होते. पण या सर्व गोष्टींमुळे संघ दिशाहीन होतो आणि त्यामुळे भरपूर नुकसान होते. त्यामुळे एखाद्या खेळाडूच्या हितापेक्षा संघ नक्कीच महत्वाचा आहे. त्यामुळे विराट आणि रोहित यांच्यामधील मतभेद काही दिवसांपूर्वी मिटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट रोहितचा सल्ला घेत असल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता विराट आणि कोहली यांच्यातील मतभेद मिटल्याचेच दिसत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PKi5G0

सॅम करनमध्ये दिसते महेंद्रसिंग धोनीची झलक, इंग्लंडच्या कर्णधाराकडून खास कौतुक

पुणे : ‘मला खात्री आहे, की या खेळीबद्दल सॅमला महेंद्रसिंह धोनीशी बोलायला आवडेल. मला तर सॅममध्ये धोनीचीच झलक बघायला मिळाली. धोनीही सामना अखेरपर्यंत रोमहर्षक स्थितीत घेऊन जात असे,’ अशी प्रतिक्रिया इंग्लंड क्रिकेट संघाचा बदली कर्णधार जोस बटलर याने व्यक्त केली. भारताने तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात इंग्लंडला सात धावांनी नमविले. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२९ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने इंग्लंडची ७ बाद २०० अशी स्थिती केली होती. या वेळी भारताचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, सॅम करनने चिवट लढा दिल्याने भारतीय संघात चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. सॅमने आदिल रशीदसह आठव्या विकेटसाठी ५७ आणि मार्क वूडसह नवव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचून इंग्लंडच्या विजयाच्या समीप पोहोचविले होते. इंग्लंडला विजयासाठी अखेरच्या षटकात १४ धावांची गरज असताना वूड धावबाद झाला आणि सॅमला इंग्लंडला विजय मिळवून देणे शक्य झाले नाही. सॅमने ८३ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ९५ धावा केल्या. २२ वर्षीय सॅम आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळतो. गेल्या वर्षी चेन्नईने त्याला साडेपाच कोटी रुपयांत संघात सामावून घेतले होते. यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अष्टपैलू सॅमला काही सामन्यांत सलामीला पाठविले होते. धोनीच्याच तालमीत तयार झालेला सॅम भारताविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेत सामनावीर ठरला. लढतीनंतर बटलर म्हणाला, ‘सॅमची खेळी जबरदस्त होती. आम्ही लढत गमावली असली, तरी त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एक हाती सामना कसा जिंकून द्यावा, हे यातून नक्कीच शिकावे. तो सामन्यागणिक प्रगती करीत आहे. तो अवघा २२ वर्षांचा आहे. अनेकांना कारकिर्दीत अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करता येत नाही.’ सॅमने भारताच्या ऋषभ पंतची विकेटही घेतली. आठव्या क्रमांकावरील वन-डेतील सर्वोच्च खेळीच्या जागतिक विक्रमाशी त्याने बरोबरी केली. २०१६मध्ये इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ९५ धावांची खेळी केली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cAMOhN

IPL 2021 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स, चेन्नई आणि दिल्लीच्या संघांना मोठे धक्के, पाहा काय घडलं...

नवी दिल्ली : यावर्षीची आयपीएल अजून सुरु झालेली नाही. पण त्यापूर्वीच मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांना धक्के बसायला सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला सर्वच आयपीएलचे संघ तयारीला लागले आहेत. सर्व संघांचे कॅम्प सुरु असून येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्या सरावालाही सुरुवात होणार आहे. पण आता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघातील काही खेळाडू संपूर्ण आयपीएल खेळू शकत नाही, असे दिसत आहे. कारण या संघांतील काही खेळाडूंना आयपीएलमधील काही सामना खेळता येणार नाहीत. त्यामुळे या संघांसाठी हा एक मोठा धक्काच असेल. सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेट मालिका सुरु आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे नावाजलेले खेळाडू क्विंटन डीकॉक, कागिसो रबाडा, एन्रीच नॉर्तजे, लुंगी एनगिडी आणि डेव्हिड मिलर हे आयपीएलमधील काही सामने खेळू शकणार नाहीत. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २ एप्रिलपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेमध्ये हे सर्व खेळाडू खेळणार आहे. ही मालिका संपल्यावरही या खेळाडूंना थेट आयपीएलमध्ये खेळता येणार नाही. कारण ही मालिका संपल्यावर ते भारतामध्ये दाखल होतील आणि त्यानंतर त्यांना क्वारंटाइन व्हावे लागणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये या खेळाडूंची करोना चाचणीही करण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये जर ते निगेटीव्ह सापडले तरच त्यांना आयपीएलमध्ये खेळता येणार आहे. डीकॉक हा मुंबई इंडियन्सच्या संघआतील अविभाज्य भाग होता. कारण रोहित शर्माबरोबर डीकॉक हा सलामीला यायचा आणि संघाला चांगली सुरुवात करुन द्यायचा. पण यावर्षीच्या आयपीएलच्या काही सामन्यांमध्ये आपल्याला डीकॉक दिसणार नाही. त्यामुळे डीकॉकच्या जागी इशान किशन हा रोहित शर्माबरोबर सलामीला येऊ शकतो. कारण भारतीय संघाकडून खेळताना इशानने सलामीवीराची भूमिका पार पाडली आहे. दिल्लीच्या संघाला या गोष्टीचा मोठा फटका बसणार आहे. कारण दिल्लीच्या संघात वेगवान गोलंदाज हे दक्षिण आफ्रिकेचे आहेत. त्यामुळे दिल्लीच्या संघाला यावेळी सर्वाधिक फटका बसू शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39KeLBZ

IPL 2021 : बीसीसीआयने यंदाच्या आयपीएलसाठी नियमांमध्ये केले मोठे बदल, जाणून घ्या...

नवी दिल्ली : यावर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी बीसीसीआयने नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये चाहत्यांना वेगळीच रंजकता पाहायला मिळणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेमध्ये तिसऱ्या पंचांचे निर्णय काही वेळा वादग्रस्त ठरले होते. काही वेळा तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला असताना मैदानावरील पंचांनी नेमका काय निर्णय दिला आहे, या गोष्टीला जास्त महत्व दिले जायचे. पण आता आयपीएलमध्ये तसे होणार नाही. कारण यावर्षी आयपीएलमध्ये मैदानातील पंच जे सॉफ्ट सिग्नल द्यायचे, त्याचे महत्व जास्त राहणार नाही आणि पंचांना आपला निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. बऱ्याचदा पंचांनी सॉफ्ट सिग्नल म्हणून एखाद्या खेळाडूला बाद दिले तर तिसऱ्या पंचांना त्याला महत्व द्यावे लागायचे. त्यामुळे काही चुकीचे निर्णयही या मालिकेत घेतले गेल्याचे पाहायला मिळाले. पण आयपीएलमध्ये मात्र आता तसे होताना दिसणार नाही. मैदानातील पंच सॉफ्ट सिग्नल देतील, पण तिसऱ्या पंचांनी योग्य चाचपणी करून आपला निर्णय द्यायला आहे, त्यामध्ये सॉफ्ट सिग्नलचे महत्व आता जास्त राहणार नाही आयपीएलचे सामने हे उशिरापर्यंत चालतात, अशीही ओरड काही जणांकडून सुरु होती. या गोष्टीला लगाम घालण्याचाा प्रयत्न बीसीसीआयने केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण यावेळी प्रत्येक संघाने आपली २० षटके ९० मिनिटांमध्येच संपवायची आहेत, असा नविन नियम बीसीसीआयने आयपीएलसाठी बनवला आहे. जर हा नियम मोडीत काढला तर संघातील कर्णधारासह खेळाडूंना दंड होऊ शकतो. त्याचबरोबर ही गोष्ट दोनवेळा घडली तर संघाच्या कर्णधारावर कडक कारवाई होऊ शकते आणि कदाचित कर्णधाराला काही सामन्यांमध्ये खेळताही येऊ शकणार नाही. त्यामुळे बीसीसीआयने नविन बनवलेले आयपीएलचे हे नियम कसे अंमलात आणले जातात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. आयपीएलमध्ये यावेळी तिसरे पंच कशी भुमिका वठवतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. कारण भारत आणि इंग्लंड यांच्याती मालिकेत तिसऱ्या पंचांनी काही वादग्रस्त निर्णयही दिले होते. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये नेमकं वेगळं काय पाहायला मिळतं, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. यावर्षीचे आयपीएल ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m5sO9T

IPL 2021 : मोठी घोषणा... दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची झाली निवड, अजिंक्य आणि पृथ्वी शॉ स्पर्धेतून बाहेर

नवी दिल्ली : आयपीएलमधील दिल्ली कपिटल्सच्या संघाने आता मोठी घोषणा केली असून त्यांनी या हंगामासाठी आपल्या कर्णधाराची निवड केली आहे. कर्णधाराच्या स्पर्धेतून आता अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ हे दोघेही बाहेर पडले आहेत. दिल्लीच्या संघाने कर्मधारपदी आता यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतची निवड केली आहे. आतापर्यंत पंतने दिल्लीच्या संघाचे कर्णधारपद भुषवले नव्हते. पण आता श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये खेळणार नसल्यामुळे त्याच्या जागी पंत हा दिल्लीचे कर्णधारपद सांभाळणार आहे. दिल्लीच्या कर्णधारपदासाठी अजिंक्य, पृथ्वी. स्टीव्हन स्मिथ, आर. अश्विन आणि पंत यांच्यांमध्ये स्पर्धा असल्याचे पाहायला मिळाले होते. पण दिल्लीच्या संघाने यावेळी पंतच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. पंत हा दिल्लीचा असून त्याचा फायदा संघाला होईल, असे वाटत आहे. त्यामुळेच पंतकडे यावेळी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा खांदा दुखावला गेला होता. त्यामुळे तो आता आयपीएल खेळू शकणार नाही. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने गेल्या आयपीएलमध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण त्यांना जेतेपद पटकावता आले नव्हते. अंतिम फेरीत दिल्लीला मुंबई इंडियन्सच्या संघाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ कितपत मजल मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. दिल्लीच्या संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगबरोबर संवाद साधल्यानंतर पंतच्या नावावर कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते आहे. त्यामुळे पंत आणि पॉन्टिंग यंदाच्या आयपीएलमध्ये संघाची बांधणी कशी करतात आणि काय रणनिती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत असताना पंतची फलंदाजी कशी होते, याकडेही सर्वांचे लक्ष असेल. कारण कर्णधारपदाचा खेळाडूच्या कामगिरीवरही परीणाम होतो, असे पाहिले गेले आहे. त्यामुळे पंतच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cz33f2

उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊनच्या वक्तव्यावर हरभजन सिंगने भूमिका मांडली, ट्विट झाले व्हायरल

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये लॉकडाऊनचा इशारा दिलेला आहे. जर राज्यातील नियम कडकपणे पाळले गेले नागीत, तर महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन पुन्हा लावण्यात येऊ शकतो, असे ठाकरे म्हणाले आहेत. पण ठाकरे यांच्या या निर्णयानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने आपले मत व्यक्त केले आहे. हरभजनचे ट्विट आता चांगलेच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. करोनाबाबतचे जे नियम आहेत ते लोकं पाळत नसल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे हे असेच सुरु राहिले तर लॉकडाऊन लावाले लागेल, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले होते. ठाकरे यांच्या या मतानंतर हरभजन लोकांवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. हरभजनने याबाबत एक ट्विट केले आहे. याबाबत हरभजन म्हणाला की, " लोकांना नेमकं काय करावं हेच समजत नसेल तर लॉकडाऊन लावायलाच हवं. ही लोकं कधी समजूतीने वागणार, हेच समजत नाही..." महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात जास्त करोनाचे रुग्ण आढळत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे जर परिस्थिती आणखीन खालावत गेली तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिला आहे. देशात करोनाच्या नवीन रुग्णांची वाढती संख्या आणि लसीकरण मोहीमेबाबत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज माहिती दिली. देशात प्रामुख्याने १० जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, नांदेड, अहमदनगर, दिल्ली आणि बेंगळुरू शहर यांचा यात समावेश आहे. राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागाने राज्यातील उत्पादकांना दिले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाने आज अधिसूचना काढली असून ती ३० जून पर्यंत राज्यभर लागू राहणार आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सीजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सीजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सीजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सीजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w7kueF

क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं, दोन्ही संघांना टार्गेटच नाही कळलं...

नवी दिल्ली : क्रिकेटच्या इतिहासामध्ये कदाचित ही गोष्ट पहिल्यांदाच घडलेली असेल. कारण सामन्याची दुसरी इनिंग सुरु झाल्यावरही दोन्ही संघांना नेमकं टार्गेट काय आहे, हेच समजू शकलं नाही. आतापर्यंत ही गोष्ट यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती, पण आज ही गोष्ट घडली आहे. नेमकं घडलं तरी काय...न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये आज ट्वेन्टी-२० सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडची पहिली फलंदाजी होती. न्यूझीलंडच्या संघाने १७.५ षटकांत ५ बाद १७३ अशी मजल मारली होती. त्यावेळी मैदानात पावसाचे आगमन झाले. पाऊस जोरदार पडत असल्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. पाऊस संपल्यावर न्यूझीलंडचा फलंदाजीची संधी न देता डकवर्थ-लुईस नियमांनुसार सामना खेळवण्याचा निर्णय देण्यात आला. न्यूझीलंड फलंदाजी करणार नसल्यामुळे आता बांगलादेशचा संघ फलंदाजीला उतरला होता. पण मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या सलामीवीरांना किती धावांचे टार्गेट आहे, हेच समजू शकले नाही. त्याचबरोबर किती धावांचे आव्हान बांगलादेशच्या समोर ठेवण्यात आले असून त्याचा बचाव करायचा आहे, हेदेखील न्यूझीलंडच्या संघाला समजू शकले नाही. कारण बांगलादेशचे खेळाडू तीन चेंडू खेळूनही झाले होते, पण त्यांना किती धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा हे समजू शकले नव्हते. डकवर्थ-लुईस नियमांनुसार बांगलादेशला किती धावांचे आव्हान द्यायचे, या समीकरणामध्या सामनाधिकारी मार्टिन क्रो हे पुरते गोंधळून गेले होते. ते सातत्याने डकवर्थ-लुईस नियमांनुसार किती धावांचे आव्हान द्यायचे, यामध्येच गोंधळून गेले होते. त्यानंतर बांगलादेशचे प्रशिक्षक मार्टिन यांना जाऊन भटले आणि त्यानंतर अखेर बांगलादेशला विजयासाठी १६ षटकांमध्ये १७१ धावांचे आव्हान देण्यात आले होते. या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग बांगलादेशच्या संघाला करता आला नाही, कारण त्यांना यावेळी १४२ धावांवरच समाधान मानावे लागले. न्यूझीलंडच्या संघाने यावेळी हा सामना डकवर्थ-लुईस नियमांनुसार २८ धावांनी जिंकल्याचे पाहायला मिळाले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PEo4fw

IPL : मुंबई इंडियन्स यावर्षीच्या आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचणार का, पाहा सुनील गावस्कर काय म्हणाले...

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यंत आयपीएलचे पाचवेळा विक्रमी जेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर यावर्षी विजयी हॅट्रिक साजरी करण्यासाठी रोहितच्या शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. पण यावर्षी मुंबई इंडियन्सचा संघ कुठपर्यंत मजल मारेल, याबद्दलचे भाकित भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. गावस्कर म्हणाले की, " मुंबई इंडियन्सला पराभूत करणं, हे सर्वात कठीण काम आहे. कारण आतापर्यंत मुंबई इंडियन्सचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे आपण पाहिले आहे. मुंबई इंडियन्समधील खेळाडूंनी भारतीय संघातून खेळताना दिमाखदार कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी पदार्पणातच धमाकेदार कामगिरी केली आहे. हार्दिक पंड्या आता गोलंदाजी करत असून मुंबई इंडियन्ससाठई ही जमेची बाजू असेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे खेळाडू आयपीएलपूर्वीच चांगल्या फॉर्ममध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे." गावस्कर पुढे म्हणाले की, " मुंबई इंडियन्स यावर्षीही आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकते. कारण मुंबईचा संघ मुख्य दावेदारांपैकी एक आहे. रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्सच्या संघाचे नेतृत्व आहे. त्याचडबरोबर सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक आणि कृणाल पंड्या, जसप्रीत बुमरा, कायरन पोलार्ड, ट्रेंट बोल्ट, असे दर्जेदार खेळाडू मुंबई इंडियन्सकडे आहेत. त्यामुळेच मुंबई इंडियन्सला पराभूत करणे, ही सोपी गोष्ट नक्कीच नाही." मुंबई इंडियन्सचा संघ यावर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील. मुंबई इंडियन्सने २०१९ साली देखील मुंबईने विजय मिळवला होता. आता मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m43nWk

भारतीय खेळाडूंना महागात पडली क्रिकेट सीरिज, चौथा खेळाडू झाला करोना पॉझिटीव्ह

मुंबई : भारतीय खेळाडूंना क्रिकेट सीरीज आता चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आता भारताचा चौथा खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला आहे. त्यामुळे भारतीय संघात सध्याच्या घडीला चिंतेचे वातावरण आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज संपल्यावर भारतीय संघातील खेळाडू एकामागून एक करोना पॉझिटीव्ह सापडत आहेत. सर्वप्रथम भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला करोना झाला होता. त्यानंतर या संघातील युसूफ पठाणला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर एस. बद्रीनाथलाही करोना झाला होता. आता तर इरफान पठाणही करोना पॉझिटीव्ह सापडला आहे. त्यामुळे रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ही भारतीय खेळाडूंना चांगलीच महागात पडलेली पाहायला मिळत आहे. करोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर इरफान पठाणने एक ट्विट केले आहे. यामध्ये इरफान म्हणाला की, " मी करोना पॉझिटीव्ह सापडलो आहे. त्यामुळे मी आता घरामध्येच क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या, त्यांनी आता करोना चाचणी करुन घ्यायला हवी. त्याचबरोबर सुरक्षिततेचे काही उपाय आपण सर्वांनीच पाळायला हवे. सर्वांनीच मास्क वापरायला हवा, त्याचबरोबर सुरक्षित अंतरही ठेवायला हवे. तुम्हा सर्वांचेच आरोग्य सुरक्षित राहावे, हीच इच्छा आहे." रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज संपल्यावर सचिन तेंडुलकर करोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर आता या स्पर्धेत खेळलेल्या सर्व खेळाडूंना करोना चाचणी करावी लागणार आहे. कारण हे सर्व खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिनबरोबर खेळत होते. त्यामुळे सचिनला करोना झाल्यावर युसूफ पठाण आणि आता एस. बद्रीनाथ यांनाही करोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघात जे खेळाडू होते, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही यावेळी करोनाची चाचणी करावी लागणार आहे. खेळाडू आपल्या घरी पोहोचल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही यावेळी करोनाची चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. सचिन तेंडुलकर, युसूफ आणि बद्रीनाथ ज्यांना ज्यांना भेटले होते, त्यांना आता करोनाची चाचणी करावी लागणार आहे. यामध्ये आता इरफान पठाणचीही भर पडली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PHR0Dn

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील भांडण कोणी मिटवलं, पाहा ही व्यक्ती आहे तरी कोण...

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याचे वृत्त बऱ्याचदा प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. त्याचबरोबर गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलनंतर जेव्हा रोहितीची निवड ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी करण्यात आली नव्हती तेव्हा त्याचे विराटबरोबर काही तरी बिनसले असल्याची चर्चा होती. पण आता विराट आणि रोहित यांच्यामधील भांडण मिटले आहे. एका खास व्यक्तीने रोहित आणि विराट यांच्यामधील भांडण मिटवल्याचे आता समोरही आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, विराट आणि रोहित एकमेकांबरोबरचे मतभेद दूर करण्यासाठी एका टेबलवर बसले होते. विराट आणि रोहित यांच्यामधील मतभेद मिटवण्याचे श्रेय यावेळी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जाते. कारण यासाठी रवी शास्त्री यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. यावेळी या दोघांनीही आपले मुद्दे मांडले. बायो-बबलमुळे खेळाडूंच्या मानसीकतेवर परीणाम होत असल्याचे बोलले जात असले, तरी शास्त्री यांनी मात्र विराट आणि रोहित यांच्यातील मतभेद दूर केले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला त्यांच्या सूत्रांनी सांगितले की, " गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतीय संघातील वातावरण चांगले नव्हते. खेळाडूंमधील संबंध चांगले नव्हते. संघातील खेळाडूंमध्ये असलेल्या कटुपणाचा फायदा अन्य लोकं उचलतात आणि संघाचे मोठे नुकसान होते. त्यामुळे संघातील खेळाडूंनी कसे एकत्रपणे राहावे आणि कसा एकमेकांच्या मताचा आदर करावा, हे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर विराट आणि रोहित यांच्यातील मतभेद दूर झाल्याचे पाहायला मिळाले." आतापर्यंत बऱ्याचवेळी विराट आणि रोहित यांची मत भिन्न असल्याचे पाहायला मिळते. २०१९ साली झालेल्या विश्वचषकानंतरही रोहित नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर आयपीएलनंतर तर या दोघांमध्ये विस्तवही जात नसल्याचे म्हटले जात होते. पण या सर्व गोष्टींमुळे संघ दिशाहीन होतो आणि त्यामुळे भरपूर नुकसान होते. त्यामुळे एखाद्या खेळाडूच्या हितापेक्षा संघ नक्कीच महत्वाचा आहे. त्यामुळे विराट आणि रोहित यांच्यामधील मतभेद काही दिवसांपूर्वी मिटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट रोहितचा सल्ला घेत असल्याचेही पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता विराट आणि कोहली यांच्यातील मतभेद मिटल्याचेच दिसत आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w5Pzzj

Monday, March 29, 2021

IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे यावर्षी कोणाबरोबर कधी सामने होणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक...

मुंबई : मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विक्रमी पाचवे विजेतेपद मिळवले होते. आता मुंबई इंडियन्सचा संघ सहावे जेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. पण यावर्षी मुंबई इंडियन्सचे सामने कोणत्या संघाबरोबर आणि कधी होणार आहेत, जाणून घ्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यांचे पूर्ण वेळापत्रक... मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई १३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई २० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई २९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली ४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली १० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू १६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता २३ मे- विरुद्ध DC- कोलकाता यावर्षी मुंबई इंडियन्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील. यावर्षी करोना व्हायरसमुळे आयपीएलमधील सामने आठ शहरांमध्ये होणार नाहीत. यावेळी ठराविक शहरांमध्येच आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सर्वाधिक सामने चेन्नईमध्ये खेळणार आहे. त्यामुळे चेन्नईच्या मैदानात मुंबई इंडियन्सची कामगिरी नेमकी कशी होते, याची उत्सुकता नक्कीच सर्वांना असेल. मुंबई इंडियन्सने २०१९ साली देखील मुंबईने विजय मिळवला होता. आता मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rykfpk

IPL 2021 : यावर्षीच्या आयपीएलसाठी रोहित शर्माने आखला खास प्लॅन, पाहा काय म्हणाला...

मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच विक्रमी जेतेपदे पटकावली आहे. आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला किंवा कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत पाच जेतेपदे पटकावता आलेली नाहीत. पण यावर्षीच्या आयपीएलसाठी रोहित शर्माने नवीन प्लॅन आखला आहे. रोहितच्या प्लॅनचा व्हिडीओ सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल्यावर रोहित शर्मा म्हणाला की, " आतापर्यंत आयपीएलची पाच जेतेपदे आम्ही पटकावली आहेत. पण जिंकण्याची भुक आता वाढवायला हवी. लोभाबरोबर आता मैत्री करायला हवी. हाच आहे मोठा मंत्र..." रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळताना संघाला तब्बल पाचवेळा जेतेपद पटकावून दिले आहे, हा आयपीएलमधील एक विक्रमही आहे. आतापर्यंत कोणत्याही कर्णधारा रोहितचा हा विक्रम मोडता आलेला नाही. त्यामुळे आता रोहित सहाव्यांदा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घालणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सोमवारी मुंबईत दाखल झाला. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका भारताने २-१ने जिंकली आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्माचे पुढील मिशन सुरू झाले. मुंबई इंडियन्सने आयपीएलची पाच विजेतेपद मिळवली आहेत. आता या वर्षी त्यांची नजर सलग तिसऱ्या विजेतेपदावर असेल. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एका गाडीतून रोहित शर्मा मुंबईत दाखल झाल्याचे दिसते. रोहित शर्मा बरोबरच भारतीय संघातील हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे देखील मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाले. संघात दाखल झाल्यावर सूर्यकुमार काय म्हणाला की, " सध्याच्या घडीला मी सर्वात आनंदी आहे. कारण भारतीय संघाकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते आणि आता ते साकार झाले आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतीय संघाचे एक भाग होणे, ही माझ्यासाठी सुखावणारी गोष्ट आहे. पण आता भारतीय संघाची जबाबदारी संपलेली आहे आणि आता मी माझ्या कुटुंबामध्ये दाखल झालो आहे. मुंबई इंडियन्स हे माझ्या घरासारखेच आहे. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी मी सज्ज झालो आहे."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3fj4XlU

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल्यावर सूर्यकुमार यादवने दिली पहिली प्रतिक्रीया, म्हणाला...

मुंबई : भारताचा चर्चेतला खेळाडू सूर्यकुमार यादव इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यावर थेट मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. सूर्यकुमारला खऱ्या अर्थाने ओळक मिळवून दिली ती मुंबई इंडियन्सने. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल्यावर सूर्यकुमारने आपली पहिली प्रतिक्रीया दिला आहे. सूर्यकुमारचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाल्यावर म्हणाला की, " सध्याच्या घडीला मी सर्वात आनंदी आहे. कारण भारतीय संघाकडून खेळण्याचे माझे स्वप्न होते आणि आता ते साकार झाले आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. भारतीय संघाचे एक भाग होणे, ही माझ्यासाठी सुखावणारी गोष्ट आहे. पण आता भारतीय संघाची जबाबदारी संपलेली आहे आणि आता मी माझ्या कुटुंबामध्ये दाखल झालो आहे. मुंबई इंडियन्स हे माझ्या घरासारखेच आहे. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी मी सज्ज झालो आहे." सूर्यकुमार गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्सकडून सातत्यपूर्ण फलंदाजी करत आहे. गेल्या हंगामातही सूर्यकुमारने दमदार फलंदाज केली होती. त्यामुळेच त्याला जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी संधी मिळाली नव्हती, तेव्हा बऱ्याच चाहत्यांना वाईट वाटले होते. त्यानंतर चाहत्यांनी विराट कोहली आणि भारतीय निवड समितीला ट्रोलही केले होते. पण अखेर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सूर्यकुमारची भारतीय संघात निवड करण्यात आली. सूर्यकुमारने पदार्पणातच दिमाखदार कामगिरी केली आणि आपले संघातील स्थान टिकवले आहे. सूर्यकुमार हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा अक अविभाज्य भाग बनलेला आहे. कारण जेव्हा कर्णधार रोहित शर्मा किंवा अन्य फलंदाज लवकर बाद होतात, तेव्हा सूर्यकुमार संघाचा डाव सारवत असतो आणि हे आतापर्यंत सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे आता भारतीय संघातून खेळल्यानंतर सूर्यकुमार मुंबई इंडियन्सकडून खेळताना कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल. इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यावर सूर्यकुमार मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल झाला आहे. त्यामुळे आता सराव करण्यात सूर्यकुमार मग्न असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tYGxly

टीम इंडियाचा अनोखा विक्रम; तर रोहित शर्मा ८ वर्षात प्रथमच ठरला अपयशी

पुणे: भारताने तिसऱ्या वनडेत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ने जिंकली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३२९ धावा केल्या. उत्तरा दाखल इंग्लंडला ९ बाद ३२२ धावा करता आल्या. या सामन्यात भारतीय संघाने एक अनोखा विक्रम केलाय. वाचा- भारतीय संघ १९७४ पासून वनडे सामने खेळत आहे. गेल्या ४७ वर्षात भारताने प्रथमच सलग सहा वनडे सामन्यात ३०० पेक्षा अधिक धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तीनही सामन्यात भारताने ३००पेक्षा अधिक धावा केल्या. त्याआधी भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन वनडेत ३००पेक्षा अधिक धावा केल्या. वाचा- इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत ३१७, दुसऱ्या वनडेत ३३६ तर तिसऱ्या वनडेत ३२९ धावा केल्या. भाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत ३०८, ३३८ आणि ३०२ धावा केल्या होत्या. पण तेव्हा भारताने पहिल्या दोन लढती गमावल्या होत्या तर अखेरची लढत जिंकली होती. वाचा- रोहित शर्मा ठरला अपयशी भारतीय संघाचा स्टार सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ९० धावा केल्या. त्याने पहिल्या वनडेत २८, नंतर २५ तर अखेरच्या सामन्यात ३७ धावा केल्या. रोहितने चांगली फलंदाजी केली असली तरी त्याला मोठी धावासंख्या करता आली नाही. मालिकेत त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. २०१३ नंतर प्रथमच रोहितला एखाद्या वनडे मालिकेत अर्धशतक करता आले नाही. वाचा- २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहितला अर्धशतक करता आले नव्हते. त्या मालिकेत रोहित अखेरची मॅच खेळला नव्हता. रोहितने आफ्रिकेविरुद्धच्या त्या मालिकेत १८, १९ धावा केल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w9hNJq

IND vs ENG : 'या' खेळाडूशिवाय भारताच्या संघाचा विचारच करु शकत नाही, इंग्लंडच्या खेळाडूकडून कौतुक

पुणे, : भारतीय संघ सध्याच्या घडीला जोरदार फॉर्मात आहे. भारताने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या मात्तबर संघांना धुळ चारली आहे. पण भारताचे भविष्यही उज्वल असल्याचे म्हटले जात आहे. भारताच्या भविष्याबाबत इंग्लंडच्या एका खेळाडूने सुचक वक्तव्य केलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यापेक्षा दुसराच एक खेळाडू भारताचे भविष्य असल्याचे या खेळाडूने सांगितले आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू इयान बेलने यावेळी सांगितले की, " रिषभ पंतविना मी भारताच्या संघाचा विचारही करु शकत नाही. माझ्यामते पंत हा भारतीय संघाचे भविष्य आहे. त्याचबरोबर एक जगविख्यात खेळाडू होण्याकडे त्याची वाटचाल सुरु झाली आहे. पंतकडे जी गुणवत्ता आहे ती बऱ्याच जणांमध्ये पाहायला मिळत नाही. पंतकडे असलेली गुणवत्ता फार कमी लोकांमध्ये असते. त्यामुळे पंत हा एक अविश्वसनीय कामगिरी करणारा खेळाडू आहे, त्याचबरोबर तो एक मॅचविनरही आहे." पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ९७ धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात नाबाद ८९ धावांची खेळी साकारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले होते. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पंतने शतकही झळकावले होते. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यांमध्येही पंतने दमदार अर्धशतकी खेळी साकारली होती. चौथ्या वनडेमध्ये तर पंतची खेळी ही भारताकडून सर्वोत्तम अशीच ठरली होती. बेल पुढे म्हणाला की, " पंतसाठी इंग्लंडविरुद्धची मालिका खरंच चांगली गेली. कारण तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पंतने इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. पंत हा फक्त आक्रमक फटकेबाजी करतो आणि आपली विकेट गमावतो, असे त्याच्याबाबत म्हटले गेले आहे. त्याचबरोबर पंत हा जास्त जोखीम घेऊन फटकेबाजी करतो, असेही म्हटले गेले आहे. पण पंतमध्ये एक शांतचित्त फलंदाजही दडलेला आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात ही गोष्ट मला जाणवली. त्यामुळे पंत हा निश्चितच भारताचे भविष्य असून तो एक जगविख्यात खेळाडूही बनू शकतो."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PBhtCy

पराभवानंतर देखील इंग्लंड अव्वल स्थानी; भारत तर अफगाणिस्तान, बांगलादेशच्या मागे

पुणे: अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव केला आणि मालिका २-१ने जिंकली. या विजयासह भारताने आयसीसी पुरुष क्रिकेट ()च्या गुणतक्त्यात सातवा क्रमांक मिळवला. वाचा- भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत इंग्लंडने दुसऱ्या लढतीत विजय मिळवला होता. त्या विजयासह ते गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर पोहोचले होते. ००० मध्ये इंग्लंडने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यापैकी चार मध्ये विजय तर ५ मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. इंग्लंड ४० गुणांसह आणि ०.४६८ नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाने ६ पैकी ४ विजय आणि दोन पराभवासह ४० गुण आणि + ०.३४७ सह दुसरे स्थान मिळवले आहे. वाचा- भारताने ००० मध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ मध्ये विजय तर ३ मध्ये त्यांचा पराभव झालाय. भारताकडे २९ गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट -०.२५२ इतका आहे. आयसीसीने पेनल्टी ओव्हरसाठी भारताचा एक गुण वजा केला आहे. वाचा- या गुणतक्त्यात न्यूझीलंड तिसऱ्या, अफगाणिस्तान चौथ्या, बांगलादेश पाचव्या तर वेस्ट इंडिज सहाव्या क्रमांकावर आहे. भारताने तिसऱ्या लढतीत विजय मिळवून पाकिस्तानला मागे टाकले. पण अद्याप ते बांगलादेश, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्या मागे आहेत. वाचा- काय आहे आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप सुपर लीग २०२३ साली होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने ही लीग महत्त्वाची आहे. ही लीग ३० जुलै २०२० पासून सुरू झाली असून जी ३१ मार्च २०२३ पर्यंत होईल. या लीगमधील पहिले सात संघ वर्ल्डकपसाठी पात्र होतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39rdHTj

BMW मधून मुंबईत दाखल झाला हिटमॅन; सोशल मीडियावर फक्त मुंबई इंडियन्सची चर्चा

पुणे: इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका संपली आणि टीम इंडियामधील खेळाडू आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी आपआपल्या संघात दाखल झाले. ची सुरूवात ९ एप्रिलपासून होणार आहे. पहिली लढत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होणार आहे. वाचा- मागे रविवारी इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार सोमवारी मुंबईत दाखल झाला. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका भारताने २-१ने जिंकली आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्माचे पुढील मिशन सुरू झाले. मुंबई इंडियन्सने आयपीएलची पाच विजेतेपद मिळवली आहेत. आता या वर्षी त्यांची नजर सलग तिसऱ्या विजेतेपदावर असेल. वाचा- वाचा- वाचा- मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एका गाडीतून रोहित शर्मा मुंबईत दाखल झाल्याचे दिसते. रोहित शर्मा बरोबरच भारतीय संघातील हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे देखील मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाले. वाचा- मुंबई संघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव म्हणतो, भारतीय संघाचे प्रतिनिधत्व करण्याची संधी मिळाली ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. देशाकडून खेळण्याचे स्वप्न होते. आता पुन्हा मुंबई इंडियन्सच्या कुटुंबात आलो आहे. गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत विक्रमी सहावे विजेतेपद मिळवले होते. त्याआधी २०१९ साली देखील मुंबईने विजय मिळवला होता. आता मुंबईला विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचा चषक उंचवला आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० साली विजेतेपद मिळवले होते. मुंबई इंडियन्सचे सामने ९ एप्रिल- विरुद्ध RCB- चेन्नई १३ एप्रिल- विरुद्ध KKR- चेन्नई १७ एप्रिल- विरुद्ध SRH- चेन्नई २० एप्रिल- विरुद्ध DC- चेन्नई २३ एप्रिल- विरुद्ध PBKS-चेन्नई २९ एप्रिल- विरुद्ध RR- दिल्ली १ मे- विरुद्ध CSK- दिल्ली ४ मे- विरुद्ध SRH- दिल्ली ८ मे- विरुद्ध RR- दिल्ली १० मे- विरुद्ध KKR- बेंगळुरू १३ मे- विरुद्ध PBKS- बेंगळुरू १६ मे- विरुद्ध SK- बेंगळुरू २० मे- विरुद्ध RCB- कोलकाता २३ मे- विरुद्ध DC- कोलकाता मुंबईचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे मैदान असलेल्या चेपॉक मैदानावर सर्वाधिक पाच सामने खेळणार आहे. तर दिल्लीत ४, बेंगळुरूत ३ आणि कोलकातामध्ये दोन लढती खेळणार आहे. मुंबई इंडियन्सच्या २९ एप्रिल, १३ मे आणि २३ मे रोजीच्या लढती या दुपारी ३.३० ला सुरू होतील. अन्य सर्व लढती संध्याकाळी ७.३० ला असतील.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u45FYl

IND vs ENG : एकदिवसीय मालिका जिंकल्यावर विराट कोहली करतोय हे काम, व्हिडीओ झाला व्हायरल...

पुणे, : भारताने इंग्लंडवर वनेड मालिकेत २-१ असा विजय मिळवला. पण विजय मिळाल्यावर दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली एक गोष्ट करत असल्याचे पाहायला मिळाला. विराटचा हा व्हिडीओ सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. विराट कोहली या व्हिडीओमध्ये नेमकं काय करतोय, ते पाहा... विराटने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आणि वनडे मालिकेत चांगली फलंदाजी करत असला तरी त्याला गेल्या ४९१ दिवसांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. करोनामुळे काही काळ वाया गेला असला तरी बाकिच्या खेळाडूंनी मात्र शतक झळकावले आहे. पण कोहलीला गेल्या १६ महिन्यांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळेच कोहलीवर पुन्हा एकदा ही नामुष्की ओढवल्याचे पाहायला मिळत आहे. एखादी मालिका जिंकल्यावर दुसऱ्या दिवशी कोणताही खेळाडू थोडासा रीलॅक्स मुडमध्ये असू शकतो. पण कोहलीचे वेगळेपण इथेच सिद्ध होते. कारण मालिका जिंकल्यावर दुसऱ्या दिवशीही कोहली जिमममध्ये गेला आणि त्याने व्यायाम केल्याचे पाहायला मिळाले आहे. आता काही दिवसांमध्येच आयपीएललाल सुरुवात होणार आहे. त्यावेळी विराटकडे आरसीबीच्या संघाचे नेतृत्व असेल. त्यामुळे आता आयपीएलसाठी विराट जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विराटच्या व्यायामाचा व्हिडीओ यावेळी चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. विराट अजूनही ठरलाय अपयशी...आयपीएलमध्ये विराट कोहली हा एक कर्णधार म्हणून अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आतापर्यंत कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे आता विराटवर अधिक दडपण असल्याचे म्हटले जात आहे. कारण रोहित शर्माने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळताना संघाला तब्बल पाचवेळा जेतेपद पटकावून दिले आहे, हा आयपीएलमधील एक विक्रमही आहे. पण कोहलीला मात्र एकदाही आयपीएलची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये कोहलीकडून कशी कामगिरी होते आणि तो आरसीबीला जेतेपद जिंकवून देतो का, याची उत्सुकता नक्कीच यावेळी सर्वांनाच असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PIeacQ

IND vs ENG : भारताने मालिका जिंकली, पण इंग्लंडच्या या एकाच खेळाडूने सर्वांची मनं जिंकली...

पुणे, : भारताने इंग्लंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत केले आणि मालिकाही जिंकली. पण मालिका विजयानतंतर जेवढी भारतीय संघाची चर्चा होताना दिसत नाही, तेवढी फक्त इंग्लंडच्या एका खेळाडूची होताना दिसत आहे. भारताने यावेळी मालिका जिंकली असली तरी इंग्लंडच्या या खेळाडूने सर्वांची मनं जिंकली आहेत. भारताच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची ७ बाद २०० अशी अवस्था झाली होती. त्यावेळी इंग्लंडकडे चांगल्या फलंदाजांची जोडी नव्हती. त्यावेळी बहुतेकांनी हा सामना इंग्लंड सहजपणे पराभूत होईल, असे म्हटले होते. पण तसे मात्र झाले नाही. कारण हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला आणि भारताने सात धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर सर्वात जास्त चर्चा रंगली ती इंग्लंडच्या सॅम करनच्या नावाचीच. सॅमने या सामन्यात धडाकेबाज खेळी साकारली. तळाच्या फलंदाजांना हाताला घेत सॅमने भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि सामन्यात रंगत भरली. सॅमने यावेळी एकहाती सामना फिरवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यामध्ये यश मिळाले नाही. सॅम यावेळी मॅचविनर होऊ शकला नसला तरी त्याने सामनावीराचा पुरस्कार मात्र पटकावला. त्याचबरोबर सॅमने यावेळ सर्वांचीच मनं जिंकल्याचेही पाहायला मिळाले. सॅमने तिसऱ्या वनडे सामन्यात ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ९५ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर आदिल रशिदबरोबर ५७ आणि मार्क वुड यांच्याबरोबर ६० धावांची भागीदारीही रचली. यामध्ये सर्वाधिक धावा या सॅमच्याच होत्या. सॅमने अखेरच्या षटकांमध्ये भारताच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केला. पण सॅमला यावेळी इंग्लंडला सामना जिंकवून देता आला नाही. इंग्लंडला जर सॅमने हा सामना जिंकून दिला असता तर त्यांना मालिकाही जिंकता आली असती, त्याचबरोबर सॅमची ही खेळी अविस्मरणीय अशीच ठरली असली. पण सॅमने सामना जिंकवून दिला नसला तरी त्याची खेळी हा सध्याच्या घडीला चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांनी आता आयपीएलही खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये सॅम हा मॅचविनर ठरतो का, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2O0ZK6U

वनडे क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांनी केला हा मोठा विक्रम

पुणे: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करत वनडे मालिका २-१ने जिंकली. या विजयासह भारताने दौऱ्यातील सर्व मालिका जिंकण्याचा पराक्रम देखील केला. तिसऱ्या आणि अखेरच्या लढतीत दोन्ही संघांनी धावांचा डोंगर उभा केला. वाचा- वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या सर्व द्विपक्षीय मालिकेतील विक्रम या मालिकेत मोडला गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाली. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी मिळून एकूण ६५ षटकार मारले. वाचा- याआधी झालेल्या कोणत्याही वनडे मालिकेत इतके षटकार मारले गेले नव्हते. हा विक्रम न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या नावावर होता. २०१९ साली या दोन्ही संघात झालेल्या मालिकेत ५७ षटकार मारले गेले होते. तर २०१७ साली भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत ५६ षटकार मारले होते. या यादीत चौथ्या स्थानावर पुन्हा भारतीय संघाचा समावेश आहे. २०१९ साली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेत ५५ षटकार मारले गेले होते. वाचा- वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत सर्वाधिक षटकार जॉनी बेयरस्टोने मारले. त्याने तीन सामन्यात १४ षटकार मारले. या यादीत दुसऱ्या स्थानावर बेन स्टोक्स असून त्याने ११ षटकार मारले. भारताकडून या मालिकेत ऋषभ पंतने दोन सामन्यात ११ षटकार मारले. तर हार्दिकने २ लढतीत ८ षटाकर मारले. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Pe8F5u

शार्दुल ठाकूरने षटकार मारल्यावर गोलंदाजाने तपासली त्याची बॅट, पाहा व्हिडिओ

पुणे: इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३२९ धावा केल्या. भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ८८, शिखर धवनने ६७ तर हार्दिक पंड्याने ६४ धावा केल्या. वाचा- या सामन्यात भारतीय संघाला संपूर्ण ५० षटके फलंदाजी करता आली नाही. गोलंदाज ()ने अखेरच्या काही षटकात तुफान फलंदाजी केली. त्याने २१ चेंडूत ३० धावा केल्या. यात ३ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. वाचा- शार्दुलने छोटी पण महत्त्वाची अशी धावसंख्या उभी करून संघाला ३००च्या पुढे नेले. त्याने इंग्लंडा ऑल राउंडर बेन स्टोकच्या गोलंदाजीवर मोठे शॉट मारले. सामन्यात शार्दुलने स्टोक्सला षटकार मारला. त्यानंतर शार्दुलच्या जवळ आला आणि त्याने बॅट पाहिली. वाचा- शार्दुलने मारलेल्या षटकाराचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. वाचा- स्टोक्सला विश्वास बसला नाही की शार्दुलने त्याला अशा पद्धतीने षटकार मारला. शार्दुलने गोलंदाजीत देखील कमाल केली. त्याने मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या चार विकेट घेतल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमीका बजावली. भारतीय संघाने दिलेले ३३० धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडचे ५ फलंदाज १५५ वर तर ७ फलंदाज २००च्या आत बाद झाले होते. तरी त्यांनी सॅम करनच्या नाबाद ९५ धावांच्या खेळीच्या जोरावर ३२२ धावांपर्यंत मजल मारली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PjQsDD

पुन्हा एकदा एका ओव्हरमध्ये ६ षटकार; आणि खेळाडू आहे...

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये काही मोजक्या खेळाडूंना मारण्याची कामगिरी करता आली आहे. काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात हा पराक्रम केला होता. आता आणखी एका खेळाडून अशी कामगिरी केली आहे. वाचा- श्रीलंकेचा ऑलराउंडर तिसारा परेरा()चा रविवारी या खास यादीत समावेश झाला. एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा तो श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. लंकेतील एका देशांतर्गत स्पर्धेत परेराने ही कामगिरी केली. मेजर क्लब्स लिमिटेड ओव्हर स्पर्धेच्या ग्रुप ए मधील लढतीत परेराने हा पराक्रम केला. ही मॅच श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लब आणि ब्लूमफिल्ड क्रिकेट आणि एथलेटिक क्लब यांच्यात झाली. वाचा- पावसामुळे ही लढत ५० षटकांच्या ऐवजी ४१ षटकांची झाली. श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबने ३ विकेटच्या बदल्यात ३१८ धावा केल्या. यात कर्णधार परेराने धमाकेदार फलंदाजी केली. परेराने दिलहान कुरे या गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले. त्याने ४ षटकात ७३ धावा दिल्या. या सामन्यातील दुसऱ्या डावात पुन्हा पावसाचा अडथळा आला. तेव्हा प्रतिस्पर्धी संघाने १७ षटकात ६ विकेटच्या बदल्यात ७३ धावा केल्या होत्या. पावसामुळे सामना अनिर्णित घोषीत केला गेला. वाचा- क्रिकेट विश्वास एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा परेरा हा नववा खेळाडू ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशी कामगिरी सहा खेळाडूंनी केली आहे. तर आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये हर्शल गिब्स, युवराज सिंग आणि कायरन पोलार्ड यांनी ही कामगिरी केली आहे. वाचा- गॅरी सोबर्स यांनी सर्व प्रथम १९६८ साली एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारले होते. भारताच्या रवी शास्त्री यांनी देखील १९८५ मध्ये अशी कामगिरी केली. त्यानंतर २२ वर्ष कोणाला सहा षटकार मारता आले नाही. २००७च्या वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने नेदरलँड विरुद्ध ही कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारणारा तो पहिला फलंदाज होता. त्यानंतर युवराज सिंगने टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सहा षटकार मारले. दहा वर्षानंतर इंग्लंडच्या रॉस वाइटलीने यॉकशर वाइकिंग्सविरुद्ध नेटवेस्ट टी-२० ब्लास्टमध्ये एका षटकात सहा सिक्स मारले. तर अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह जजईने २०१८ तर २०२० मध्ये न्यूझीलंडच्या लियो कार्टरने ही कामगिरी केली. लिस्ट ए च्या लढतीत सहा षटकार मारणारा परेरा हा दुसरा क्रिकेटपटू आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sx4791

विजयानंतर देखील विराटसाठी बरेच प्रश्न निर्माण झालेत; फक्त धोनीच उत्तर देऊ शकतो

पुणे: इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात भारताने निसटता विजय मिळवला. विशेष म्हणजे इंग्लंडचे आघाडीचे पाच फलंदाज १५५ धावांवर आणि सात फलंदाज २०० धावांवर माघारी परतले असताना भारताला विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. २२ वर्षीय सॅम करनने ८३ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ९५ धावा केल्या. अखेरच्या १० षटकात भारतीय संघाला प्रचंड संघर्ष करावा लागला. भारतीय संघाची ही अवस्था पाहून अनेकांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी ()ची आठवण आली. वाचा- महेंद्र सिंह धोनी अशा प्रकारच्या सामन्यासाठी नेहमी तयार असायचा. त्याला माहिती असायची की कोणत्या खेळाडूकडून कधी गोलंदाजी करून घ्याची आहे. तसेच कोणत्या फलंदाजासाठी कशी फिल्डिंग लावायची आहे. याच बरोबर तो गोलंदाजाकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्यात एक्सपर्ट होतो. अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा सामना भारताच्या हातातून निसटत चालला असताना धोनीने चतुराई दाखवली. धोनीचे सर्वात मोठे शस्त्र होते तो शांत रहायचा. वाचा- अटीतटीच्या लढतीत धोनी हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार मानला जातो. रविवारी ज्या पद्धतीने मॅच झाली, त्यामध्ये भारतीय संघाला इतका संघर्ष करताना पाहावे लागले. अनेक असे प्रसंग होते जेथे कर्णधार () अपयशी ठरला. उपकर्णधार रोहित शर्माकडून मदत मिळाल्यानंतर देखील सॅम करनच्या फलंदाजीवर तोडगा निघाला नाही. एक वेळ अशी होती की इंग्लंडचा डाव २५० च्या आत संपुष्ठात येईल, पण त्यांनी ३२२ धावा केल्या. वाचा- गोलंदाजांचा वापर या बाबत बोलायचे झाले तर भारताने या सामन्यात सहा गोलंदाज वापरले. ज्यातील तिघांनी विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूरने ४, भुवनेश्वर कुमारने ३ तर टी नटराजनने एक विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णा आणि क्रुणाल पंड्या यांना विकेट मिळवता आली नाही. ४० षटकात इंग्लंडने २६१ धावा केल्या होत्या. ६० चेंडूत त्यांना विजयासाठी ६९ धावा हव्या होत्या आणि आठ विकेट पडल्या होत्या. तळातील खेळाडू फलंदाजी करत असताना विराट कोहलीला स्वतंत्र रणनिती तयार करावी लागले. जेणेकरून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. सॅम करन आणि मार्क वुडने नवव्या विकेटसाठी ६१ चेंडूत ६० धावा केल्या. कर्णधार विराट कोहली वगळता रोहित शर्माला देखील नेतृत्व करावे लागले. रोहित प्रत्येक चेंडूनंतर गोलंदाजासोबत चर्चा करत होता. धोनीच्या बाबत असे प्रसंग कमी पाहायला मिळाले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2O15VrE

सॅम करनला सामनावीर पुरस्कार, विराट कोहली भडकला; म्हणाला...

पुणे: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने सात धावांनी विजय मिळन मालिका देखील जिंकली. या सामन्यात दोन्ही संघांनी शानदार कामगिरी केली. त्यामुळेच सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. भारताने इंग्लंडला ३३० धावांचे लक्ष्य दिले होते. पण त्यांना ३२२ धावा करता आल्या. वाचा- सामना झाल्यानंतर जेव्हा पुरस्कार सोहळ्यात सामनावीर पुरस्कार शार्दुल ठाकूर आणि मालिकावीर पुरस्कार भुवनेश्वर कुमार याला न मिळाल्याबद्दल भारताचा कर्णधार याने नाराजी व्यक्त केली. अखेरच्या लढतीत शार्दुलने ३० धावा केल्या. तर गोलंदाजीत चार विकेट देखील घेतल्या. भुवनेश्वरने संपूर्ण मालिकेत शानदार गोलंदाजी केली. वाचा- इंग्लंडकडून तिसऱ्या वनडेत नाबाद ९५ धावा करणाऱ्या सॅम करनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. तर जॉनी बेयरस्टोला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. वाचा- जेव्हा दोन आघाडीचे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात तेव्हा लढती रोमांचक होतात. सॅमने चुरशीची फलंदाजी केली. भारताच्या गोलंदाजांनी विकेट घेतल्या. हार्दिक आणि नटराजन यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही काही कॅच सोडले जे निराशजनक होते. पण अखेर विजय मिळवला. मला आश्चर्य वाटले की शार्दुलला सामनावीर आणि भुवीला मालिकावीर पुरस्कार दिला नाही. सर्वाधिक श्रेय गोलंदाजांचे आहे. त्यांनी अवघड परिस्थितीत चांगली गोलंदाजी केली, असे विराट म्हणाला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील यासंदर्भात ट्विट केले आहे. त्याने भुवनेश्वर कुमारला मालिकावीर पुरस्कार का नाही असा सवाल केला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dcimJP

Sunday, March 28, 2021

भारत दौऱ्यावर इंग्लंडचा क्लीन स्वीप; सर्वात निराशजनक कामगिरी

पुणे: भारत दौऱ्यावर इंग्लंडचा क्लीन स्वीप झाला. कसोटी, टी-२० नंतर वनडे मालिकेत देखील इंग्लंडचा पराभव झाला. रविवारी झालेल्या वनडे मालिकेतील अखेरच्या लढतीत भारताने विजय मिळवत मालिका २-१ने खिशात घातली. इंग्लंडसाठी भारत दौरा हा अतिशय निराशजनक ठरला. त्यांना एकाही मालिकेत विजय मिळवता आला नाही. वाचा- अखेरच्या वनडेत कमालीची सुरस पाहायला मिळाली. पण इंग्लंडचा सात धावांनी पराभव झाला. भारतीय दौऱ्याची सुरूवात कसोटी मालिकेने झाली होती. पहिल्याच लढतीत इंग्लंडने शानदार विजय मिळवला होता. पण त्यानंतर झालेल्या ३ कसोटीत भारताने विजय मिळवत कसोटी मालिका ३-१ने जिंकली. कसोटी मालिकेतील विजयासह भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता भारताची लढत १८ जून रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. वाचा- कसोटी मालिकेनंतर झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत देखील इंग्लंडने विजयाने सुरूवात केली. नंतर मालिकेत त्यांनी २-१ अशी आघाडी देखील घेतली होती. पण पुन्हा अखेरच्या दोन लढतीत विजय मिळवत भारताने टी-२० मालिका ३-२ने जिंकली. वाचा- तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत मात्र भारताने प्रथम विजय मिळवला. दुसऱ्या वनडेत इंग्लंडने धमाकेदार फलंदाजी करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. अखेरच्या लढतीत शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने बाजी मारली. भारत दौऱ्यात इंग्लंडने ४ कसोटी, ५ टी-२० आणि ३ वनडे असे १२ सामने खेळले त्यापैकी त्यांना फक्त चार लढती जिंकता आल्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3m1rMMn

IND vs ENG : हार्दिक पंड्याच्या एका चुकीमुळे सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला, पाहा नेमकं काय झालं...

पुणे, : हार्दिक पंड्याच्या एका चुकीमुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला पाहायला मिळाला. इंग्लंडच्या सॅम करनने अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना जीवंत ठेवला होता. करनने यावेळी नाबाद ९५ धावांची खेळी साकारली आणि भारताला चांगलीच लढत दिली. पण हार्दिकच्या एका चुकीमुळे हा सामना अखेरच्या चेंडूपर्यंच खेळवला गेला.हार्दिक पंड्याची यावेळी नेमकी चुक झाली तरी कोणती, पाहा... नेमकं घडलं तरी काय...ही गोष्ट घडली ती सामन्याच्या ३४व्या षटकात. यावेळी भारताचा युवा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णन गोलंदाजी करत होता. ३४व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही गोष्ट घडलेली पाहायला मिळाली. कारण या चेंडूवर सॅम करनने मोठा फटका खेचला होता. आता नेमकं काय होणार, याची उत्सुकता सर्वांना होती. पण सॅमनने जिथे चेंडू मारला होता तिथे भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या असल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक यावेळी चेंडूच्या दिशेने धावत निघाला होता. हा चेंडू हार्दिकच्या हातामध्येही विसावला होता. पण धावत असताना हातातला चेंडू उडला आणि तो मैदानात खाली पडला. त्यानंतर हार्दिकला चौकारही अडवता आला नाही. हार्दिकने यावेळी सॅमला जीवदान दिल्याचे पाहायला मिळाले. सॅमला जेव्हा जीवदान मिळाले तेव्हा तो २२ धावांवर खेळत होता. या जीवदानाचा चांगलाच फायदा सॅमने उचलला. यावेळी सॅमने फक्त अर्धशतकच साकारले नाही, तर अखेरच्या षटकापर्यंत हा सामना घेऊन गेला. या सामन्यात हार्दिककडून दोन झेल सुटल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकने याच सामन्यात बेन स्टोक्सचाही सोपा झेल सोडल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यातील षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने यावेळी जोरदार फटका मारला. त्यावेळी नेमकं काय होईल, हे कोणालाच कळत नव्हते. पण काही क्षणातच हा चेंडू हार्दिक पंड्याच्या हातात विसावणार आणि भारतीय संघाला मोठे यश मिळणार, असे दिसत होते. कारण यावेळी हार्दिककडे हा सोपा झेल आला होता. त्यामुळे हार्दिक हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण हार्दिकला यावेळी हा सोपा झेल पकडता आला नाही आणि बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. त्यावेळी स्टोक्स हा १५ धावांवर खेळत होता. त्यावेळी विराट कोहली हा निराश झालेला दिसला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Px5Uw2

IND vs ENG : भारतीय संघाने उधळले विजयाचे रंग, मालिकाही २-१ अशी जिंकली

पुणे, : भारतीय संघाने आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिका २-१ अशी जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघापुढे ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. पण ठराविक फरकाने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यामुळे भारताला या सामन्यात सहज विजय मिळवता आला. भारताच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात झोकात झाली खरी, पण त्यानंतर त्यांना धक्के बसत गेले. भारताने पहिल्याच षटकात जेसन रॉयला बाद केले होते. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोलाही तिसऱ्या षटकात भुवनेश्वरनेच बाद केले आणि इंग्लंडची २ बाद २८ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारतीय संघाकडे तिसरा बळी मिळवण्याची संधी चालून आली होती. त्यावेळी गोलंदाजीही यापूर्वी दोन विकेट्स मिळवणारा भुवनेश्वर कुमारच करत होता. पण हार्दिकमुळे भारताला ही संधी पटकावता आली नाही. पण त्यानंतर टी. नटराजनने स्टोक्सला ३५ धावांवर बाद केले. स्टोक्स बाद झाल्यावर डेव्हिड मलानने यावेळी ५० धावांची दमदार खेळी साकारली खरी, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्यानंतर मलानसह कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले आणि इंग्लंडचे कंबरडे मोडले. शार्दुलने तीन विकेट्स मिळवल्यावर इंग्लंडचा संघ यावेळी बॅकफूटवर ढकलला गेला. त्यानंतर मोइन अली आणि सॅम करन यांनी काही काळ फलंदाजी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. भारताने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची ४ बाद १५७ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी पंतने फलंदाजीला आल्यावर धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला चांगल्या धावा करता आल्या. पंतला यावेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. कारण हार्दिकने यावेळी ६४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला पंत आणि हार्दिक यांच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QCNv1g

IND vs ENG: विराट कोहलीने दिग्गजांच्या या खास यादीत मिळवले स्थान

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची मॅच सुरू आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारताने इंग्लंडला ३३० धावांचे लक्ष्य दिले आहे. वाचा- ... तिसऱ्या वनडेत विराट कोहलीने कर्णधार म्हणून एका खास यादीत स्थान मिळवले. इंग्लंडविरुद्धची तिसरी वनडे विराट कोहलीची कर्णधार म्हणून २००वी वनडे ठरले. भारताकडून २०० किंवा त्याच्या पेक्षा अधिक सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा विराट हा तिसरा खेळाडू आहे. याआधी धोनी आणि मोहम्मद अझरूद्दीन यांनी अशी कामगिरी केली. वाचा- भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्र सिंह धोनीने सर्वाधिक ३३२ सामन्यात नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय तर १२० सामन्यात पराभव स्विकारला. तर मोहम्मद अझरुद्दीनने २२१ सामन्यात नेतृत्व करताना १०४ सामन्यात विजय मिळून दिला. वाचा- विराटच्या नेतृत्वाचा विचार करता त्याने १९९ सामन्यापैकी १२७ मध्ये विजय मिळून दिला तर ५५ सामन्यात पराभव झालाय. विराट जगातील आठवा कर्णधार आहे ज्याने २०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यात नेतृत्व केले आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आहे. त्याने ३२४ सामन्यात नेतृत्व केले. तर न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने ३०३ सामन्यात नेतृत्व केले आहे. वाचा- दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथने २८६, एलन बॉर्डन यांनी २७१, अर्जुन रणतुंगाने २४९ सामन्यात नेतृत्व केले आहे. भारताकडून सौरव गांगुलीने १९६ सामन्यात नेतृत्व करत ९७ मध्ये विजय तर ७९ मध्ये पराभव स्विकारला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39nJQLh

सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाणनंतर हा भारताचा क्रिकेटपटू ठरला करोना पॉझिटीव्ह

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि युसुफ पठाणनंतर भारताच्या तिसऱ्या खेळाडूलाही आता करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये करोना पॉझिटीव्ह ठरलेला हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे खेळाडू आता घरी पोहोचल्यावर त्यांना करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या कुटुंबियांसाठीही ही गोष्ट चिंतेची ठरत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज सध्या सुरु आहे. या स्पर्धेतील भारतीय संघातील सचिन आणि पठाणनंतर आता एस. बद्रीनाथला करोना झाल्याचे पाहिले आहे. आपण करोना पॉझिटीव्ह असल्याचे ट्विट बद्रीनाथने केले आहे. त्याचबरोबर मी आता सर्व सुरक्षेचे नियम पाळत असल्याचेही बद्रीनाथने यावेळी सांगितले आहे. करोना पॉझिटीव्ह ठरल्यावर बद्रीनाथ म्हणाला की, " जेव्हा मी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळत होतो, तेव्हा सर्व सुरक्षेचे नियम मी पाळत होतो. त्याचबरोबर नियमितपणे मी करोनाच्या चाचण्याही करत होतो. पण तरीही आता मी करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. करोनाची काही लक्षणे माझ्यामध्ये दिसत आहेत, पण त्यांचे प्रमाण फार कमी आहे. पण तरीही मी सर्व नियमांचे पालन करणार आहे आणि त्याचबरोबर मी आयसोलेशनमध्ये राहणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच मी सर्व गोष्टी करत आहे." सचिन तेंडुलकर करोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर आता या स्पर्धेत खेळलेल्या सर्व खेळाडूंना करोना चाचणी करावी लागणार आहे. कारण हे सर्व खेळाडू रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिनबरोबर खेळत होते. त्यामुळे सचिनला करोना झाल्यावर युसूफ पठाण आणि आता एस. बद्रीनाथ यांनाही करोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे यावेळी भारतीय संघात जे खेळाडू होते, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही यावेळी करोनाची चाचणी करावी लागणार आहे. खेळाडू आपल्या घरी पोहोचल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही यावेळी करोनाची चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. सचिन तेंडुलकर, युसूफ आणि बद्रीनाथ ज्यांना ज्यांना भेटले होते, त्यांना आता करोनाची चाचणी करावी लागणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39mMam1

हार्दिकने हात जोडत, जमिनीवर बसून सर्वांची माफी मागितली; पाहा व्हिडिओ

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरी आणि अखेरची वनडे लढत पुण्यात सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडला ३३० धावांचे लक्ष्य दिले आहे. वाचा- भुवनेश्वर कुमारने १४ धावसंख्येवर जेसन रायची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर जॉनी बेयरस्टोला बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद २८ केली. बेयरस्टोच्या जागी आलेल्या बेन स्टोक्सने डावातील ५व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर मिड ऑनच्या दिशेने हवेत शॉट मारला. तेथे उभा असलेल्या हार्दिकला एक सोपा कॅच घेण्याची संधी होती. पण हार्दिकने तो सोडला. वाचा- वाचा- हार्दिकने कॅच सोडल्यावर भारतीय संघातील खेळाडूंना विश्वासच बसला नाही. विराट कोहली, रोहित शर्मासह सर्वांना धक्का बसला. डगआउटमध्ये बसलेल्या भारताच्या सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंना विश्वास बसला नाही. स्वत: हार्दिक देखील नाराज झाला. बेन स्टोक्सने गेल्या सामन्यात ५२ चेंडूत ९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे धोकादायक स्टोक्सला जीवनदान दिल्याची जाणीव हार्दिकला चांगलीच होती. स्टोक्स तेव्हा १६ धावांवर फलंदाजी करत होता. वाचा- इंग्लंडने वेगाने धाव करत असताना ११ व्या षटकात टी नटराजनच्या चेंडूवर स्टोक्सने शॉट मारला आणि शिखर धवनने यावेळी कोणतीही चूक न करता तो चेंडू पकडला. भारतीय संघाने एक मोठी विकेट मिळवली होती. पण यावेळी सर्वांची नजर हार्दिकने कडे गेली. त्याने सर्व भारतीय खेळाडूंकडे पाहत हात जोडले आणि खाली मैदानावर बसून सर्वांना नमस्कार केला. हार्दिकच्या कृतीवर सर्व भारतीय खेळाडू हसू लागले. त्याच्या या कृतीवर कोहली आणि रोहितला देखील हसू आवरता आले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2QLPtg1

IND vs ENG : सामना सुरु असताना हार्दिक पंड्याकडून झाली मोठी चुक, विराट कोहली भडकला...

पुणे, : इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना सुरु असतानाच भारताच्या हार्दिक पंड्याकडून एक मोठी चुक घडल्याचे पाहायला मिळाले. या चुकीनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. नेमकं घडलं तरी काय, पाहा...ही गोष्ट घडली ती पाचव्या षटकामध्ये. यावेळी भारताकडून पाचवे षटक भुवनेश्वर कुमार टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने यावेळी जोरडार फटका मारला. त्यावेळी नेमकं काय होईल, हे कोणालाच कळत नव्हते. पण काही क्षणातच हा चेंडू हार्दिक पंड्याच्या हातात विसावणार आणि भारतीय संघाला मोठे यश मिळणार, असे दिसत होते. कारण यावेळी हार्दिककडे हा सोपा झेल आला होता. त्यामुळे हार्दिक हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण हार्दिकला यावेळी हा सोपा झेल पकडता आला नाही आणि बेन स्टोक्सला जीवदान मिळाले. त्यावेळी स्टोक्स हा १५ धावांवर खेळत होता. त्यावेळी विराट कोहली हा निराश झालेला दिसला. भारतीय संघाने इंग्लंडला दोन जोरदार धक्के दिले होते. कारण भारताने पहिल्याच षटकात जेसन रॉयला बाद केले होते. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोलाही तिसऱ्या षटकात भुवनेश्वरनेच बाद केले आणि इंग्लंडची २ बाद २८ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारतीय संघाकडे तिसरा बळी मिळवण्याची संधी चालून आली होती. त्यावेळी गोलंदाजीही यापूर्वी दोन विकेट्स मिळवणारा भुवनेश्वर कुमारच करत होता. पण हार्दिकमुळे भारताला ही संधी पटकावता आली नाही. त्यानंतर स्टोक्सने दमदार फलंदाजी केली. पण अखेर टी. नटराजनने स्टोक्सला बाद केले. यावेळी स्टोक्स ३५ धावांवर बाद झाला. जीवदानानंतर स्टोक्सने २० धावा वाढवल्या. कदाचित या गोष्टीचा फटका भारताला बसूही शकतो. कारण सामन्यांमध्ये प्रत्येक धाव ही महत्वाची असते. त्यामुळे आता हार्दिक पंड्याने दिलेले हे जीवदान भारतीय संघाला महाग पडते की नाही, हे सामना संपल्यावरच समजू शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u618on

रोहित आणि शिखर यांची शतकी भागिदारी; केला हा विक्रम

पुणे: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३२९ धावा केल्या. भारतीय संघाला आणि यांनी या निर्णायक सामन्यात धमाकेदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १०३ धावा केल्या. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात शतकी भागिदारी करून रोहित आणि धवन यांनी एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७व्यांदा शतकी भागिदारी केली. वाचा- क्रिकेटच्या इतिहासात वनडेमध्ये सर्वाधिक वेळा शतकी भागिदारी करण्याचा विक्रम आणि यांच्या नावावर आहे. या दोघांनी सलामीवीर म्हणून २१ वेळा शतकी भागिदारी केली आहे. वाचा- वनडेत सर्वाधिक वेळा शतकी भागिदारीचा विक्रम सचिन आणि गांगुली यांच्या नावावर आहे. या दोघांनी २६ वेळा अशी कामगिरी केली आहे. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा हे आहेत त्यांनी २० वेळी शतकी भागिदारी केली. तिसऱ्या क्रमांकावर रोहित आणि विराट कोहली आहेत, या दोघांनी १८ वेळा तर रोहित आणि धवन यांनी १७ वेळा शतकी भागिदारी केली आहे. वाचा- ... या सामन्यात रोहित आणि शिखर जोडीने वनडेत ५ हजार धावांची भागिदारी पूर्ण केली. सचिन आणि गांगुली यांच्यानंतर अशी कामगिरी करणारी ही भारताची दुसरी जोडी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dcRV6D

IND vs ENG : विराट कोहलीवर पुन्हा ओढवली नामुष्की, पाहा नेमकं काय घडलं...

पुणे, : भारताचा कर्णधार विराट कोहलीवर पुन्हा एकदा नामुष्की ओढवल्यचे पाहायला मिळाले. चाहत्यांनी यावेळी कोहलीला चांगलेच धारेवर धरल्याचेही पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत भारतीय संघ सामने जिंकत आहे, त्यामुळे कोहलीबाबतच्या काही गोष्टी अजूनही सर्वांपुढे आलेल्या नाहीत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या पुढे आल्यावर तर विराटवर जोरदार टीका सुरु होऊ शकते. त्यामुळे आता विराटवर कोणती नामुष्की ओढावली आहे, याचा विचारही चाहते करत असतील. आतापर्यंत विराट चांगली फलंदाजी करत असला तरी त्याला गेल्या ४९१ दिवसांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. करोनामुळे काही काळ वाया गेला असला तरी बाकिच्या खेळाडूंनी मात्र शतक झळकावले आहे. पण कोहलीला गेल्या १६ महिन्यांमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळेच कोहलीवर पुन्हा एकदा ही नामुष्की ओढवल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएलनंतर कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी वनडे क्रिकेट मालिकेतही कोहलीला शतक झळकावता आले नव्हते. एकमेव कसोटी मालिकेतही कोहली अपयशी ठरला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकांमध्येही कोहलीला शतक झळकावता आलेले नाही. काही दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू मुरली कार्तिकने सामना संपल्यावर कोहलीला एक प्रश्न विचारला होता. कार्तिकने यावेळी कोहलीला विचारले होते की, एकाकाळी कोहली हा एकामागून एक शतके पूर्ण करायचा, पण सध्याच्या घडीला कोहलीकडून चांगली खेळी साकरली जात आहे. कोहली अर्धशतक करताना दिसतो, पण त्याच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये एकही शतक पाहायला मिळालेले नाही. त्यावर कोहली म्हणाला होता की, " मी कधी शतकांसाठी खेळत नाही. मी शतक करूनही भारतीय संघ पराभूत झाला तर ते मला आवडणार नाही. पण माझे शतक झाले नाही आणि भारतीय संघाने सामना जिंकला असेल, तर ते माझ्यासाठी महत्वाचे असेल. कारण मी कधीही स्वत:साठी खेळत नाही. मी नेहमीच पहिल्यांदा संघाचा विचार करत असतो."


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w6vJnv

IND vs ENG : एकही सामना न खेळता चाहत्यांना आली रवींद्र जडेजाची आठवण, पाहा नेमकं काय म्हटलं...

पुणे, : इंग्लंडविरुद्धचा तिसऱ्या सामन्यात भारताची फलंदाजी पाहिल्यावर यावेळी चाहत्यांना अष्टपैलू रवींद्र जडेजाची आठवण आली आहे. जडेजाच्या नावाने यावेळी ट्विटचा पाऊस पडल्याचेही पाहायला मिळाले. आजच्या सामन्यात अष्टपैलू कृणाल पंड्याला मोठी खेळी साकारुन धावसंख्या वाढवण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यामध्ये कृणाल अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर कृणालपेक्षा चांगली फलंदाजी यावेळी शार्दुल ठाकूरने केल्याचे पाहायला मिळाले. कृणालने यावेळी ३४ चेंडूंमध्ये २५ धावाच करता आल्या. पण शार्दुल ठाकूरने मात्र यावेळी २१ चेंडूंत ३० धावांची खेळी साकारली. त्यामुळे यावेळी जर रवींद्र जडेजा संघात असला असता तर त्याने चांगली फलंदाजी केली असती, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. एका चाहत्याने म्हटले आहे की, सध्याच्या घडीला जडेजापेक्षा कृणाल हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आतापर्यंत जडेजाला चांगला अनुभव आहे आणि तो चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी चांगला अष्टपैलू हा कृणाल नसून जडेजाच आहे. सध्याच्या घडीला बॅटींग ऑलराऊंडर म्हणून रवींद्र जडेजा हाच भारतीय संघापुढे असलेला चांगला पर्याय आहे. कारण कृणालची फलंदाजी पाहिल्यावर ही गोष्ट आता समोर येत आहे. त्यामुळे कृणालची फलंदाजी पाहून यावेळी जडेजाबद्दलचा आदर अधिक वाढत आहे, असेही काही चाहत्यांनी यावेळी म्हटले आहे. भारतीय संघाला या सामन्यात ३२९ धावा करता आल्या. पण कृणालने जर आक्रमक फलंदाजी केली असती तर भारतीय संघ ३५० पर्यंत सहज पोहोचू शकला असता. पण धावसंख्या वाढण्यात यावेळी कृणालला अपयश आल्याचे पाहायला मिळाले. भारताने या सामन्यात इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची ४ बाद १५७ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी पंतने फलंदाजीला आल्यावर धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला चांगल्या धावा करता आल्या. पंतला यावेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. कारण हार्दिकने यावेळी ६४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला पंत आणि हार्दिक यांच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकली. पण कृणाल मात्र यावेळी अपयशी ठरल्याचेच दिसले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PvMc3L

IND vs ENG : भारताची फलंदाजी पाहून अश्विनने डिलीट केलं आपलंच ट्विट, पाहा नेमकं काय लिहिलं होतं...

पुणे, : भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनने आज एक ट्विट केले होते. पण अश्विनवर यावेळी आपलेच ट्विट डिलीट करण्याता नामुष्की ओढावली. भारतीय संघाची फलंदाजी पाहून अश्विनने आपले हे ट्विट डिलीट केल्याचे पाहायला मिळाले आहे. अश्विन भारताच्या वनडे किंवा ट्वेन्टी-२० संघातून खेळत नाही. कसोट क्रिकेटमध्ये अश्विन चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळेच अश्विनला वनडे आणि ट्वेन्टी-२० संघात खेळवायला हवे, असे म्हटले जात होते. पण अश्विनला मात्र भारतीय संघाने वनडे आणि ट्वेन्टी-२० संघात स्थान न दिल्याचेच पाहायला मिळाले. भारताच इंग्लंडबरोबरचा तिसरा सामना सुरु असताना अश्विनने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये अश्विनने म्हटले होते की, " आतापर्यंत आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये ४०० धावांचा यशस्वीपणे पाठलाग फक्त एकदाच करता आला आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने आतार्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनवेळा द्विशतक झळकावले आहे." भारतीय संघाने या सामन्यात दमदार सलामी दिली होती. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी यावेळी १०३ धावांची सलामी दिली. त्याचबरोबर रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्यामुळे अश्विनला वाटले की, रोहित आज पुन्हा द्विशतक झळकावू शकतो. जर रोहितने द्विशतक झळकावले, तर नक्कीच भारतीय संघ ४०० धावांपर्यंत पोहोचू शकतो आणि ते हा सामना सहजपणे जिंकू शकतात. पण भारताला चांगली सलामी मिळाली असली तरी त्यानंतर त्यांचे चार फलंदाज लवकर बाद झाले आणि अश्विनचे हे स्वप्न बेचिराख झाले. त्यामुळेच अश्विनने आपले हे ट्विट डिलीट केले आहे. भारताने या सामन्यात इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. भारताला यावेळी शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर १०३ धावांची सलामी मिळाली होती. पण त्यानंतर भारताने ५४ धावांमध्ये चार विकेट्स गमावल्या आणि त्यांची ४ बाद १५७ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी पंतने फलंदाजीला आल्यावर धमाकेदार फलंदाजी केली आणि त्यामुळेच भारताला चांगल्या धावा करता आल्या. पंतला यावेळी हार्दिकची चांगली साथ मिळाली. कारण हार्दिकने यावेळी ६४ धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारताला पंत आणि हार्दिक यांच्या फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता येऊ शकली. पण अश्विनचे भाकित मात्र यावेळी खरे होऊ शकले नाही.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cu7OGC

पंत-पंड्या यांची धमाकेदार फलंदाजी; निर्णायक लढतीत भारताचे इंग्लंडला ३३० धावांचे टार्गेट

पुणे: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडेत ( 3rd odi ) भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ३२९ धावा केल्या. भारताकडून , शिखर धवन आणि यांनी अर्धशतक झळकावले. भारताला ५० षटके खेळून काढता आली नाही. वाचा- तिसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाने कुलदीप यादवच्या जागी टी नटराजन याला संधी दिली. तर इंग्लंडने टॉम करनच्या जागी मार्क वुड हा बदल केला. भारतीय संघ या सामन्यात चार जलद गोलंदाज आणि एका फिरकीपटूसह खेळत आहेत. वाचा- भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी करून संघाला दमदार सुरूवात करून दिली. रोहित-शिखरने १७व्यांदा शतकी भागिदारी केली. रोहित ३७ धावांवर बाद झाला आणि भारताने पहिली विकेट गमावली. त्यानंतर शिखर धवन ६७ धावांवर माघारी परतला. तर कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा मोइन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने फक्त सात धावा केल्या. कोहली बाद झाल्याने चांगल्या स्थितीत असलेल्या भारताची अवस्था ३ बाद १२१ अशी झाली. कोहलीच्या जागी आलेला केएल राहुल मोठी धावसंख्या करू शकला नाही. तो ७ धावा करून माघारी परतला. वाचा- भारताची अवस्था ४ बाद १५७ अशी असताना ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी विकेट पडू न देता इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९९ धावा केल्या. पंत शतक करेल असे वाटत असताना ७८ धावांवर सॅम करनने त्याची विकेट घेतली. पंतने ६२ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकार मारले. त्यानंतर हार्दिक पंड्या माघारी परतला. हार्दिकने ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. वाचा- अखेरच्या षटकात फटकेबाजीच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूर (२१ चेंडूत ३० धावा) आणि क्रुणाल पंड्या (३४ चेंडूत २५ धावा) बाद झाले. त्यानंतरच्या दोन विकेट देखील लवकर पडल्या आणि भारताचा ४८.२ षटकात डाव संपुष्ठात आला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3w3cgEa

क्रिकेटमध्ये आजच्या दिवशी झाला होता सर्वात लाजिरवाणा विक्रम; ६६ वर्षानंतर देखील कायम

नवी दिल्ली: कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २८ मार्च हा दिवस खास आहे. याच दिवशी १९५५ साली क्रिकेटमध्ये असा एक विक्रम झाला होतो, जो विक्रम मोडण्याची कोणत्याही संघाची इच्छा नसले. ६६ वर्षांपूर्वी झालेला हा विक्रम फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सर्वात लाजिरवाणा असा होता. वाचा- इंग्लंडचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर होता. कसोटी मालिकेतील पहिली मॅच त्यांनी जिंकली होती. दुसरा कसोटी सामना ऑकलँड येथे सुरू होती. या सामन्यातील चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने असा विक्रम केला जो कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाने केलेल्या सर्वात कमी धावसंख्याचा होता. वाचा- आजच्या दिवशी न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात फक्त २६ धावांवर बाद झाला होता. न्यूझीलंड टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०० धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लंडने पहिल्या डावात ४६ धावा केल्या. या सामन्याच्या चौथ्या दिवशी असे काही झाले ज्याचा कोणी विचार देखील केला नाही. वाचा- इंग्लंडचे कर्णधार लेन हेटन यांची ही अखेरची कसोटी होती. हेटन यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील ३६४ ही सर्वोच्च धावसंख्याचा विक्रम होता. नंतर हा विक्रम गॅरी सोबर्स यांनी ३६५ धावा करून मोडला. वाचा- या सामन्यात इंग्लंडच्या फ्रँक टायसनने गार्डन लेगेट यांना शून्यावर बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडच्या विकेट पडण्यास जी सुरूवात झाली जी थांबलीच नाही. टायलन यांनी दोन, ब्रायन स्टेथनने तीन, ब्रायन एपलयार्डने ४ विकेट घेतल्या. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि २० धावांनी जिंकला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3dbV2M9

India vs England 3rd ODI Latest Update: भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या वनडेचे Live अपडेट

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी आणि अखेरची वनडे आज होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी प्रत्येकी १ सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसऱ्या लढतीला फायनलचे स्वरुप आले आहे. इंग्लंडने भारताच्या दौऱ्यातील कसोटी, टी-२० मालिका गमावल्यामुळे आता वनडे मालिका जिंकून दौऱ्याची अखेर चांगली करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. याउटल भारतीय संघ दौऱ्यावर संपूर्ण वचर्स्व ठेवण्याचा प्रयत्न करेल. Live अपडेट ( 3rd odi) >> भारतीय संघात एक बदल- कुलदीप यादवच्या जागी टी नटराजनचा संघात समावेश >> भारताच्या विरुद्धच्या तिसऱ्या वनडेत इंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय >> दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला >> भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या वनडेचे live अपडेट


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2P649Gs

Saturday, March 27, 2021

धोनी नसल्याने कुलदीप-चहलची जोडी झाली कमकूवत; आकडेवारी पाहिल्यावर बसेल धक्का

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी वनडे उद्या (रविवारी) २८ मार्च रोजी होणार आहे. इंग्लंडने दुसऱ्या वनडेत शानदार विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरीत केली. त्यामुळे अंतिम सामन्याला फानयलचे स्वरुप आले आहे. जो मॅच जिंकले त्याला विजेतेपद मिळेल. वाचा- मालिकेतील पहिली वनडे भारताने जिंकली होती. दुसऱ्या वनडेत इंग्लंडने ३३७ चे लक्ष्य ४४ व्या षटकात पार केले. या सामन्यात भारताची गोलंदाजी अतिशय खराब झाली. सर्वात कळजीचा विषय म्हणजे कुलदीप यादवची गोलंदाजी होय. कुलदीपने १० षटकात ८४ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नाही. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे तिसऱ्या वनडेत त्याला बाहेर बसवण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. वाचा- अखेरच्या वनडेत वॉशिंग्टन सुंदरला अंतिम ११ मध्ये संधी मिळू शकते. सुंदरने २० मालिकेत चांगली गोलंदाजी केली होती. पण सध्या असा एक मुद्दा चर्चेत आला आहे ज्याने विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. जेव्हापासून महेंद्र सिंह धोनीने निवृत्ती घेतली आहे तेव्हापासून भारतीय क्रिकेट संघात कुलदीप आणि चहर यांच्या फिरकीची जादू दिसली नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली कुलदीपने ४७ सामन्यात ९१ विकेट घेतल्या आहेत. तर धोनीनंतर १६ सामन्यात फक्त १४ विकेट घेता आल्या. चहलच्या बाबत धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर चहलची जादू कमी पडली. धोनी संघात असताना ४६ सामन्यात त्याने ८१ विकेट घेतल्या. तर धोनीनंतर ८ सामन्यात ११ विकेट घेता आल्या. वाचा- धोनीची रणनिती आणि फिरकी सध्या धोनी संघात नसल्याने कुलदीप आणि चहल यांची गोलंदाजी कमकुवत झाल्याची चर्चा सुरू आहे. धोनी नेहमी विकेटच्या मागून या गोलंदाजांना सल्ला देत असे. ज्यावर फलंदाज चुका करत आणि या दोन्ही फिरकीपटूंना विकेट मिळत असे. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cuIlgy

सचिनला करोना; क्रिकेटपटू म्हणाला, जगाला सांगण्याची काय गरज?

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर()ने आज (शनिवारी) पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावरून सर्वांना सांगितले. सचिनला करोना (covid-19) व्हायरसची लागण झाल्याचे कळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या. अशाच एका माजी क्रिकेटपटूने मात्र असे काही ट्विट केले ज्यावर चाहत्यांसोबत भारतीय माजी खेळाडू देखील भडकले. वाचा- इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ()ने सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावरून करोना झाल्याचे जाहीर केल्यानंतर एक ट्वीट केले. तो म्हणतो, मला कोणी सांगू शकेल का की, करोना पॉझिटिव्ह आहे ही गोष्ट जगाला सांगण्याची काय गरज आहे. वाचा- वाचा- पीटरसनच्या या ट्विटनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू () भडकला. त्याने पीटरसनला विचारले, हा विचार तुझ्या डोक्यात आजच कसा काय आला? वाचा- युवराज सिंगने दिलेल्या उत्तरानंतर पीटरसनने आणखी एक ट्विट केले. त्यात तो म्हणतो, 'सचिन तेंडुलकरला करोना झाल्याचे आताच कळाले. ओहो, माफ कर सचिन, लवकर बरा हो मित्रा', त्यावर युवराजने देखील मी तुझी चेष्टा करत होतो असे ट्विट केले. या दोन्ही खेळाडूच्या ट्विटवर चाहते देखील प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये सचिन, युवराज आणि पीटरसन हे एकत्र खेळले होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3svOnmt

असे काय झाले की विराट कोहली पिचवर जाऊन बसला, पाहा व्हिडिओ

पुणे: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या वनडेत पुन्हा एकदा खराब अंपायरिंग पाहायला मिळाली. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी ३३७ धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष्य इंग्लंडने ४४व्या षटकात पार केले. वाचा- इंग्लंडच्या डावात ज्या फलंदाजाने मॅच फिरवली त्या संदर्भात एक मोठा वाद झाला. बेन स्टोक्स धावबाद होता. पण खराब अंपायरिंगमुळे त्याला जीवनदान मिळाले. त्याने ५२ चेंडूत ९९ धावा केल्या. वाचा- सामन्यातील २६व्या डावात भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर स्टोक्सने मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट खेळला. त्याने पहिली धाव वेगाने घेतली आणि दुसरी घेण्यासाठी तो धावला. मिड विकेटवर फिल्डिंग करणाऱ्या कुलदीप यादवने चेंडू विकेटकिपर ऋषभ पंतच्या दिशेने थ्रो केला. वाचा- दुसरी धाव घेताना स्टोक्सचा वेग कमी होता. तो क्रीझ मध्ये पोहोचेपर्यंत चेंडू विकेटला लागला होता. भारताने जोरदार अपिल केली. मैदानावरील अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे निर्णय सोपवला. टीव्ही रिप्लेमध्ये स्टोक्सची बॅट क्रीझच्या आत नव्हती. अनेक वेळा पाहिल्यानंतर तिसऱ्या अंपायरने स्टोक्सला नाबाद दिले. वाचा- यावर पिचवर आला आणि अंपायर यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागला. पण मेनन यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मेनन यांना समजावण्यासाठी विराट चक्क पिचवर बसल आणि त्यांना गोष्टी पटवण्याचा प्रयत्न करत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बेन स्टोक्स १०० टक्के आउट होता. समालोचक आकाश चोप्रा आणि इरफान पठाण देखील या गोष्टीशी सहमत होते. पण तिसऱ्या अंपायरच्या निर्णयानंतर कोणी काहीच करू शकत नाही. वाचा- बेन स्टोक्सच्या या धावबादवर सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया देत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने देखील मी असतो तर आउट दिले असते,असे म्हटले आहे. युवराज सिंग


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cprxYe

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...