नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने तीन सामन्यांची वनडे मालिका गमावली आहे. आता तिसऱ्या वनडेत भारतीय संघ प्रतिष्ठेसाठी खेळले. वनडे मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका आहे आणि त्यानंतर चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. कसोटी मालिकेतील फक्त पहिला सामना भारताचा कर्णधार खेळणार आहे. त्यानंतर तो मायदेशात परतणार आहे. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबर रोजी होणार आहे. आता विराटच्या गैरहजेरीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करणार का? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. अधिक तर माजी क्रिकेटपटूंच्या मते भारतीय संघासाठी कसोटी मालिका फारच अवघड जाईल. वाचा- ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार याच्या मते, विराट कोहलीचा जागा कोणीच घेऊ शकत नाही. जर त्याच्या गैरहजेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला मायदेशात हरवले तर मी एक वर्ष त्याचा आनंद साजरा करेन. विराटचे नेतृत्व आणि फलंदाजी या दोन्हीचा उपयोग होतो. विराटच्या स्थानावर कोण फलंदाजी करणार. केएल राहुल हा चांगला फलंदाज आहे. या परिस्थितीत फलंदाजी करण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. तो चांगली फलंदाजी करू शकतो. पण विराटची जागा कोणी घेऊ शकत नाही. मला अजिंक्य रहाणे देखील चांगला फलंदाज वाटतो. तो एक चांगला खेळाडू देखील आहे आणि नेतृत्व देखील चांगले करतो. वाचा- कसोटीत रणनिती म्हणून तो एक चांगला कर्णधार ठरू शकतो. भारतासाठी चागंली गोष्टी असेल. याकडे एक संधी म्हणून पाहावे लागले. तसे झाले तर इतिहास घडवला जाईल, असे क्लार्क म्हणाला. भारतीय संघाने विराट कोहली शिवाय ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवले तर तुम्ही एक वर्ष जल्लोष करा. तो एक अविश्वसनिय विजय असेल. भारतीय खेळाडूंना स्वत:वर विश्वास दाखवावा लागले आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव करू शकतो हे सिद्ध करावे लागले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mtUSTK