मुंबई: भारताचा युवा क्रिकेटपटू ()ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यशस्वीने शेअर केलेला व्हिडिओ हा क्रिकेट मैदानावरील कामगिरीचा नाही. तरी तो पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल. वाचा- यशस्वीने जो व्हिडिओ शेअर केला आहे त्याच त्याची बहिण लग्नाच्या साडीत दिसते. हा व्हिडिओ ३ जानेवारी २०२१ रोजीचा आहे. यशस्वीच्या बहिणीचा विवाह झाला. व्हिडिओ शेअर करताना यशस्वी म्हणतो, बहिण तुझ्या लग्नाचा दिवस आला आणि निघून देखील केला. पण प्रेम नेहमीच वाढत राहील. वाचा- वाचा- यशस्वीने अतिशय गरीबीत दिवस काढले. त्याचे वडील पाणीपुरी विकत होते. तो स्वत: त्यांना मदत करत होता. ११व्या वर्षी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहाणारा यशस्वी मुंबईतील एका डेअरी फॉर्ममध्ये राहत होता. यशस्वीने बॉल बॉय म्हणून अनेक वेळा काम केल. जेव्हा त्याने युवा क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले तेव्हा तो प्रथम चर्चेत आला होता. त्यानंतर १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत त्याचा संघात समावेश केला गेला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये त्याने ६ सामन्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या मदतीने ४०० धावा केल्या. या स्पर्धेत त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. वाचा- यशस्वीला आयपीएल २०२० मध्ये देखील संधी मिळाली. राजस्थान रॉयल्सने त्याला २.४ कोटींना विकत घेतले. युएईमध्ये झालेल्या या स्पर्धेत त्याला फार चांगली कामगिरी करता आली नाही. आता यशस्वी १० जानेवारीपासून होणाऱ्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळणार आहे. मुंबई संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rZzFob
No comments:
Post a Comment