Ads

Monday, January 4, 2021

राडा! तिसऱ्या कसोटीनंतर भारतीय संघ मायदेशात परतणार? या गोष्टीवरून BCCI झाले नाराज

सिडनी: australia vs india 4th test match भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार सामन्यांची कसोटी मालिका तीन सामन्यांची होण्याचा धोका आहे. भारतीय संघ ब्रिसबेन येथीली गाबा येथे होणारी कसोटी खेळावी की नको यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात याचा गंभीरपणे विचार करत आहे. वाचा- क्विंन्सलँडचे आरोग्य मंत्री रोझ बेट्स यांनी केलेल्या वक्तव्यावर बीसीसीआय नाराज आहे. बेट्स यांच्या वक्तव्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर संपवून संघाला मायदेशात बोलवण्याचा विचार करत आहे. काय म्हणाले बेट्स भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका नियोजित आहे. यातील दोन कसोटी सामने झाले असून तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनीत होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम कसोटी सामना ब्रिसबेन येथील गाबा मैदानावर होईल. सध्या मालिका १-१ अशा स्थितीत आहे. आरोग्य मंत्री बेट्स म्हणाल्या होत्या की, भारतीय खेळाडूंनी सर्व नियम पाळले पाहिजेत. जर तसे होणार नसेल त्यांनी ब्रिसबेनला जाऊ नये. वाचा- याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय बेट्स यांच्या वक्तव्यावर नाराज आहेत. त्याच्या या वक्तव्याने भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. आता बोर्ड चार कसोटी सामन्यांची मालिका तिसऱ्या सामन्यानंतर संपवण्याचा विचार करत आहे. सिडनी कसोटीनंतर भारतीय संघाला मायदेशात बोलवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. वाचा- ब्रिसबेन कसोटीसाठी भारतीय संघातील खेळाडू कठोर क्वारंटाइनमध्ये जाण्यापासून नाखुश आहेत. क्विंसलँड राज्याचे खासदार रोज बेट्स म्हणाले होते की, जर भारतीयांना नियमांचे पालन करायचे नसल तर तर त्याचे स्वागत होणार नाही. रविवारी यासंदर्भातील वृत्त आले होते ज्यात भारतीय संघाला ब्रिसबेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी सक्तीच्या क्वारंटाइनमध्ये जाण्याबद्दलचे वक्तव्य केले होते. या वृत्तानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका तिसऱ्या सामन्यानंतर संपण्याचा शक्यता निर्माण झाली आहे. वाचा- ऑस्ट्रेलिया मीडियाने दिलेल्याय वृत्तानुसार भारतीय खेळाडूंनी सक्तीच्या क्वारंटाइनला विरोध केला आहे. खेळाडूंच्या मते ते गेल्या सहा महिन्यांपासून क्वारंटाइनमध्ये आहेत. यावर बेट्स यांनी भारतीय नियमांचे पालन करणार नसतील तर त्यांचे स्वागत केले जाणार नाही, असे वक्तव्य केले होते. जर एखाद्या लोकप्रतिनिधीला वाटत असेल की भारतीय संघाने तेथे जावे आणि क्रिकेट खेळावे तर ही गोष्टी खुप दुखद आहे. यामुळे भारतीयांची प्रतिमा खराब झाली आहे. मी तुम्हाला आश्वासन देतोय की आम्ही नियमांचे पालन करण्या शिवाय दुसरे काहीच करत नाही. रोहित शर्माचे क्वारंटाइन राहाणे हे त्याचेच एक उदाहरण आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियातील चाहत्यांनी खुप प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण करणार नाही, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. वाचा- क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिक्रिया दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, निक हॉकले यांनी सोमवारी स्पष्ट केली की, भारताने ब्रिसबेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीबाबत अधिकृतपणे काहीच सांगिले नाही. त्यामुळे मालिका नियोजनानुसार पुढे चालेल. आम्ही रोज बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतो. गेल्या २४ तासात ब्रिसबेन कसोटीत कोणत्या गोष्टींची गरज आहे याची माहिती आम्ही त्यांनी दिली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/388k11D

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...