सिडनी: kl rahulऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याआधी भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. याआधी जलद गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाल्यामुळे तो अखेरच्या दोन सामन्यातून संघाबाहेर झाला होता. आता भारतीय संघातील फलंदाजाला दुखापत झाली असून तो उर्वरीत दोन सामने खेळू शकणार नाही. वाचा- भारतीय संघातील सलामीवीर सराव करताना जखमी झाला. यामुळे आता तो पुढील दोन्ही लढतीसाठी उपलब्ध असणार नाही. मेलबर्नमध्ये शनिवारी भारतीय संघ नेटमध्ये सराव करत असताना त्याच्या डाव्या मनगटाला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला किमान ३ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती बीसीसीआयने मंगळवारी दिली. वाचा- बीसीसीआयने राहुलच्या दुखापतीसंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, मेलबर्न मैदानावर भारतीय संघ सराव करत असताना राहुलच्या मनगटाला दुखापत झाली. या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी आणि फिट होण्यासाठी त्याला किमान ३ आठवडे इतका वेळ लागू शकतो. आता राहुल मायदेशात परतणार आहे आणि बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे दाखल होइल. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यासाठी राहुलला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झालेले भारतीय खेळाडू १) मोहम्मद शमी २) उमेश यादव ३) लोकेश राहुल आयपीएलमध्ये दुखापत झाल्याने इशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळता आले नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ohxHgm
No comments:
Post a Comment