क्राइस्टचर्च: न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने द्विशतक झळकावत अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. त्याच बरोबर हेन्नी निकोलस आणि डेरेल मिचेल यांनी शतकी खेळी केली. न्यूझीलंडने पहिला डाव ६ बाद ००० धावांवर घोषित करून ३६२ धावांची आघाडी घेतली. वाचा- पाकने पहिल्या डावात २९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडची अवस्था त्यांनी ३ बाद ७१ अशी केली होती. पण केन आणि निकोलस यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी ३६९ धावांची भागिदारी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांची हवाच काढून घेतली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकने १ बाद ८ धावा केल्या होत्या. डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप ३५४ धावांची गरज आहे. वाचा- या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अतिशय खराब गोलंदाजी केली. त्यांनी एकूण ६४ अतिरिक्त धावा दिल्या. यातील १७ चेंडू हे वाइड होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ही फक्त पाचवी वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने डावात १७ पेक्षा अधिक वाइड चेंडू टाकले असतील. या यादीत वेस्ट इंडिजने २००८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ वाइड चेंडू टाकले होते. २०१९ साली इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध २१ वाइड, २००४ साली वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध एका डावात १८ वाइड चेंडू टाकले. आता पाकिस्तानने १७ वाइड चेंडू टाकले आहेत. वाचा- पहिल्या डावात न्यूझीलंडचा कर्णधार याने ९ तास फलंदाजी केली. यात ३६४ चेंडूत १२ चौकारांसह २३८ धावा केल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केनने कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात वेगाने ७ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. कसोटीत सर्वात वेगाने ७ हजार धावा करणाऱ्या यादीत तो ५१व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडकडून याआधी रॉस टेलरने ७ हजार ३७९ तर स्टीफन फ्लेमिंगने ७ हजार १७२ धावा केल्या आहेत. केनने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या कसोटीतील ६ हजार ९९६ धावांचा विक्रम मागे टाकला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hLXUkF
No comments:
Post a Comment