नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. एडिलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारताने मेलबर्नमध्ये धमाकेदार कमबॅक केला होता. चार सामन्यांची मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफरने कर्णधार याला एक सीक्रेट मेसेज पाठवला आहे. वाचा- वाचा- विराट कोहली, मोहम्मद शमी हे दोन महत्त्वाचे खेळाडू संघात नसताना अजिंक्य रहाणेने दुसऱ्या कसोटीत संघाचे नेतृत्व केले आणि शतकी खेळी करत विजय मिळून दिला. या सामन्यात त्याने नेतृत्व गुणाची छाप टाकली. मालिकेतील तिसऱ्या लढती आधी जाफरने सोशल मीडियावर एक मेसेज शेअर केला असून तो डिकोड करणे अवघड आहे. वाचा- वाचा- सोशल मीडियावर अनेक युझर्स सध्या हा मेसेज डिकोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाफरने इंग्रजीत oday I had nice filter coffee by the lake. Amazing how fish can breathe underwater. Then I walked past a potrait of Che Guevara before bumping into an old pal from Dombivali who now has a restaurant in Borivali. असा मेसेज लिहला आहे. त्याआधी सिडनी कसोटीसाठी अजिंक्यला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा मेसजे डिकोड करण्यास सांगितले आहे. वाचा- वाचा- जाफरच्या या मेसजेवर सध्या प्रत्येक जण विचार करून वेगवेगळे उत्तर देत आहे. काहींच्या मते filter coffee म्हणजे केएल राहुल, fish breathe म्हणजे शुभमन गिल, Che Guevara म्हणजे चेतेश्वर पुजारा, Dombivali म्हणजे अजिंक्य रहाणे, तर Borivali म्हणजे रोहित शर्मा असा असू शकतो. वाचा- filter coffee हा शब्द राहुलासाठी वापरला असला तरी तो दुखापतीमुळे पुढील दोन्ही सामन्यांसाठी संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे काहींनी filter coffee म्हणजे आर अश्विन असल्याचे म्हटले आहे. काहींच्या मते हा शब्द मयांक अग्रवालसाठी वापरण्यात आला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ndZTzl
No comments:
Post a Comment