Ads

Tuesday, January 5, 2021

AUS vs IND 3rd Test: सिडनीत अजिंक्य रहाणे इतिहास घडवणार? ४३ वर्षापूर्वी मिळाला होता...

सिडनी: Australia vs India 3rd Test भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या ७ जानेवारीपासून तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. मेलबर्नमधील विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि तसाच विजय पुन्हा एकदा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. वाचा- एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर मेलबर्नमध्ये भारताने शानदार कमबॅक केले. विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. मालिका सध्या बरोबरीत असल्याने महत्त्वाची ठरणार आहे. वाचा- ऑस्ट्रेलियातील सिडनी मैदानावरील रेकॉर्ड पाहिले तर येथे भारतीय संघाची कामगिरी फार चांगली नाही. यजमान ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध चांगली आहे. भारताने गेल्या दौऱ्या ऋषभ पंतच्या शतकाच्या मदतीने ७ बाद ६२२ धावा केल्या होत्या. त्यानंतर कुलदीप यादवने पाच विकेट घेत भारताला मजबूत स्थितत पोहोचवले होते. पण पावसामुळे भारताच्या स्वप्नांवर पाणी फेरले आणि तो सामना ड्रॉ झाला. या वर्षी देखील भारतीय संघ गेल्या वेळी प्रमाणे दमदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल. सिडनीतील रेकॉर्डवर एक नजर... वाचा- १) भारतीय संघाने सिडनी क्रिकेट मैदानावर फक्त एका कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. हा विजय १९७८ साली मिळवला होता. या मैदानावरील विजयाचा दुष्काळ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संपवण्याचा प्रयत्न करेल. २) भारताने या मैदानावर १२ कसोटी सामने खेळेल असून त्यापैकी फक्त एकात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध या मैदानावर पाच सामने जिंकले आहेत तर सहा सामने ड्रॉ झाले आहेत. ३) या मैदानावर सर्वात यशस्वी फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. त्याने सिडनीत ७८५ धावा केल्या आहेत. यात ३ शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर अनिल कुंबळेने या मैदानावर २० विकेट घेतल्या आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bdptCg

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...