Ads

Wednesday, January 6, 2021

Kapil Dev Birthday: या क्रिकेटपटूसाठी चाहते म्हणाले होते, गावस्कर गो बॅक!

नवी दिल्ली: birthday भारतीय क्रिकेटमधील सर्वात दिग्गज ऑलराउडर (kapil dev ) आज त्यांचा ६२वा वाढदिवस साजरा करत आहेत. आजच्या दिवशी ६ जानेवारी १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला होता. कपिल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ साली सर्व प्रथम वर्ल्डकप जिंकला होता. कपिल देव यांच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे विक्रम... वाचा- एकमेव क्रिकेटपटू... कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ५ हजार २४८ धावा आणि ४३४ विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारे ते एकमेव खेळाडू आहेत. कपिल देव यांनी २२५ वनडे सामन्यात ३ हजार ७८३ धावा आणि २५३ विकेट घेतल्या आहेत. वाचा- कसोटीत ४ हजार धावा आणि ४०० विकेट अशी कामगिरी करणारे देखील ते एकमेव खेळाडू आहेत. कसोटीत त्यांनी ५ हजार २४८ धावा केल्या असून त्यात ८ शतकांचा समावेश आहे. कसोटी कपिल देव यांनी ४३४ विकेट घेतल्या असून हा विक्रम आठ वर्ष त्यांच्या नावावर होता. वेस्ट इंडिजचा कॉर्टनी वॉल्शने २००० साली हा विक्रम मागे टाकला. कपिल देव यांनी १९८३ सालच्या वर्ल्डकप स्पर्धेत ८ सामन्यात ३०३ धावा आणि १२ विकेट घेतल्या होत्या. या स्पर्धेत त्यांनी ७ कॅच घेतले होते. झिम्बब्वेविरुद्ध त्यांनी १७५ धावांची धमाकेदार खेळी केली होती. वाचा- सुनिल गावस्कर यांच्या मते कपिल देव हे भारताचे पहिले स्मॉल टाउन हिरो आहेत. त्यांनी संपूर्ण करिअरमध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व केले. या शिवाय ते इंग्लंश काउंटीमध्ये वॉस्टरशर आणि नॉर्थहॅम्पटनशर संघाकडून क्रिकेट खेळले. कमालीचा फिटनेस कपिल देव हे एक फिट खेळाडू होते. करिअरमधील १८४ डावात ते एकदाही धावबाद झाले नाहीत १९८४-८५ साली इंग्लंडविरुद्ध त्यांना वगळण्यात आले नसते तर देव यांनी कसोटीत सलग १३२ सामने खेळले असते. कपिल देव यांनी १९९३-९४ साली कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर रिचर्ड हेडली यांचा ४३१ विकेटचा विक्रम मागे टाकला. नो कपिल, नो कसोटी कपिल देव यांच्या चाहत्यांची संख्या इतकी मोठी होती की जेव्हा १९८४ साली भारतीय संघ त्यांच्या शिवाय मैदानात उतरला तेव्हा चाहते नाराज झाले. त्यांनी या गोष्टीला कर्णधार सुनील गावस्कर यांना जबाबदार धरले होते. तेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. पहिल्या कसोटीत भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर दिल्ली कसोटीत भारताचा पराभव झाला. या पराभवाला कपिल देव यांची फलंदाजी जबाबदार असल्याचे म्हटले गेले. त्यामुळे कोलकाता कसोटीत त्यांचा संघात समावेश झाला नाही. पण चाहते यावर नाराज झाले. त्यांनी मैदानात घोषणा बाजी सुरू केली. आम्हाला कपिल देव हवा, गावस्कर गो बॅक! या घटनेनंतर बऱ्याच कालावधीनंतर गावस्कर यांनी कपिल देव यांना न घेण्याचा निर्णय निवड समितीचा होता असे सांगितले.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nj2ubl

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...