सिडनी: AUS vs IND 3rd Testऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर उद्या (७ जानेवारी)पासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात बदल केले आहेत. तिसऱ्या कसोटीसाठी भारताने संघात दोन बदल केले आहेत. वाचा- सिडनीत उद्यापासून होणाऱ्या कसोटी रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी निवड समितीने नवदीप सैनीवर विश्वास दाखवला आहे. तो भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करेल. उमेश यादवच्या जागी शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांच्यात चुरस होती. पण संघ व्यवस्थापनाने सैनीवर विश्वास दाखवला आहे. वाचा- सलामीवीर मयांक अग्रवालच्या जागी स्टार फलंदाज रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन्ही कसोटीत मयांक अग्रवालला धावा करता आल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्या जागी रोहितला संधी देण्यात आली आहे. वाचा- असा आहे भारतीय संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s19JIs
No comments:
Post a Comment