नवी दिल्ली: देशात करोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलचा १३वा ( ) हंगाम युएईमध्ये आयोजित केला होता. ही लीग सुरू असताना एका क्रिकेटपटूकडून स्पर्धेतील गोपनीय माहिती मागितली गेल्याची घटना उघडकीस आली आहे. राजधानी दिल्लीतील एका नर्सवर आरोप आहे की, तिने संबंधित क्रिकेटपटूकडून सोशल मीडियावर संघाची गोपनीय माहिती मागितली. या माहितीच्या आधारावर तिला आयपीएलमधील सामन्यात सट्टा लावायचा होता. संदर्भातील माहिती ३० सप्टेंबर रोजी मागवण्यात आली होती. वाचा- संबंधित नर्सने स्वत:ला दक्षिण दिल्लीतील एका रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. ज्या क्रिकेटपटूकडून ही माहिती मागवण्यात आली होती. त्याने काही वर्ष भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. या क्रिकेटपटूने या घटनेची माहिती बीसीसीआयच्या एटी करप्शन युनिटला दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रिकेटपटू आणि नर्स तीन वर्षांपूर्वी एका ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून भेटले होते. या नर्सने व्यवस्थापक असल्याचे सांगितले होते आणि एका खासजी रुग्णालयात डॉक्टर असल्याचे म्हटले होते. चौकशीत ही गोष्टी देखील समोर आली आहे की क्रिकेटपटू काही काळापूर्वीच या नर्सच्या संपर्कात आला आणि त्याने करोना व्हायरसपासून कसा बचाव करायचा, कोणती काळजी घ्यायची याचा सल्ला मागितला होता. वाचा- बीसीसीआयच्या ACUचे प्रमुख अजीत सिंह यांनी अशा प्रकारची घटना झाल्याचे म्हटले आहे. पण आता ही केस बंद झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित क्रिकेटपटूने आम्हाला आयपीएल सुरू असताना याची माहिती दिली होती. आम्ही त्याची चौकशी केली आणि केस बंद केली. ज्या महिलेने खेळाडूशी संपर्क केला होता ती कोणत्याही सट्टेबाजाशी जोडली गेली नव्हती असे सिंह यांनी सांगितले. आम्ही या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली. संबंधित महिला खेळाडूला ओळखत होती. तर खेळाडूने या घटनेची माहिती आम्हाला दिली. या नर्सला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पण त्यातून काही खास माहिती मिळाली नाही. हे प्रकरण आम्ही बंद केले आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित क्रिकेटपटू कधीच त्या महिलेला भेटला नव्हता त्यांची फक्त सोशल मीडियावर चर्चा होत असे. वाचा- हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा एका महिन्यांनी आणखी एका खेळाडूने ACUकडे संपर्क केला. या खेळाडूच्या एका ओळखीच्या व्यक्तीने आयपीएल संदर्भात त्याच्याशी संपर्क केला होता. संबंधित खेळाडूला संशय आल्याने त्याने संघ व्यवस्थापनाच्या कानावर ही माहिती घातली. २०१३ साली आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांना दोन वर्षांची बंदी घातली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bfv5MB
No comments:
Post a Comment