क्राइस्टचर्च: पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा कर्णधार ()ने इतिहास घडवला. काल केनने शतक पूर्णकरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुनिल गावस्कर यांच्या ३५ शतकांचा विक्रम मागे टाकला. आत केनने आणखी एक पाऊल पुढे टाकत महान खेळाडू सर यांचा विक्रम मागे टाकला. वाचा- सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केनने कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून सर्वात वेगाने ७ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. कसोटीत सर्वात वेगाने ७ हजार धावा करणाऱ्या यादीत तो ५१व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडकडून याआधी रॉस टेलरने ७ हजार ३७९ तर स्टीफन फ्लेमिंगने ७ हजार १७२ धावा केल्या आहेत. केनने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या कसोटीतील ६ हजार ९९६ धावांचा विक्रम मागे टाकला. ब्रॅडमन यांनी ५२ कसोटीतील ८० धावात ९९.९४च्या सरासरीने ६ हजार ९९६ धावा केल्या. ३३४ ही त्यांची सर्वोच्च खेळी होती. ब्रॅडमन यांनी करिअरमध्ये २९ शतक केली होती. ते १० वेळा पॅव्हेलियनमध्ये नाबाद परतले होते. वाचा- वाचा- मंगळवारी केनने कसोटी क्रिकेटमधील चौथे पूर्ण केले. तो २३८ धावांवर बाद झाला. या द्विशतकासह त्याने कसोटीमधील १४ दिग्गजांना मागे टाकले. केनने स्टीव्ह स्मिथ, जो रूट, चेतेश्वर पुजार अशा १४ खेळाडूंच्या प्रत्येकी ३ द्विशतकांचा विक्रम मागे टाकला. केनने हेन्नी निकोलस चौथ्या विकेटसाठी ३६९ धावांची भागिदारी केली. निकोलसने १५७ धावा केल्या. त्यानंतर डेरिल मिशेलने ११२ चेंडूत नाबाद १०२ धावा केल्या. न्यूझीलंडने त्यांचा पहिला डाव ६ बाद ६५९ धावांवर घोषीत केला. वाचा- केन आणि निकोलस यांनी केलेली भागिदारी ही कोणत्याही देशाविरुद्ध न्यूझीलंडने केलेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी देखील देशाकडून सर्वोत्तम भागिदारीचा विक्रम त्याने केला. याआधी हा विक्रम रॉस टेलर आणि जेसी रायडर यांच्या नावावर होता. या दोघांनी २००९ साली भारताविरुद्ध विक्रमी भागिदारी केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ohKKOS
No comments:
Post a Comment