
सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना १५ जानेवारीला ब्रिस्बेन येथे खेळायचा की नाही, याबाबतची स्पष्ट भूमिका आता बीसीसीआयने घेतली आहे. बीसीसीआयने आपली भूमिका ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळापुढे मांडली आहे. त्यामुळे आता चौथा सामना खेळवायचा की नाही, याबाबतचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला घ्यायचा आहे. सिडनीनंतर ब्रिस्बेनमध्ये जेव्हा भारतीय संघ पोहोचेल तेव्हा त्यांना क्वारंटाइन व्हावे लागेल, असे तेथील स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे. यावर बरेच वाद विवाद झाले होते आणि आमचा संघ क्वारंटाइन होणार नाही, याबाबतची स्पष्ट भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये पोहोचल्यावर क्वारंटाइनमधून सवलत द्यावी, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. जर क्वारंटाइनचे नियम शिथिल केले नाहीत तर चौथा कसोटी सामना खेळायला भारतीय संघ ब्रिस्बेनला जाणार नाही, अशी भूमिका आता बीसीसीआयने घेतली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, " चौथा सामना खेळायला भारतीय संघ ब्रिस्बेन येथे जाणार की नाही, याबाबत बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला लिखीत स्वरुपात आपली भूमिका सांगितली आहे. जर ब्रिस्बेनमधील क्वारंटाइनचे नियम कायम राहिले तर भारतीय संघ तिथे चौथा कसोटी सामना खेळायला जाणार नाही. कारण भारतीय संघ क्वारंटाइनच्या कडक नियमांचे पालन करणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्टपणे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला सांगितले आहे." आता बीसीसीआयने या मुद्द्यावर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला अल्टीमेटम देणार असल्याचे समजते आहे. येत्या काही दिवसांत जर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने योग्य तो निर्णय घेतला नाही, तर ही मालिका तीन कसोटी सामन्यांची होऊ शकते. कारण जर बीसीसीआयला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाचे म्हणणे पटले नाही तर चौथा कसोटी सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयने यावेळी सांगितले आहे की, भारतीय संघ पुन्हा एकदा क्वारंटाइन होणार नाही. पण जर नियम शिथिल केले गेले नाहीत तर दोन पर्याय अजूनही खुले आहेत. चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेनमधून रद्द करून तो सिडनी येथे खेळवण्यात येऊ शकतो. हा सर्वात योग्य पर्याय असल्याचे सध्याच्या घडीला दिसत आहे. पण जर हा पर्याय बीसीसीआयला मान्य नसेल तर चौथा सामना रद्द करावा लागेल आणि ही कसोटी मालिका तीन सामन्यांची असेल. त्यामुळे आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया बीसीसीआयपुढे कोणता पर्याय ठेवते आणि त्यावर बीसीसीआय काय निर्णय घेते, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/39dCMjr
No comments:
Post a Comment