
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत सामन्यात भारतीय डावात सर्वांचे लक्ष्य भारताचा स्टार सलामीवीर ( ) याच्यावर आहे. दुखापतीनंतर रोहित शर्मा भारतीय संघाकडून प्रथमच खेळत आहे. विराट कोहली नसताना त्याच्या तोडीचा फलंदाज संघात रोहितच आहे. रोहितने शुभमन गिलसह पहिल्या डावात अर्धशतकी भागिदारी केली. या दोघांनी भारताला चांगली सुरूवात करुन दिली. रोहित २६ धावांवर बाद झाला. त्याने पहिल्या विकेटसाठी गिल सोबत ७० धावांची भागिदारी केली. रोहितला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. भारतीय डावातील १६व्या षटकात नाथन लायनच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. या षटकाराने रोहितनच्या नाववर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. रोहितने सिडनी मैदानावर मारलेला षटकार हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १००वा षटकार ठरला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. भारताकडून रोहितनंतर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ६० षटकार मारले आहेत. सिडनीतील षटकारासह रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४२३ षटकार मारले आहेत. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ६३ षटकार मारले आहेत. एका देशाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध १३० षटकार मारले आहेत. गेल आणि रोहित असे दोनच फलंदाज आहेत ज्यांनी एखाद्या देशाविरुद्ध १०० पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज रोहित शर्मा- १०० षटकार इयोन मॉर्गन- ६३ षटकार ब्रॅडन मॅक्कलम- ६१ षटकार सचिन तेंडुलकर- ६३ षटकार एमएस धोनी- ६० षटकार एखाद्या देशाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज १३० षटकार- ख्रिस गेल विरुद्ध इंग्लंड १०० षटकार- रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया ८७ षटकार- ख्रिस गेल विरुद्ध न्यूझीलंड ८६ षटकार- शाहीद आफ्रिदी विरुद्ध श्रीलंका
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38mQvp8
No comments:
Post a Comment