
सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने २ बाद ९६ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात आहेत. भारत अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ()चे शानदार शतक आणि भारताचा अष्टपैलू () गोलंदाजी ही दुसऱ्या दिवसाच्या डावाचे मुख्य वैशिष्ट ठरले. वाचा- सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने कालच्या २ बाद १६६ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी भागिदारी केली. लाबुशेन शतकाच्या जवळ पोहोचला असता रविंद्र जडेजाने त्याला ९१ धावांवर बाद केले. कर्णधार अजिंक्य रहाणे स्लिपमध्ये त्याचा शानदार कॅच घेतला. त्यानंतर आलेल्या मॅथ्यू वेड वेगवान धावा करण्याचा प्रयत्नात १३ धावांवर बाद झाला. त्याला जडेजाने बाद केले. दरम्यान स्मिथने अर्धशतक पूर्ण केले. वाचा- पहिले सत्र संपण्याआधी बुमराहने कॅमरून ग्रीनला शून्यावर माघारी पाठवले. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच बुमराहने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनची बोल्ड काढली. त्या पाठोपाठ जडेजाने पॅट कमिन्सला शून्यावर बाद केले. पदार्पण करणाऱ्या सैनीने मिचेल स्टार्कला २४ धावांवर बाद केले. तर जडेजाने नॅथन लायनला शून्यावर बाद केले. या दरम्यान स्मिथने कसोटीतील २७वे शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाने देखील ३०० धावांचा टप्पा पार केला. ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्ठात येण्याआधी स्मिथने धावांचा वेग वाढवला. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याला जडेजाने धावाबाद केले. स्मिथने २२६ चेंडूत १६ चौकारांसह १३१ धावा केल्या. भारताकडून जडेजाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. बुमराह आणि नवदीप सैनीने प्रत्येकी २ तर मोहम्मद सिराजे एक विकेट घेतली. वाचा- भारताच्या डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी केली. ही जोडी टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभी करून देईल असे वाटत असताना जोश हेजलवुडने रोहितला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर गिलने कसोटी करिअरमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो लगेच बाद झाला. दोन्ही सलामीवीर कमी अंतराने बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ८५ अशी झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजार यांनी विकेट पडू दिली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २ बाद ९६ धावा केल्या होत्या. पुजारा ९ तर रहाणे ५ धावांवर नाबाद आहेत. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35moJqH
No comments:
Post a Comment