सिडनी, : दुखापतीमुळे आता रवींद्र जडेजा तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे. पण दुसरीकडे रिषभ पंतलाही तिसऱ्या दिवशी गंभीर दुखापत झाली होती. पण तो तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही, जाणून घ्या... वेगवान चेंडू लागल्यामुळे जडेजाचा अंगठा फ्रॅक्टर झाला आहे. त्यामुळे त्याला चौथ्या कसोटी सामन्यातही खेळता येणार नाही. तिसऱ्या दिवशी पंतला फलंदाजी करताना चांगलाच मार बसला होता. त्यामुळे पंचला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. पंतचा वैद्यकीय अहवाल आता भारतीय संघाला मिळालेला आहे. पंतची दुखापत ही जास्त गंभीर नसून त्याच्या हाताचे दुखणे अजून थांबलेले नाही. पंतच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे पंत लवकरच बरा होईल, अशी आशा भारतीय संघाला आहे. त्यामुळे पंत सामन्याच्या पाचव्या दिवशी फलंदाजी करण्यासाठई मैदानात उतरेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही आशादायक बाब आहे. पंतला जर दुखापतीमुळे मैदानात उतरता आले नाही, तर त्याच्या जागी वृद्धिमान साहाला संघात स्थान देण्यात आले आहे. पंत जर फलंदाजी करू शकला नाही तर साहाला फलंदाजी करायला जावे लागेल. त्यामुळे आता पाचव्या दिवशी पंत फलंदाजीला येणार की साहा, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. ऑस्ट्रेलियाने काल २ बाद १०२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ९८ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर भारतीय संघ विजयासाठी मैदानात उतरला. चौथ्या दिवसअखेर भारताने आपले दोन्ही सलामीवीर गमावले असून त्यांची २ बाद ९८ अशी अवस्था आहे. भारतीय संघाला विजयासाठी पाचव्या दिवशी ३०९ धावांची गरज असून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे खेळपट्टीवर आहेत. त्यामुळे भारतासाठी या सामन्याच्या पाचवा दिवस महत्वाचा ठरणार आहे. पाचव्या दिवशी कोणता संघ नेमका सामना जिंकतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bCBamv
No comments:
Post a Comment