सिडनी, : करोनाच्या संकटामुळे भारतीय संघ ब्रिस्बेन येथे होणार चौथा कसोटी सामना खेळण्याच्या तयारीत नव्हती. पण आता भारतीय संघ चौथा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना खेळण्यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळापुढे आता एक महत्वाची अट ठेवली आहे. ब्रिस्बेनमध्ये करोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे भारतीय संघाला ब्रिस्बेनमध्ये आल्यावर क्वारंटाइन व्हावे लागेल, अशी भूमिका ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाने घेतली होती. पण बीसीसीआयने या गोष्टीला विरोध केला होता. जर क्वारंटाइनचे नियम शिथिल केले तरच भारतीय संघ चौथा कसोटी सामना खेळेल, असे बीसीसीआयने स्पष्टपणे सांगितले होते. पण आता बीसीसीआय चौथा कसोटी सामना खेळायला तयार झाली आहे. पण बीसीसीआयने यावेळी एक महत्वाची अट ठेवलेली आहे. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळापुढे कोणती महत्वाची अट ठेवली, पाहा... चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळापुढे आता एक महत्वाची अट ठेवली आहे. बीसीसीआयने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला सांगितले आहे की, " चौथा कसोटी सामना संपल्यावर भारतीय संघ एक दिवसही ब्रिस्बेनमध्ये राहणार नाही. सामना संपल्यावर भारतीय संघाला लगेचच ब्रिस्बेनमधून हलवण्यात यावे." बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. या अटीवरच हा सामना खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने काल २ बाद १०२ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ९८ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ३१२ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर भारतीय संघ विजयासाठी मैदानात उतरला. चौथ्या दिवसअखेर भारताने आपले दोन्ही सलामीवीर गमावले असून त्यांची २ बाद ९८ अशी अवस्था आहे. भारतीय संघाला विजयासाठी पाचव्या दिवशी ३०९ धावांची गरज असून कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे खेळपट्टीवर आहेत. त्यामुळे भारतासाठी या सामन्याच्या पाचवा दिवस महत्वाचा ठरणार आहे. पाचव्या दिवशी कोणता संघ नेमका सामना जिंकतो, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38vHuu4
No comments:
Post a Comment