मुंबई: दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुनरागमानासाठी सज्ज झाला आहे. १२ मार्चपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तो भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्याआधी हार्दिकने एक धमाकेदार खेळी केली आहे. वाचा- मुंबईत सुरू असलेल्या डीवाय पाटील टी-२० कप स्पर्धेत हार्दिकने शतकी खेळी केली. त्याने ३९ चेंडूत १०५ धावा केल्या. इतक नव्हे तर फलंदाजीनंतर गोलंदाजीत कमाल करत ५ विकेट देखील घेतल्या. वाचा- अष्ठपैलू हार्दिकने रिलायन्स वन संघाकडून खेळताना ८ चौकार आणि १० षटकार मारत ३७ चेंडूत १०० धावा केल्या. हार्दिकच्या या खेळीमुळे रिलायन्सने सीएजी विरुद्ध २० षटकात ५ बाद २२५ धावा केल्या. त्यानंतर रिलायन्सने सीएजीचा १५१ धावांवर ऑल आउट करत १०१ धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद देखील उपस्थित होते. हार्दिक गेल्या ६ महिन्यांपासून मैदानाबाहेर आहे. आता त्याने धमाकेदार खेळी करत आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. याआधी ही दुखापतीनंतर कमबॅक करताना हार्दिकने २५ चेंडूत ३८ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2PMsiyJ
No comments:
Post a Comment