सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही आणि फलंदाजी देखील करू शकणार नाही. जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा सेटबॅक बसला आहे. वाचा- भारतीय संघाच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना जडेजाला दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतर ही जडेजाने फलंदाजी केली. पण त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जडेजाच्या अंगठ्याला फॅक्चर झाले असू तो चौथ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, जडेजा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत खेळू शकणार नाही इतक नाहीतर ऑस्ट्रेलिया दौरा झाल्यानंतर मायदेशात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात जडेजा खेळू शकणार नाही. वाचा- जडेजाला ठिक होण्यासाठी किमान ४ ते ६ आठवड्यांचा कालावधी लागेल. तोपर्यत त्याला दुखापतीतून रिकव्हर होण्यासाठी वेळ द्यावा लागले. अशा परिस्थितीत तो इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी ५ फेब्रुवारी रोजी चेन्नईत तर दुसरी कसोटी चेन्नईमध्येच १७ फेब्रुवारीपासून सुरू होईल. वाचा- सिडनी कसोटीत जडेजाने पहिल्या डावात ४ विकेट घेतल्या होत्या आणि २४ धावा केल्या होत्या. सिडनी कसोटी वाचवण्यासाठी जर गरज पडली तर जडेजाला पेन किलर देऊन मैदानात उतरवले जाऊ शकते असे सूत्रांनी सांगितले. चार सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे भारत हा सामना वाचवण्याचा प्रयत्न नक्की करेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MUfckv
No comments:
Post a Comment