सिडनी, : भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आटोपला. यामध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे मोठे योगदान होते. भारताने दुसऱ्या दिवशी नेमकी कोणती रणनिती आखली, याबाबतचा मोठा खुलासा जडेजाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यावर केला आहे. दुसऱ्या दिवशीच्या रणनितीबाबत जडेजा म्हणाला की, " दोन्ही संघांसाठी सामन्याचा दुसरा दिवस महत्वाचा होता. त्यामुळे आम्ही खास रणनिती आखली होती. त्यानुसार आम्ही जेवढे निर्धाव चेंडू टाकता येतील, तेवढे टाकण्याचा प्रयत्न करायचे ठरवले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चौकार आणि षटकार कसे मारता येणार नाहीत, याचीही काळजी घेतली होती. गोलंदाजांनी नेमका चेंडू कुठे आणि कसा टाकायचा, याबाबत आम्ही ठरवले होते. त्यानुसारच आम्ही दुसऱ्या दिवशी गोलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाच्या संघाला सर्वबाद करू शकलो." सामना जिंकण्यासाठी ही गोष्ट करावीच लागणार... भारताला जर दुसरा सामना जिंकायचा असेल, तर काय करायला हवे, याबाबतची जडेजाने आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत जडेजा म्हणाला की, " तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना आम्हाला मोठा धावसंख्या उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीय संघाला कोणत्याही एका फलंदाजावर अवलंबून राहून चाणार नाही. भारताच्या सर्वच खेळाडूंनी धाव जमवण्यात आपले योगदान देणे गरजेचे आहे. पहिल्या डावात भारतीय संघ किती धावसंख्या उभारतो, यावर सामन्याचा निकाल लागू शकतो. त्यामुळे आमच्यासाठी किती धावा होतात, हे सर्वात महत्वाचे आहे." ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या रविंद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. त्याने भारताकडून सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जडेजाने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड अशा महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर रविंद्र जडेजा () सोशल मीडियावर चर्चेत आला. तुम्हाला वाटेल त्याने घेतलेल्या चार विकेटमुळे तो चर्चेत आला असेल. पण जडेजा चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात नाथन लायनची विकेट घेत जडेजाने त्यांना नववा धक्का दिला. त्यानंतर शतक झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. ऑस्ट्रेलिया ३५०च्या पुढे जाईल असे वाटत होते. तेव्हा जडेजाने शानदार थ्रो केला आणि स्मिथला धावबाद (steve smith run out) केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LBpVzK
No comments:
Post a Comment