सिडनी, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. एकिकडे जिथे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतीय फलंदाजांबरोबर स्लेजिंग करत असल्याचे पाहायला मिळाले, त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज शतकवीर फलंदाज स्टीव्हन स्मिथची नक्कल केली आहे. या गोष्टीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. स्मिथने दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावले, पण हे शतक झळकावताना त्याला चांगलाच संघर्ष करावा लागला. पण हे शतक झळकावत असताना मैदानात एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. बुमराने यावेळी स्मिथची मजेदार नक्कल केली आणि त्यानंतर भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आपले हसू आवरता आले नाही. स्मिथने फटका लगावल्यावर तो कसे हावभाव करतो, याची नक्कल यावेळी बुमराने केल्याचे पाहायला मिळाले आणि हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी केली. ही जोडी टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभी करून देईल असे वाटत असताना जोश हेजलवुडने रोहितला २७ धावांवर बाद केले. त्यानंतर गिलने कसोटी करिअरमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर तो लगेच बाद झाला. दोन्ही सलामीवीर कमी अंतराने बाद झाल्याने भारताची अवस्था २ बाद ८५ अशी झाली. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजार यांनी विकेट पडू दिली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने २ बाद ९६ धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा मैदानात आहेत. भारत अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ ()चे शानदार शतक आणि भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) गोलंदाजी ही दुसऱ्या दिवसाच्या डावाचे मुख्य वैशिष्ट ठरले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JYwGuU
No comments:
Post a Comment