सिडनी, : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने आजच्या सामन्यात पुनरागमन केले. पण रोहित शर्मा या सामन्यात एकदा बचावला होता. पंचांनी रोहितला बाद दिले होते, पण त्यानंतर वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. या गोष्टीचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. रोहितटने आजच्या डावाची दमदार सुरुवात केली. पुनरागमन करताना रोहित मोठी खेळी साकारणार, असे वाटत होते. पण रोहित २६ धावांवर असताना बाद झाला. पण त्यापूर्वी मैदानावरील पंचांनी रोहितला बाद दिले होते. रोहितचा एक झेल शॉर्ट लेगला असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने पकडला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार अपील केली आणि मैदानावरील पंचांनी रोहितला बाद ठरवले होते. पंचांनी रोहितला बाद ठरवले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आनंद साजरा करायला सुरुवात केली. पण त्याचवेळी रोहितने डीआरएसची मागणी केली. तिसऱ्या पंचांनी जेव्हा व्हिडीओ पाहिला तेव्हा रोहितची बॅट किंवा ग्लोव्ज चेंडूला लागलेला नव्हता. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी यावेळी रोहित नाबाद असल्याचा निर्णय दिला. त्यामुळेच रोहितला त्यानंतरही फलंदाजी करता आली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने रोहितला २६ धावांवर असताना बाद केले आणि भारताला पहिला धक्का दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या रविंद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली. त्याने भारताकडून सर्वाधिक चार विकेट घेतल्या. जडेजाने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड अशा महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव संपल्यानंतर रविंद्र जडेजा (ravindra jadeja) सोशल मीडियावर चर्चेत आला. तुम्हाला वाटेल त्याने घेतलेल्या चार विकेटमुळे तो चर्चेत आला असेल. पण जडेजा चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावात नाथन लायनची विकेट घेत जडेजाने त्यांना नववा धक्का दिला. त्यानंतर शतक झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. ऑस्ट्रेलिया ३५०च्या पुढे जाईल असे वाटत होते. तेव्हा जडेजाने शानदार थ्रो केला आणि स्मिथला धावबाद (steve smith run out) केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s7GaFt
No comments:
Post a Comment