सिडनी: aus vs ind 3rd test तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाला चोख उत्तर दिले आणि २ बाद ९६ धावा केल्या. भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजार मैदानावर आहेत. वाचा- ... वाचा- स्टीव्ह स्मिथचे शतक (१३१) आणि मार्नस लाबुशेन (९१)च्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रविंद्र जडेजाने ४ विकेट घेतल्या आणि स्मिथला शानदार थ्रो करून धावबाद केले. भारताच्या डावाची सुरूवात (rohit sharma ) आणि (shubman gill) ने केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७० धावा केल्या. रोहित शर्मा २६ धावांवर बाद झाला. तर गिलने कसोटी करिअरमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले. वाचा- वाचा- शर्मा-गिल जोडीने २७ षटके गोलंदाजी केली. डिसेंबर २०१० नंतर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारताच्या सलामीच्या जोडीने आशिया खंडाच्या बाहेर २० किंवा त्यापेक्षा अधिक षटके फलंदाजी केली. याआधी विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन मैदानावर २९.३ षटके फलंदाजी केली होती. त्यानंतर भारताने कसोटीत आशिया खंडाबाहेर ९२ डाव खेळले पण एकाही सलामीच्या जोडीला २० ओव्हर फलंदाजी करता आली नाही. वाचा- या जोडीने १९व्या षटकात ५० धावांची भागिदारी पूर्ण केली. गेल्या १४ डावात भारताच्या सलामीच्या जोडीने प्रथमच ५० हून अधिक धावा केल्या आहेत. याआधी २०१९ मध्ये रोहित आणि मयांक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध विशाखापट्टणम येथे ३१७ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3i2y8sQ
No comments:
Post a Comment