सिडनी, : कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथकडून रडीचा डाव पाहायला मिळाला. भारताचा रिषभ पंत हा धडाकेबाज फलंदाजी करत होता. पंतचे लक्ष विचलित करून त्याला बाद करण्यासाठी स्मिथ यावेळी रडीचा डाव खेळत असल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. पंतने पाचव्या दिवशी दमदार फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलियाला ती भारी पडली. पंतला लवकर बाद करण्यासाठी यावेळी स्मिथने एक वाईट कृत्य केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक फलंदाज जेव्हा बॅटींगला सुरुवात करतो त्यापूर्वी तो क्रीझमध्ये गार्ड घेतो. त्या गार्डवर तो आपली बॅट ठेवून फलंदाजी करत असतो. त्यामुळे प्रत्येक फलंदाजासाठी गार्ड हा महत्वाचा असतो. पण यावेळी पंतचा गार्ड पुसुन टाकण्याचे काम यावेळी स्मिथ करताना दिसला. स्मिथने आपल्या बुटांनी पंतचे गार्ड पुसुन टाकले. स्मिथ जेव्हा हे वाईट कृत्य करत होता, तेव्हा स्टम्पच्या कॅमेरामध्ये ही गोष्ट टिपली गेली. त्यामुळे स्मिथचे हे कृत्य आता क्रिकेट विश्वासमोर आले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चाहत्यांनी स्मिथला चांगलेच ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. चाहत्यांनी यावेळी स्मिथवर जोरदार टीका केली. पंतने पुजारासह चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची भागिदारी केली. कसोटीत चौथ्या विकेटसाठी भारताकडून झालेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. याआधी रुसी मोदी आणि विजय हजारे यांनी १९४८-४९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या विकेटसाठी १३९ धावा केल्या होत्या. तर दिलीप वेंगसरकर आणि यशपाल शर्मा यांनी पाकिस्तानविरुद्ध १९७९ मध्ये १२२ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवसाची सुरूवात भारतासाठी खराब झाली. कर्णधार रहाणे फक्त ४ धावांवर बाद झाला. भारत कसोटी गमवेल की काय असे वाटत होते. तेव्हा पंतने संघाला मोठा आधार दिला. त्याने विकेट पडू दिली नाही आणि धावा देखील आक्रमक केल्या. पंत ९७ धावांवर बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. भारतीय डावातील ७७व्या ओव्हरमध्ये कॅमरून ग्रीनला सलग चौकार तर नाथन लायनची ७८व्या षटकात धुलाई केली. लायनने ८०व्या षटकात त्यांची विकेट घेतली आणि भारताला चौथा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ४०९ धावांचे लक्ष्य दिले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38vMyyd
No comments:
Post a Comment