सिडनी: भारताचा कसोटी स्पेशालिस्ट ()ने सोमवारी करिअरमधील ६ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो ११वा भारतीय खेळाडू ठरला आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवशी ही कामगिरी केली. कसोटीत सर्वात वेगाने ६ हजार धावा करणारा तो सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीने पुजाराचे कौतुक केले आहे. वाचा- वाचा- पुजाराने १३४ व्या डावात ६ हजार धावा केल्या आहेत. भारताकडून सर्वात वेगाने ६ हजार धावा करण्याचा विक्रम महान फलंदाज सुनिल गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी ११७ डावात ६ हजार धावांचा टप्पा पार केला होता. कोहलीने ही कामगिरी ११९ धावा केली होती. सचिनने १२०व्या, सेहवागने १२३ तर राहुल द्रविडने १२५ डावात ६ हजार धावा केल्या होत्या. वाचा- ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पुजारा ७७ धावांवर बाद झाला. हे त्याचे २७वे अर्धशतक ठरले त्याने २०५ चेंडूत १२ चौकारांसह ७७ धावा केल्या. पुजाराने पंतसह चौथ्या विकेटसाठी १४८ धावा केल्या. भारतीय संघाकडून कसोटीत चौथ्या विकेटसाठी झालेली ही सर्वोच्च भागिदारी ठरली आहे. वाचा- कसोटीत ६ हजारहून अधिक धावा करणारे भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर- १५ हजार ९२१ राहुल द्रविड- १३ हजार २६५ सुनिल गावस्कर- १० हजार १२२ व्हीव्हीएस लक्ष्मण- ८ हजार ७८१ विरेंद्र सेहवाग- ८ हजार ५०३ विराट कोहली- ७ हजार ३१८ सौरव गांगुली- ७ हजार २१२ दिलीप वेंगसरकर- ६ हजार ८६८ मोहम्मद अझरूद्दीन- ६ हजार २१५ गुंडप्पा विश्वनाथ- ६ हजार धावा
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bobJEZ
No comments:
Post a Comment