सिडनी, : भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया जिंकणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण ऑस्ट्रेलियाला यावेळी एक चुक सर्वात जास्त महागात पडली. जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून ही चुक झाली नसती तर कदाचित या सामन्याचे चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून नेमकी कोणती मोठी चुक झाली, याचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत आहे. भारताने पाच विकेट्स गमावल्यावर ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकेल, असे काही जणांना वाटत होते. पण त्यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना केला आणि सामना वाचवला. पण यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाला एक चुक चांगलीच महागात पडली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकता आला नाही, असे म्हटले जात आहे. या सामन्यात जेव्हा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क भेदक मारा करत होता, तेव्हा ही गोष्ट पाहायला मिळाली. विहारी यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करत होता. यावेळी स्टार्कचा एक चेंडू विहारीच्या बॅटला लागला आणि तो थेट यष्टीरक्षकाजवळ गेला. यावेळी यष्टीरक्षक टीम पेनसाठी हा सोपा झेल होता. पण पेनने हा झेल सोडला आणि विहारीला जीवदान मिळाले. विहारी त्यावेळी १५ धावांवर होता. ही चुक झाल्यावर विहारी सजग झाला आणि त्याने अधिक चांगल्यापद्धतीने बचाव करायला सुरुवात केली. जर पेनने हा झेल पकडला असता तर त्यानंतर भारताचे तळाचे फलंदाज मैदानात आले असते आणि त्यांना बाद करणे ऑस्ट्रेलियाला तुलनेने सोपे गेले असते. पण हा एक झेल सुटल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या हातून सामना निसटल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या दिवसाची सुरूवात भारतासाठी खराब झाली. कर्णधार रहाणे फक्त ४ धावांवर बाद झाला. भारत कसोटी गमवेल की काय असे वाटत होते. तेव्हा पंतने संघाला मोठा आधार दिला. त्याने विकेट पडू दिली नाही आणि धावा देखील आक्रमक केल्या. पंत ९७ धावांवर बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. पंत आणि पुजारा बाद झाल्यावर विहारी व अश्विन यांनी चांगला किल्ला लढवला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3q5Vz7i
No comments:
Post a Comment