सिडनी: भारताविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटच्या मैदानावर शोभणार नाही असा काही घडना घडल्या. ऑस्ट्रेलियाच्या काही प्रेक्षकांनी भारताचे जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी शिविगाळ केली तसेच वर्णद्वेषी उल्लेख केला. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी ही घडना घडली होती. वाचा- शनिवारी झालेल्या या घटनेबद्दल भारतीय संघ व्यवस्थापनाने तक्रार केली होती. त्यानंतर रविवारी देखील अशी घटना पुन्हा एकदा मोहम्मद सिराज सोबत झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित प्रेक्षकांना मैदानाबाहेर घालवले. ही घटना जशी स्टेडियममध्ये झाली तशीच एक घटना मैदानात देखील झाली. वाचा- भारतीय संघाच्या पहिल्या डावात ही घटना घडली. चेतेश्वर पुजारा ५६व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा फलंदाजी करत असताना अपील केली. यावर अंपायरने त्याला नाबाद ठरवले. पण हा निर्णय मान्य नसल्याने त्यांनी DRS घेतला. तिसरे पंच जेव्हा रिप्ले पाहत होते, तेव्हा चेंडू हलकासा पुजाराच्या बॅटच्या जवळ असल्याचे पाहायला गेले. त्याचबरोबर चेंडू थोडासा पुजाराच्या बॅटला लागल्याचेही दिसत होते. पण त्यांनी तिसऱ्या पंचांनी यावेळी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवण्याचे ठरवले आणि त्यांनी पुजाराला नाबाद असल्याचा निर्णय दिला. वाचा- ... या निर्णयावर ऑस्ट्रेलिया कर्णधार हा चांगलाच भडकला आणि त्याने मैदानावरील अंपायर पॉल विल्सन यांच्यासाठी अपशब्द वापरले. मैदानावरील अंपायर विल्सन यांनी पेनला सांगितले की, हा निर्णय तिसऱ्या अंपायरनी दिला आहे आणि मी मैदानावरील अंपायर आहे. पण त्यानंतरही पेन शांत झालेला पाहायला मिळाला नाही. त्यानंतरही पेनने विल्सन यांना अपशब्द वापरले. या घटनेची गंभीर दखल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने घेतली आहे. आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांनी पेनला मॅच फीच्या १५ टक्के इतका दंड केला आहे. पेनला आयसीसी निमय २.८ नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. वाचा- दंडासह पेनला एक डिमॅरिट अंक दिला असून गेल्या २४ महिन्यातील ही त्याची पहिली चूक आहे असे आयसीसीने म्हटले आहे. पेनने हा दंड स्विकारला असून याची सुनावणी होणार नाही असे आयसीसीने स्पष्ट केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3q0fmVI
No comments:
Post a Comment