सिडनी: भारतीय संघातील विकेटकिपर आणि फलंदज ()ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. पण त्याचे शतक फक्त ३ धावांनी हुकले. पाचव्या दिवशी भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट गमावली तेव्हा संघ अडचणीत सापडला होता. पण पंतने चेतेश्वर पुजारासह विक्रमी भागिदारी केली आणि भारत हा सामना वाचवण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी खेळतोय हा विश्वास दिला. वाचा- पाचव्या दिवसाची सुरूवात भारतासाठी खराब झाली. कर्णधार रहाणे फक्त ४ धावांवर बाद झाला. भारत कसोटी गमवेल की काय असे वाटत होते. तेव्हा पंतने संघाला मोठा आधार दिला. त्याने विकेट पडू दिली नाही आणि धावा देखील आक्रमक केल्या. पंत ९७ धावांवर बाद झाला. त्याने ११८ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकार मारले. वाचा- भारतीय डावातील ७७व्या ओव्हरमध्ये कॅमरून ग्रीनला सलग चौकार तर नाथन लायनची ७८व्या षटकात धुलाई केली. लायनने ८०व्या षटकात त्यांची विकेट घेतली आणि भारताला चौथा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ४०९ धावांचे लक्ष्य दिले आहे. वाचा- पंतने पुजारासह चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची भागिदारी केली. कसोटीत चौथ्या विकेटसाठी भारताकडून झालेली ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. याआधी रुसी मोदी आणि विजय हजारे यांनी १९४८-४९ साली वेस्ट इंडिजविरुद्ध चौथ्या विकेटसाठी १३९ धावा केल्या होत्या. तर दिलीप वेंगसरकर आणि यशपाल शर्मा यांनी पाकिस्तानविरुद्ध १९७९ मध्ये १२२ धावा केल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ozFu9t
No comments:
Post a Comment