: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गांगुलीला कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखले केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सौरवला 'सौम्य कार्डियक अरेस्ट' झटका बसला आहे. शुक्रवारी सकाळी घरी जिममध्ये काही काळ घालवल्यानंतर गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गांगुलीला 'कार्डियक अरेस्ट' सौम्य झटका बसला असून काही चाचण्या केल्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार असल्याचे समजते. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला शुक्रवारी (१ जानेवारी) छातीत दुखू लागले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीटीआय या वृत्तसंस्थने रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. गांगुलीला किती वेदना होत आहेत हे आम्ही तपासत आहोत. यासाठी काही टेस्ट कराव्या लागतील. बीसीसीआयचे ट्वीट... जय शहा यांचे ट्वीट बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी गांगुलीची प्रकृती स्थीर असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी. मी त्याच्या कुटुंबीयांशी बोललो असून दादाची प्रकृती स्थिर आहे. तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या प्रकृतीसंदर्भात काळजी व्यक्त केली आहे. त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. विराट कोहली म्हणाला...
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3n5oneb
No comments:
Post a Comment