मुंबई: बातमीचे हेडिंग वाचून तुम्ही विचित्र वाटले असेल. क्रिकेटचा आणि या हेडिंगचा काय संबंध असा प्रश्न देखील पडला असेल. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा आणि डोंबिवली आणि बोरिवलीचा जवळचे कनेक्शन आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने मेलबर्नमध्ये विजय मिळून १-१ अशी बरोबरी साधली. आता दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. वाचा- तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ()चा समावेश झाला आहे. रोहितचा फक्त भारतीय संघात समावेश झालेला नाही तर त्याला उपकर्णधार करण्यात आले आहे. भारतीय संघाचा नियमीत कर्णधार विराट कोहली मुलाच्या जन्मासाठी मायदेशात परतल्याने ( ) कडे नेतृत्व देण्यात आले. दुसऱ्या कसोटीत त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार विजय मिळवला. त्या सामन्यात उपकर्णधारपदाची जबाबदारी चेतेश्वर पुजाराकडे देण्यात आली होती. रोहित संघात आल्यावर ही जबाबदारी पुन्हा त्याच्याकडे दिली जाईल हे संघ व्यवस्थापनाने तेव्हाच स्पष्ट केले होते. वाचा- आता रोहितचा समावेश झाला असून तो उपकर्णधार आहे. रोहित गेल्या काही वर्षापासून वनडे आणि टी-२०चा कर्णधार आहे. त्यामुळे विराटच्या गैरहजेरीत रोहितचा नेतृत्व करणाऱ्या फळीत समावेश करणे स्वाभाविक आहे. भारतीय संघाचा कर्णधार आणि उपकर्णधार हे दोघेही मुंबईचे आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे डोंबिवलीचा तर उपकर्धार रोहित शर्मा हा बोरिवलीत रहायचा. या दोघांच्या निवडीनंतर सोशल मीडियावर प्रथच बोरिवली आणि डोंबिवलीतून एखाद्याला सिट मिळाल्याचे मेसेज युझर शेअर करत आहेत. वाचा- मुंबई उपनगरीय लोकल सेवेत या दोन्ही स्थानकांवरून गाडी पकडणाऱ्यांना बसण्यास जागा मिळत नाही. पण भारतीय संघात मात्र डोंबिवली आणि बोरिवलीच्या या दोघांना जागा मिळाल्याने युझर्स सोशल मीडियावर गंमतीने शेअर करत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pLSQjj
No comments:
Post a Comment