नवी दिल्ली: भारतीय संघातील गोलंदाज () वरील बंदीचा कालावधी संपल्याने तो पुन्हा एकदा मैदानावर परतला आहे. केरळने मुश्ताक अली ट्रॉफीसाठी त्याचा संघात समावेश केला आहे. १० जानेवारीपासून ही टी-२० स्पर्धा सुरू होणार असून श्रीसंतने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. मुंबईत होणाऱ्या या स्पर्धेतील सामन्याआधी श्रीसंतने सराव सामन्यात गोलंदाजी केली. श्रीसंत जेव्हा भारतीय संघाकडून खेळायचा तेव्हा तो त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जायचा. अनेकदा चेंडू टाकल्यानंतर तो फलंदाजाला काही ना काही बोलताना दिसायचा. वाचा- श्रीसंतचा हा आक्रमक स्वभाव ७ वर्षानंतर देखील कायम असल्याचे दिसून आले. सराव सामन्यात त्याने जुन्याच पद्धतीने आक्रमक गोलंदाजी केली आणि फलंदाजाविरुद्ध स्लेजिंग केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. वाचा- सराव सामन्यात श्रीसंतचा आक्रमक स्वभाव पाहून चाहते खुश झाले आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने देखील ट्वीटकरून श्रीसंतला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी बीसीसीआयने श्रीसंतवर बंदी घातली होती. त्याची बंदी सप्टेंबर २०२० मध्ये संपली. त्यानंतर आता त्याला राज्य क्रिकेट संघाकडून संधी मिळाली आहे. श्रीसंतने २०२३चा वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो सध्या ३७ वर्षाचा आहे. आगामी काळात आयपीएलमध्ये खेळण्याची त्याची इच्छा आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hvBAMi
No comments:
Post a Comment