सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काही प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंविरुद्ध वर्णद्वेषी शेरेबाजी केली होती. कसोटी सामन्यातील तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारतीय जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यांच्याबाबत ही घडना घडली होती. सामन्यातील चौथ्या दिवशी जेव्हा असा प्रकार घडला तेव्हा भारतीय संघ व्यवस्थापनाने याची अधिकृत तक्रार केली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा असा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी मोहम्मद सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. बुमराह आणि सिराज यांच्याबद्दल कोणते आक्षेपार्ह शब्द ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी वापरले याबाबतची माहिती आता समोर आली आहे. बीसीसीआयमधील सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार सिराजला ब्राउन डॉग आणि बिग मंकी ( ) असे शब्द वापरले गेले. हे दोन्ही शब्द वर्णद्वेषी मानले जातात. ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी बुमराहला देखील असेच शब्द वापरले. रविवारी जेव्हा अशा प्रकार पुन्हा घडला तेव्हा भारतीय खेळाडूंनी मैदानातील अंपायरशी चर्चा केली आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी संबंधित सहा प्रेक्षकांना स्टेडियमच्या बाहेर हकलले. यामुळे १० मिनिटे खेळ थांबला होता. त्या संबंधित सहा प्रेक्षकांना न्यू साउथ वेल्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी भारतीय खेळाडू आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. दरम्यान आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या घटनेचा यजमान ऑस्ट्रेलियाकडून अहवाल मागविला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ozyRnN
No comments:
Post a Comment