
नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार ( ) सध्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी पत्नी अनुष्कासोबत आहे. विराटने बाळाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील फक्त एकच कसोटी सामना खेळला होता. विराट कुटुंबीयांना आणि त्याच्या चाहत्यांना गोड बातमीची प्रतिक्षा आहे. वाचा- विराट कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. फोटोत विराटने दोन्ही हाताने व्हिक्ट्रीचे चिन्ह केले आहे. त्याच्या या फोटोवरून चाहते वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. काही चाहत्यांच्या मते चार दिवसात बाळाचा जन्म होणार आहे म्हणून विराटने व्ही चिन्ह केले आहे. वाचा- ... वाचा- विराटच्या या फोटोचा अर्थ काही युझर्सनी २२ जानेवारी असा काढला आहे. त्यांच्या मते बाळाचा जन्म २२ जानेवारी रोजी होईल. विराट कोहलीचे चाहते आणि अनुष्का शर्माचे चाहते नव्या बाळाच्या जन्माची बातमी ऐकण्यास उत्सुक आहेत. वाचा- बाळाच्या जन्मासाठी विराटने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपैकी फक्त एकच सामना खेळला होता. त्यानंतर त्याने सुट्टी घेत पत्नी अनुष्कासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. वाचा- ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत भारताचा ८ विकेटनी पराभव झाल्यानंतर विराटच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेने मेलबर्न मैदानावर शानदार विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या दोन्ही संघातील तिसरा कसोटी सामना उद्या ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3nh1DId
No comments:
Post a Comment