
सिडनी, 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यांमध्ये उद्यापासून तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. पण या सामन्यात एक महिला इतिहास रचणार असल्याचे आता समोर आले आहे. या महिलेचे नाव क्लेयर पोलोसाक असे आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात क्लेयर आपल्याला चौथ्या पंचांच्या रुपात दिसणार आहे. पुरुषांच्या कसोटी क्रिकेट सामन्यात पंचगिरी करणारी क्लेयर ही पहिली महिला पंच ठरणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा क्लेयरसाठी नक्कीच खास असेल. यापूर्वी क्लेयरने पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पंचगिरी केली होती. पण आतापर्यंत कोणत्याही महिलेने कसोटी क्रिकेटमध्ये हा मान पटकावलेला नाही. पुरुषांच्या कसोटी सामन्यात पंचगिरी करणारी क्लेयर ही पहिली महिला ठरणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात पॉल रायफल आणि पॉल विल्सन हे दोन माजी गोलंदाज मैदानातील पंचांची भूमिका पार पाडणार आहेत. त्याचबरोबर ब्रुस ऑक्सेनफोर्ड हे या सामन्यात तिसरे पंच असतील, त्याचबरोबर चौथ्या पंचाचा मान हा क्लेयरला मिळाला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड बून हे सामनाधिकारी असतील. सिडनीत उद्यापासून होणाऱ्या कसोटी रोहित शर्मा आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीत जलद गोलंदाज उमेश यादव जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्या जागी निवड समितीने नवदीप सैनीवर विश्वास दाखवला आहे. तो भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करेल. उमेश यादवच्या जागी शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांच्यात चुरस होती. पण संघ व्यवस्थापनाने सैनीवर विश्वास दाखवला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ कसा असेल?असा आहे भारतीय संघ- अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. पण या कसोटीत रोहित नेमका कोणत्या स्थानावर खेळणार, याबाबत कर्णधार अजिंक्य रहाणेने आपले मत स्पष्ट केले आहे. रोहितच्या स्थानाबद्दल अजिंक्य म्हणाला की, " रोहित शर्मासारखा अनुभवी फलंदाज भारतीय संघात दाखल झाला आहे. त्याचबरोबर रोहितने नेट्समध्ये कसून सराव केला आहे. रोहितने गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार फलंदाजी केली आहे आणि त्याचाच फायदा संघाला झाला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित सलामीवीर म्हणून खेळायला येईल."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35c6cxi
No comments:
Post a Comment