
क्राइस्टचर्च: न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान संघाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि १७६ धावांनी पराभव झाला. या पराभवासह त्यांनी कसोटी मालिका २-० ने गमावली. मालिकेतील न्यूझीलंड संघाने धमाकेदार कामगिरी केली. कर्णधार केन विलियमसनने पहिल्या सामन्यात शतक तर दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले. या विजयामुळे त्यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली. केन देखील फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. पाकिस्तान संघाचा झालेल्या या दारुण पराभवानंतर त्याच्यावर जोरदार टीक सुरू झाली आहे. माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने तर, पाकिस्तानचा संघ शालेय स्तरावरील क्रिकेट खेळत असल्याची टीका केली. इतक नव्हे तर बोर्ड हे नालायक आहे, असे म्हटले. न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा १०० धावांनी पराभव झाला होता. तर दुसऱ्या कसोटीत एक पाऊल पुढे जात त्यांनी एक डाव आणि १७६ धावांनी पराभव स्विकारला. दुसऱ्या कसोटीत पाकच्या एकाही फलंदाजाला ४०च्या पुढे धावसंख्या करता आली नाही. पाकिस्तान संघाच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर अख्तरने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला. तो म्हणतो, मी क्लब आणि न्यूझीलंडचा संघ यांच्यातील मॅच पाहिली. मी पाकिस्तान संघाला क्लब टीम यासाठी म्हटले कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तसाच संघ निवडला आहे. पाक बोर्ड नालायक आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35hptgP
No comments:
Post a Comment