मेलबर्न: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या सामना पाहण्यास आलेल्या एका प्रेक्षकाला करोनाची लागण झाली आहे. ही माहिती मेलबर्न क्रिकेट क्लबने दिली आहे. क्लबने संबंधित स्टॅडमध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांना आयसोलेट होण्याची विनंती केली आहे. वाचा- मेलबर्न कसोटी ज्या स्टॅडमधील व्यक्तीला करोना झाला आहे येथील अन्य कोणत्याही प्रेक्षकाला सिडनी कसोटी मैदानावर पाहता येणार नाही, असे देखील मेलबर्न क्लबने स्पष्ट केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे देखील स्पष्ट केले आहे की तिसऱ्या कसोटी सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना मास्क लावावा लागेल. चाहते फक्त जेवणासाठी आणि पाणी पिण्यासाठी मास्क काढू शकतील. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून झालेल्या दुसऱ्या कसोटी भारताने ८ विकेटनी विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. वाचा- NSWच्या आरोग्य मंत्र्यांनी सिडनी कसोटीच्या आधी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यात कसोटी सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच चाहत्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करता वैयक्तीक किंवा टॅक्सीने सामना पाहण्यासाठी यावे असे म्हटले आहे. सिडनी शहरात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने ही काळजी घेतली जात आहे. वाचा- सिडनीत उद्या म्हणजे गुरुवारपासून तिसरी कसोटी सुरू होत आहे. मैदानाच्या एकूण प्रेक्षक संख्येच्या फक्त २५ टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी दिली जाणार आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/35gUyBh
No comments:
Post a Comment