क्राइस्टचर्च: पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडने एक डाव आणि १७६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडने पहिल्या डावात ६५९ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानला दोन्ही डावात मिळून ४८३ धावा करता आल्या. वाचा- वाचा- न्यूझीलंडच्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थानावर झेप घेतली. न्यूझीलंड संघाने आधी भारतीय संघाला मागे टाकले होते. आता दुसऱ्या कसोटीतील विजयासह त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. वाचा- कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडचे ११८ गुण झाले आहेत. ११६ गुणंसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर ११४ गुणांसह भारत तिसऱ्या स्थानावर आहे. पाक विरुद्धच्या मालिकेआधी न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर होता. कसोटी क्रमवारीत जर न्यूझीलंड अव्वल स्थानावर पोहोचला असला तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ते अजूनही तिसऱ्याच स्थानावर आहेत. तेथे ऑस्ट्रेलिया पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अर्थात या तिनही संघांच्या गुणांमध्ये फार अंतर नाही. वाचा- फलंदाजांच्या क्रमवारीत केन विलियमसनने याआधीच अव्वल स्थान मिळवले होते. त्याने सलग तिसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली होती. केनने वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक, त्यानंतर पाकविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक आणि दुसऱ्या कसोटीत द्विशतक केले होते. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3opMy8Q
No comments:
Post a Comment