
नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यापैकी दोन कसोटी सामने झाले असून मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यातील खराब कामगिरीनंतर भारताने मेलबर्नमध्ये शानदार कमबॅक केले. पण ७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी आधी भारतीय संघाला झटका बसला. वेगवान गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. दुखापतीमुळे संघाबाहेर होणारा तो तिसरा वेगवान गोलंदाज ठरलाय. वाचा- भारतीय गोलंदाजांच्या या दुखापतीवर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघात जलद गोलंदाजांची स्थिती अशीच राहिली तर काही दिवसांनी ऑस्ट्रेलियाकडून उधार मागावे लागतील. वाचा- ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होण्याआधी इशांत शर्मा संघाबाहेर झाला. पहिल्या कसोटीनंतर मोहम्मद शमी तर आता दुसऱ्या कसोटीनंतर उमेश यादव बाहेर झाला. आता तिसऱ्या कसोटीनंतर भारताला ऑस्ट्रेलियाकडून जलद गोलंदाज उधार मागावे लागतील की काय, असे म्हणाला. वाचा- भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दोन्ही कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. पण सर्व काही बरोबर होत असताना गडबड होतेय. भारतीय संघाने २०१८ साली जेव्हा मालिका जिंकली होती तेव्हा संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा होते. या तिघांची ताकद वेगळी आहे. इशांत मोठ मोठ्या स्पेल टाकू शकतो. नव्या चेंडूसह स्विंग करू शकतो. इतक नव्हे तर त्याची सरासरी ही फक्त २.५० इतकी असते, असे तो म्हणाला. वाचा- मोहम्मद शमी नव्या आणि जुन्या चेंडूसह स्विंग करू शकतो. तो वेगाने बाउंसर टाकू शकतो. त्याचा वेग १४० ते १४५ इतका असतो. ही गोष्टी बुमराहच्या बाबत आहे. तो सर्वात वेगळा आहे. इशांत आयपीएलमध्ये जखमी झाला आणि त्यानंतर खेळू शकला नाही. शमीने पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी केली, ऑस्ट्रेलियावर दबाव ठेवला होता. शमीच्या जागी मोहम्मद सिराजला खेळवण्यात आले. आता भारतीय संघात मुख्य गोलंदाजांपैकी फक्त बुमराह राहिला आहे. जणू काही भारतीय जलद गोलंदाजांना नजर लागली आहे की काय असे वाटते. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3hAqmWP
No comments:
Post a Comment