
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होणार आहेत हे आता निश्चित झाले आहे. जलद गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी टी नटराजन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच बरोबर स्टार सलामीवीर देखील कसोटी खेळण्यास सज्ज झालाय. वाचा- भारताचा अनुभवी फलंदाज () कसोटी खेळणार ही नाही याबद्दल अद्याप निर्णय झाला नव्हता. रोहितचा फिटनेस पाहून मगच निर्णय घेणार असल्याचे याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे मुख्य कोच रवी शास्त्री म्हणाले होते. आता भारतीय संघाने असा एक निर्णय घेतला आहे ज्यामुळे रोहित शर्मा तिसरी कसोटी खेळणारे हे निश्चित झाले आहे. वाचा- भारताने कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे()कडे जबाबदारी दिल्यानंतर उपकर्णधाराची जबाबादीर चेतेश्वर पुजारकडे दिली होती. तेव्हा भारतीय संघ व्यवस्थापनाने हे स्पष्ट केले होते की जर रोहित फिट झाला आणि संघात आला तर तो उपकर्णधार असेल. वाचा- वाचा- बीसीसीआयशी संबंधित एका अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. विराटच्या गैरहजेरीत अजिंक्यला कर्णधारपद दिल्यानंतर उपकर्णधाराबाबत देखील कोणताही मतभेद नव्हता. उपकर्णधार म्हणून रोहितच होता. तो जोपर्यंत संघात येत नाही तोपर्यंत ही जबाबदारी पुजाराकडे देण्यात आली होती. रोहित गेल्या काही काळापासून मर्यादित षटकाच्या संघात उपकर्णधार आहे. त्यामुळे ही गोष्टी स्पष्टच आहे की विराटच्या गैरहजेरीत रोहित संघ नेतृत्वाचा एक भाग असेल. रोहितने सिडनीमध्ये १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आणि तो काल मेलबर्नमध्ये भारतीय संघात दाखल झाला. वाचा- तिसऱ्या कसोटीत रोहित खेळणार हे निश्चित झाले असले तरी तो शुभमन गिल सोबत सलामीला येणार की मधल्याफळीत खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेला नाही. जर रोहित सलामीला आला तर मयांक अग्रवाल संघाबाहेर जावे लागू शकते. रोहित जर मधळ्याफळीत खेळला तर हनुमा विहारी अंतिम ११ मधून बाहेर जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सिडनी मैदानावर होणार आहे. रोहितने ३२ कसोटीत ४६ च्या सरासरीने २ हजार १४१ धावा केल्या आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o6hr1P
No comments:
Post a Comment