नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष याच्यावर पुढील काही दिवसात किंवा आठवड्यात पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करावी लागू शकते. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे आणि लवकरच घरी सोडण्याची शक्यता असल्याची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, गांगुलीला उद्या म्हणजे ६ जानेवारी रोजी डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वाचा- शनिवार (२ जानेवारी) सकाळी घरात जिम वर्कआउट करताना गांगुलीला छातीत दुखू लागले. त्याला हृदयविकाराचा सौम्य झटका बसला होता. गांगुलीच्या हृदयतील रक्तवाहिन्यांमध्ये तीन ब्लॉकेज आढळले होते. त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. वुडलँड्स रुग्णालयाच्या एमडी आणि सीईओ रुपाली बसू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीने सोमवारी गांगुलीच्या प्रकृती संदर्भात चर्चा केली आणि त्यांनी असा निर्णय घेतला की, सध्या गांगुलीची प्रकृती स्थिर आहे त्यामुळे त्याच्यावर जी अँजिओप्लास्टी केली जाणार होती ती आणखी काही दिवस पुढे ढकलता येऊ शकते. वाचा- गांगुलीच्या हृदयात तीन ब्लॉकेज होते. त्याला ट्रिपल वेसल डिसीज असे देखील म्हणतात. हृदयरोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. आर के पांडा यांनी देखील इंटरनेटच्या माध्यमातून या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत अमेरिकेतील एक डॉक्टर देखील होते. गांगुलीवरील पुढील उपचाराची दिशा ठरवणाऱ्या वैद्यकीय बोर्डामध्ये हे ठरवण्यात आले की, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. छातीत दुखत नाही त्यामुळे अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय टाळणे हाच सुरक्षित पर्याय आहे. वाचा- वाचा- बैठकीत गांगुलीचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. गांगुलीवरील अँजिओप्लास्टी पुढील काही दिवसात किंवा आठवड्यात करावी लागले. त्याला एक दोन दिवसात रुग्णालयातून सोडण्यात येईल. मंगळवारी म्हणजे आज डॉ. शेट्टी गांगुलीची भेट घेतील आणि पुढील उपचार पद्धती कशी करायची यावर एक बैठक घेणार आहेत. वाचा- काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून गांगुलीशी प्रकृतीसंदर्भात विचारपूस केली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी रुग्णालयात जाऊन गांगुलीची भेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MBnayL
No comments:
Post a Comment