सिडनी: 3rd test भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ज्या खेळाडूचा समावेश नेटमधील गोलंदाज म्हणून केला होता त्याला आता एक मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघातील जलद गोलंदाज ()ने आयपीएलच्या १३व्या हंगामात धमाकेदार कामगिरी केली होती. यॉर्कर किंग अशी ओळख निर्माण करणाऱ्या नटराजन आता एक विक्रमी पदार्पण करण्याची शक्यता आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाला तेव्हा टी नटराजन हा फक्त नेटमधील गोलंदाज होता. पण वनडे मालिकेतील तिसऱ्या लढतीत नवदीप सैनी दुखापतीमुळे बाहेर झाला आणि टी नटराजन याला संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. त्यानंतर टी-२० मालिकेत संघात समावेश झाला आणि वनडे आणि टी-२०मध्ये त्याने पदापण केले. टी-२० मालिकेत त्याने सर्वाधिक ६ विकेट घेतल्या. आता टी नटराजन याचा समावेश कसोटी संघात देखील करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी जलद गोलंदाज उमेश यादव दुखापतीमुळे बाहेर झाल्याने नटराजन यांचा समावेश संघात केला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने अद्याप अंतिम ११ जणांची निवड केली नसली तरी तो कसोटीत पदार्पण करण्याची शक्यता आहे. मंगळवारी नटराजनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने पुढील आव्हान स्विकारण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतीय संघाची कसोटीसाठीची जर्सी घातली आहे. ही जर्सी घालून गर्व वाटतो. पुढील आव्हान स्विकारण्यासाठी मी तयार आहे, असे त्याने म्हटले आहे. भारतीय निवड समितीने उमेश यादवच्या जागी नटराजनची तर मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर यांची निवड केली आहे. आता सिडनीत ७ जानेवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत अंतिम ११ जणांमध्ये कोणाला संधी मिळते हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. टी नटराजनने सराव करतान घेतलेला शानदार कॅच
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ohgeEZ
No comments:
Post a Comment